Star Health Insurance info in Marathi : स्टार हेल्थ इन्शुरन्स ही भारतातील आघाडीची विमा कंपनी आहे. ही विमा कंपनी भारतीय नागरिकांच्या गरजेनुसार आरोग्य विमा, वैयक्तिक अपघात विमा तसेच देशांतर्गत प्रवास विमा इत्यादी प्रकारच्या विमा सुविधा पुरविते. लेखामध आपण स्टार हेल्थ इन्शुरन्स आरोग्य विम्या बाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
आरोग्य विमा म्हणजे काय ?
विमा म्हणजे जोखीम व्यवस्थापनाचा एक प्रकार आहे, यामध्ये विमा उतरवलेली संस्था तुम्हाला तुमच्या नुकसानीच्या बद्दल संभाव्य नुकसान भरपाई ची किंमत देते. यासाठी ठराविक रक्कम (वार्षिक) तुमच्याकडून घेते जाते त्यास प्रीमियम असे म्हणतात. आपत्कालीन स्थितीमध्ये तुमच्या झालेल्या नुकसानीची भरपाई विमा कंपनी करून देते.
मेडिक्लेम किंवा आरोग्य विमा हा अचानक उद्भवणारे आजार, गंभीर आजार, आपत्कालीन वैद्यकीय स्थिती मध्ये येणाऱ्या अवाढव्य खर्चापासून तुमचे आणि तुमच्या कुटुंबांच संरक्षण करतो. तुम्ही वैद्यकीय विमा काढला असेल तर आपत्कालीन वैद्यकीय स्थितीमध्ये तुम्हाला उपचाराचे पैसे भरावे लागत नाहीत. उपचाराचा संपूर्ण खर्च हा हेल्थ इन्शुरन्स कंपनी कडून केला जातो. अलीकडच्या काळात आरोग्य विमा कंपन्या कॅशलेस उपचार पॉलिसी राबवताना दिसतात.
10 Biggest Insurance Company in the World
Star Health And Allied Insurance Co. Ltd.
Star Health And Allied Insurance Co. Ltd. ही कंपनी भारतात आरोग्य विमा, अपघात विमा, प्रवास विमा, गट विमा, सुरक्षा विमा, समूह प्रवास विमा, मेडिक्लेम अशा विविध सेवा पुरवणारी आघाडीची विमा कंपनी आहे. कंपनीची स्थापना ही २००६ मध्ये झाली असून, कंपनी कमी कमी वेळेत आघाडीची कंपनी म्हणून प्रसिद्ध झाली. इतर विमा कंपन्यांच्या तुलनेत स्टार हेल्थ स्वस्त दरात आरोग्य विमा देण्यासाठी लोकप्रिय आहे. या कंपनीचे संपूर्ण भारतात १४५०० पेक्षा अधिक नेटवर्क हॉस्पिटल, ८०० हून अधिक ब्रांच ऑफिसेस तसेच सहा लाख विमा प्रतिनिधी आहेत.
स्टार हेल्थ पॉलिसी घेण्याचे फायदे – Star Health Insurance info in Marathi
दावा निकाली काढण्याचे प्रमाण
स्टार हेल्थ इन्शुरन्स ही भारतातील आघाडीची विमा कंपनी असून या कंपनीचे दावा निघाली काढण्याचे प्रमाण हे ९९.०६ इतका आहे.
संपूर्ण प्रक्रियेमधील ग्राहकांचे समाधान
स्टार हेल्थ कंपनी ही आपल्या ग्राहकांसाठी समाधानकारक भूमिका बजावताना दिसते आत्तापर्यंत स्टार हेल्थ कंपनीने ३५.००० कोटी रुपयांचे ८.४ कोटी दावे दिलेले आहेत. यामुळेच स्टार हेल्थ कंपनीचे आरोग्य विमा घेण्याचे प्रमाण विमा बाजारपेठेतील इतर कंपन्यांपेक्षा जास्त आहे.
जलद व्यवहार
स्टार हेल्थ कंपनीचे दावा निकाली काढण्याचे प्रमाण 90% पेक्षा जास्त असून कॅशलेस क्लेम हे तत्काळ निकाली काढले जातात. तसेच ही प्रक्रिया देखील पारदर्शक आहे.
नूतनीकरण
स्टार हेल्थ इन्शुरन्स विम्याधारकांना आजीवन पॉलिसी नूतनीकरण करण्याची सोय उपलब्ध करून देते तसेच आधीच्या वर्षातील सर्व फायदे नूतनीकरण करताना नियमित चालू ठेवते.
कॅशलेस व्यवहार
स्टार हेल्थ इन्शुरन्स आपणास वैद्यकीय आपत्कालीन स्थितीमध्ये कॅशलेस सुविधा प्रदान करते. तसेच स्टार हेल्थ इन्शुरन्सचे १४५००+ अधिक रुग्णालयांचे पूर्ण देशभर नेटवर्क आहे. त्यामुळे विमेधारक कॅशलेस हॉस्पिटलायझेशन चा लाभ घेऊ शकता.
आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया
- पॉलिसी नंबर / आयडी कार्ड डॉक्टरांनी दिलेले प्रीस्क्रिप्शन हॉस्पिटल मधील स्टार हेल्थ मेडीक्लेम पाहणाऱ्या व्यक्तीकडे जमा करावे.
- क्लेम पाहणारी व्यक्ती स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या साइटवर फॉर्म भरून कागदपत्रांची पडताळणी करून ऑथोरायझेशन करतील.
- स्टार हेल्थ इन्शुरन्स ने सबमिट केलेल्या कागदपत्राना अधिकृत केल्यानंतर हॉस्पिटल मधून क्लेम पूर्ण केला जातो.
दावा प्रतिपूर्ती
आपत्कालीन स्थितीमध्ये उपचार घेतल्यास आपणास दाव्यांची परतफेड लागू होते.
ऍडमिट झाल्यानंतर किमान 24 तासाच्या आत दाव्याची माहिती देणे आवश्यक आहे, यासाठी टोल फ्री नंबर, मेल, व्हाट्सअप याद्वारे माहिती देण्याची व्यवस्था कंपनीने केली आहे.
तसेच डिस्चार्ज नंतर विम्याधारकाने हॉस्पिटलची बिले, मेडिकलची बिले, तसेच हॉस्पिटल च फाईल, इतर सर्व कागदपत्रे व झालेला संपूर्ण खर्च स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडे सादर करावे.
पॉलिसीच्या अटी व शर्थी नुसार दावा निकाली काढला जातो.
दावा प्रतिपूर्ती साठी आवश्यक कागदपत्रे
दावा करण्याचा अर्ज (फॉर्म B )हा हॉस्पिटल मधून भरून घेणे, दावा (फॉर्म A) स्वतः भरावा.
हॉस्पिटल लहान असल्यास (15 बेड पेक्षा कमी) हॉस्पिटलचे नोंदणी प्रमाणपत्र.
हॉस्पिटल तसेच केमिस्ट ची मूळ बिले प्रिस्क्रिप्शन सहित.
हॉस्पिटल मधून मिळालेली फाईल – पॅथॉलॉजिस्ट कडून मिळालेली पावती, चाचणी अहवाल
ऑपरेशन झाले असल्यास सर्जन चे बिल आणि पावती
अपघात ग्रस्त प्रकरण – प्रथम माहिती अहवाल झेरॉक्स, स्वयं घोषणापत्र, उपस्थित डॉक्टरांचे प्रमाणपत्र.
अधिक माहितीसाठी संपर्क – श्री. मनोहर अनंत उंडे (विमा सल्लागार) ८८२८५२३३१६ / ९२२१३३३५१९
मित्रांनो वरील लेखांमध्ये तुम्हाला स्टार हेल्थ इन्शुरन्स आरोग्य वीम्या विषयी सविस्तर माहिती मिळाली असेल. तरीही तुमच्या विमा सल्लेगाराचा सल्ला जरूर घ्या. तसेच वरील लेख कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी कोकण कल्चर ला नक्की फॉलो करा.
हे देखील वाचा
स्टार हेल्थ इन्शुरन्स ऑफिशियल वेबसाईट – क्लिक करा