Kokum Juice Recipes सोप्या पद्धतीने कोकम सरबत बनवा घरी

Kokum Juice Recipes : महाराष्ट्राच्या बहुतांश कोकण पट्ट्यामध्ये कोकम ची झाडे आढळतात. कोकम हे औषधी गुणधर्म असलेले फळ आहे या फळाच्या संपूर्ण भागांचा उपयोग केला जातो. यापासून कोकम, कोकम सरबत, आगळ, कोकम बटर इत्यादी गोष्टी बनवल्या जातात. या लेखामध्ये आपण कोकमच्या झाडाची तसेच कोकमच्या फळापासून बनणाऱ्या इतर गोष्टींची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

कोकम दक्षिण भारताच्या पश्चिम घाटा मध्ये आढळणारे एक फळ आहे. कोकणामध्ये सर्वत्र आढळते, भारतात आढळणाऱ्या ३५ प्रजातींपैकी १७ प्रजाती या स्थानिक आहेत. महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टी भागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये कोकम जातीला जीआय टॅग प्राप्त झाला आहे. कोकमच्या झाडाला येथील स्थानिक कोकणी बांधव रातांबे, कोकम, आमसूल असे वेगवेगळ्या नावाने ओळखतात. कोकमच्या झाडाचे शास्त्रीय नाव(Garcinia Indica) गार्सिनिया इंडिका आहे. कोकमाचे झाड हे वन जमिनी, नदीकिनारी, पडीक जमिनीत आढळते या वनस्पती सदाहरित जंगलांमध्ये मोडतात. स्थानिक लोक कोकमाचा वापर अनेक पाककृतीमध्ये करतात तसेच चिंचेला पर्याय म्हणून देखील याचा वापर केला जातो.

Kokum Juice Recipes
Kokum Juice Recipes

अलीकडच्या काळात कोकमाविषयी जनजागृती करून आता या फळापासून दर्जेदार असे कोकम बटर देखील बनवले जाते, जे अतिशय उच्च दर्जाचे असून त्याला जागतिक बाजारपेठेत खूप मागणी आहे. कोकम बटर चा वापर हा सौंदर्य प्रसाधनांमध्ये तसेच केसांची उत्पादने यामध्ये केला जातो.

कोकमाच्या सालीमध्ये हायड्रोक्सी सिट्रिक ऍसिड मुबलक प्रमाणात आढळते.

कोकम हे आरोग्यवर्धक, पित्तनाशक असून त्याचे अनेक फायदे आहेत. कोकमाच्या बियांपासून बनवलेले बटर हे बाजारात मिळणाऱ्या बटर पेक्षा खूप दर्जेदार आणि पौष्टिक असते.

कोकम सरबत कसे बनते? Kokum Juice Recipes

तुम्ही बाजारात मिळणारे कोकम सरबत पाहिलं असेल, किंवा खरेदीत देखील केले असेल पण हे कोकम सरबत / कोकम आगळ कसे बनवले जाते. याची माहिती बऱ्याच जणांना नसते. कोकणातील बांधव कोकम सरबत कसे बनवतात ते पाहू.

सर्वप्रथम जंगलातून पूर्ण (पिकलेली) पक्व झालेली कोकमाची फळे तोडून आणावी लागतात. त्यातील फळांमधील बिया काढून त्यांची साले वेगळी केली जातात. या बियांवरील आवरणाचा रस काढून बियांचे गोळे करून सुकण्यासाठी ठेवले जातात. या बिया खाण्यास आंबट गोड लागतात. कोकमांच्या सालापासून कोकम सरबत तसेच कोकम आगळ बनवले जाते. कोकम सरबत बनवण्याची प्रक्रिया जाणून घेऊ – कोकमाच्या सालांमधून बिया वेगळ्या करून त्या सालांमध्ये साखर भरली जाते. हे प्रमाण जितकी साले तितकी साखर असे असते, ही साखर भरलेली साले एका स्टीलच्या डब्यामध्ये किंवा भांड्यामध्ये एकावर एक रचली जातात. व त्या भांड्याला वरती कापड बांधून, साले ठेवलेले भांडे तीन ते चार दिवस कडक उन्हात ठेवले जाते. तीन-चार दिवसाच्या प्रक्रियेमध्ये कोकमाच्या सालांमधून रस हा आपोआप वेगळा होऊन भांड्याच्या तळाशी साठतो. हा साठलेला रस एका बॉटलमध्ये हवा बंद ठेवल्यास तो एक ते दोन वर्ष आरामात टिकतो. हा रस आपण आपल्या गरजेप्रमाणे पाणी टाकून कोकम सरबत म्हणून वापरतो.

आगळ

साहित्य

 • रातांबे
 • मीठ

कृती

 • प्रथम रातांबे स्वच्छ धुवून घ्या ते मधोमध कापून त्याच्या आतील बिया काढून घ्या.
 • रातांबे कापल्यानंतर बिया/ गर वेगळा करून त्यामध्ये थोडे मीठ टाकून त्याचा रस काढून घ्या व बिया बाजूला करा.
 • एक काचेची भरणी घेऊन स्वच्छ पुसून घ्या.
 • आता या बरणीत बिया काढून उरलेले रातांबे बरणीच्या तळाशी लावून घ्या, व त्या थरावर थोडे मीठ टाका.
 • पुन्हा असे रातांब्यांचे थर लावून त्यावर मीठ टाका.
 • एखाद्या कपड्याने बरणीचे तोंड बांधून घ्या.
 • ही बरणी आठ ते दहा दिवस उन्हामध्ये ठेवून द्या.
 • आठ ते दहा दिवसानंतर बरणीमध्ये कोकम आगळ तयार झालेले मिळेल.
 • त्यामधून कोकमाची साले वेगळी करून आगळ एका बॉटलमध्ये ठेवून द्या.

हे तयार झालेले आगळ हे सोलकढी मच्छी चे कालवण, मच्छी मॅरीनेट करण्यासाठी वापरू शकतो.

कोकमाची फळे बिया काढून उन्हात सुकवून त्यांवर मिठासह कैरीचा फ्लेवर देऊन कोकम बनवले जातात, ज्याचा आहारात वापर केला जातो, हे कोकम १-२ वर्ष आरामात टिकते.

वरील व्हिडिओमध्ये कोकणात कोकम सरबत कसे बनवले जाते याची प्रक्रिया दर्शविली आहे.

Kokum Juice Recipes

साहित्य

 • २ चमचे कोकम रस
 • १/२ चमचा मीठ (काळे मीठ असल्यास उत्तम)
 • १/४ चमचा जिरे पावडर
 • ४ चमचे साखर

कृती

 • एका भांड्यामध्ये कोकम रस घ्या.
 • त्यामध्ये चवीनुसार मीठ साखर आणि जिरेपूड व थंड पाणी घाला.
 • संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्या.
 • यामध्ये तुम्ही सब्जा च्या बिया देखील ऍड करू शकता.

सोलकढी

Kokum Juice Recipes सोप्या पद्धतीने कोकम सरबत बनवा घरी

साहित्य

 • ५ चमचे कोकम आगळ
 • एका नारळाचे किसलेले खोबरे
 • ५-६ लसुन पाकळ्या
 • ४ हिरव्या मिरच्या
 • १ चमचा तेल
 • १/२ चमचा मोहरी
 • चिमूटभर हिंग
 • कोथिंबीर
 • कढीपत्ता
 • मीठ

कृती

 • सर्वप्रथम किसलेला नारळ त्यामध्ये मिरच्या घालून त्यामध्ये थोडे पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
 • आता हे मिश्रण स्वच्छ कापडामध्ये घट्ट पिळून त्याचा रस एका भांड्यामध्ये काढून घ्या.
 • नारळाच्या रसामध्ये आता कोकम आगळ घालून छान एकजीव करून घ्या.
 • त्यामध्ये थोडी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून घ्या.
 • गॅसवर छोट्या भांड्यामध्ये फोडणीसाठी तेल गरम करा.
 • तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी, हिंग, कढीपत्त्याची फोडणी करा.
 • आता ही गरम गरम फोडणी कडी वरती द्या आणि मिश्रण एकजीव करा.

आता या कडीवर कोथिंबीर टाकून सर्व्ह करा. ही कडी पौष्टिक असून पित्तनाशक आहे. कोकणी माणसाचे जेवण हे या कडी शिवाय पूर्ण होत नाही.

शेवग्याचे फायदे जाणून हैराण व्हाल

कोकम बटर

मित्रांनो आज बाजारात मिळणारे बटर आपणा सर्वांना परिचित असेलच, त्याच प्रकारचे किंबहुना त्याहून अधिक दर्जेदार आणि शुद्ध बटर हे कोकमच्या बियांपासून तयार केले जाते. ग्लोबल मार्केटमध्ये याला चांगलीच मागणी आहे. शिवाय याची किंमत देखील ८००/- ते १०००/- रुपये किलो इतकी आहे. असे असून देखील माहितीच्या अभावामुळे जिथे कोकम मुबलक प्रमाणात मिळतो तेथील लोक कोकम बनवून त्याच्या बिया या कवडी मोलाने विकून टाकतात. याविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे. कोकम बटर बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता.

कोकमाचे औषधी गुणधर्म

कोकमाचा वापर हा आहारा मध्ये तसेच औषध म्हणूनही केला जातो, औषधी गुणधर्म देखील खूप आहेत कोकम हे पित्त नाशक असून कोकमाच्या बियापासून बनलेल्या बटरचा उपयोग सौंदर्यप्रसाधनां मध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते

आहारात कोकमाचा उपयोग केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते तसेच कोकमात आढळणारे अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म आपणास आजारांपासून दूर ठेवतात.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित

कोकमाच्या सेवनाने शरीरातील साखरेचे प्रमाण/ पातळी नियंत्रित राहते.

उष्माघातापासून संरक्षण

कोकम हे शरीराला थंडावा देणारे फळ असल्याने कोकम सरबताच्या सेवनाने शरीर थंड ठेवण्यास मदत होते, त्यामुळे उन्हाळ्याच्या काळात उष्माघातापासून शरीराचे रक्षण तसेच शरीर थंड ठेवण्यास मदत होते.

वजन कमी करण्यास मदत

कोकमामध्ये आढळणाऱ्या हायपोकोलेस्टेरोलेमिक या घटकामुळे कॅलरीचे फॅट मध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया मंद करुन शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यास मदत करते.

Kokum Juice Recipes
Kokum Juice Recipes

हृदय निरोगी ठेवण्यास मदत

कोकम या फळाच्या सेवनाने त्यामध्ये आढळणारे बी कॉम्प्लेक्स जीवनसत्व, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅंगनिज यासारखे हृदयाला पोषक असणारे घटक मुबलक प्रमाणात आढळतात. तसेच कोकमाच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित राहून हृदयाचे आरोग्य सुधारते.

पित्ताचा त्रास कमी करण्यास उपयुक्त

पित्त, ऍसिडिटी चा त्रास असल्यास कोकम सरबताच्या सेवनाने फायदा होतो. कोकम सरबत हे पित्तनाशक आहे त्यामुळे ज्येष्ठ पित्ताचा त्रास असल्यास कोकम सरबत पिण्याचा सल्ला देतात.

मित्रांनो वरील लेख कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा, असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आणि कोकणातील पारंपारिक पाककृती तसेच इतर गोष्टी जाणून घेण्यासाठी कोकण कल्चर ला नक्की फॉलो करा.

हे देखील वाचा

जीवनविद्या मिशन

Karande Bhaji Recipe | बटाट्याला पूरक असा करांदा | air potato

Suran Bhaji Benefits

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
All New Mahindra’s Budget Friendly Compact SUV XUV 3X0 Launch पृथ्वी बद्धल या रोचक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? top fact about earth उन्हाळ्यात आरोग्याची अशी घ्या काळजी. सुपरस्टार महेश बाबू चे कार कलेक्शन पाहून व्हाल थक्क | Mahesh Babu Luxury Car Collection Ferrari Purosangue फरारी ने लाँँच केली SUV तुम्ही पाहिली का ?