आरटीई प्रवेश अर्जासाठी १० मे पर्यंत आता मुदतवाढ RTE Admission 2024

शिक्षण हक्क कायद्यानुसार राखीव जागांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्जाची मुदत ही संपली असून आतापर्यंत अर्ज न केलेला पालकांसाठी १० मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

RTE Admission 2024 : शिक्षण हक्क कायद्यानुसार राखीव जागांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्जाची मुदत ही संपली असून आतापर्यंत अर्ज न केलेल्या पालकांसाठी १० मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार 25% राखीव जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने रूपरेषा ठरवून संबंधित बालकांच्या निवासापासून एक किलोमीटर अंतरावर अनुदानित, शासकीय, निम शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा नसतील आणि स्वयं अर्थसहाय्यीत शाळा असेल अशा स्थितीत त्या शाळेत मुलांना प्रवेश दिला जाणार आहे.

RTE Admission 2024 साठी रजिस्ट्रेशन कसे करावे – युजर मॅन्युअल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

RTE Admission 2024 पालकांकरिता सूचना २०२४-२५

१) २०२४-२५ वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरताना पुढील सूचना पाळून अर्ज भरावा

२) आपल्या पाल्याचा अर्ज भरताना जन्मदिनांक टाकताना ती जन्म दाखल्यावरलच असावी.

३) गुगल लोकेशन तसेच निवासाचा पूर्ण पत्ता तपासून पहा खात्री झाल्याशिवाय सबमिट करू नका.

४) शाळा निवडत असताना १ किलोमीटर ते ३ किलोमीटर अंतरावरील शाळा निवडताना जास्तीत जास्त १० शाळा निवडाव्यात.

५) अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावी. लॉटरी लागल्यानंतर कागदपत्रे नसल्यास प्रवेश रद्द होऊ शकतो.

६) अर्ज भरताना चूक झाल्यास तो सबमिट न करता डिलीट करावा व पुन्हा अर्ज करावा.

७) एकच बालकाचे दोन अर्ज भरू नयेत, असे केल्यास दोन्ही अर्ज बाद होतील.

८) ऑनलाइन अर्ज भरून झाल्यानंतर त्याची प्रिंट लॉटरी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जपून ठेवावी.

९) अर्जात खोटी माहिती भरू नये. चुकीची माहिती आढळल्यास मिळालेला प्रवेश देखील रद्द होऊ शकतो.

१०) अर्ज करण्याची मुदत ही १० मे पर्यंत असेल.

११) निवासी पुरावा म्हणून राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक ग्राह्य धरले जाईल.

RTE Admission 2024 आरटीई अर्जासाठी दहा मे पर्यंत मुदतवाढ

  • राज्यभरातून केवळ ६१,००० आर टी साठी अर्ज आले आहेत. राज्यभरात आरटीई च्या ८,८४,४११ इतक्या जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे यासाठी अर्ज करण्यास 30 एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आली होती परंतु केवळ 61 हजार अर्ज आल्याने ही नोंदणी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी प्राथमिक राज्यभरात आठ विभागातून अर्ज करण्यास मुदतवाढ दिली जाणार हे स्पष्ट केले होते मुदतवाढ दिली तरी अपेक्षित अपेक्षित अर्ज संख्या गाठणे कठीण वाटत आहे. कारण शासनाने आरटीई कायद्यात बदल करत शासकीय आणि निमशासकीय तसेच खाजगी शाळांमध्ये प्रवेशाची मुभा दिली आहे यामुळे प्रवेशांच्या जागांमध्ये वाढ झाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, अनुदानित शाळा, शासकीय, खाजगी शाळांमध्ये आरटी प्रवेशाची तरतूद करण्यात आली आहे यामुळे अर्ज नोंदणी अधिक वेगवान होणे गरजेचे असताना पालकांनी आरटीई कडे पाठ फिरवली. यासाठी जे पालक अर्ज करू शकले नाही त्यांच्यासाठी दहा मे पर्यंत रजा करता येईल अशी प्राथमिक माहिती शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे.

RTE Admission 2024 आरटीई अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

  • जन्मतारीख पुरावा
  • जात प्रमाणपत्र
  • उत्पन्न दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • निवासाचा पत्ता पुरावा
  • भाडे तत्त्वावर राहत असल्यास भाडेकरार

RTE Admission 2024 शाळांचा प्राधान्यक्रम

१) अनुदानित शाळा

२) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा

३) स्वयं अर्थसहाय्यित शाळा

हमीपत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

RTE Admission 2024 Registration Link Click Here

RTE Admission 2024 Admission Link Click Here

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
All New Mahindra’s Budget Friendly Compact SUV XUV 3X0 Launch पृथ्वी बद्धल या रोचक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? top fact about earth उन्हाळ्यात आरोग्याची अशी घ्या काळजी. सुपरस्टार महेश बाबू चे कार कलेक्शन पाहून व्हाल थक्क | Mahesh Babu Luxury Car Collection Ferrari Purosangue फरारी ने लाँँच केली SUV तुम्ही पाहिली का ?