Sakharoli Recipe : महाराष्ट्राचा इतिहास जसा बहुआयामी आहे, येथील संस्कृती देखील तितकीच विशाल आहे. महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृती बाबत बोलायचे झाले तर शब्द अपुरे पडू शकतात, इतकी विस्तृत येथील खाद्यसंस्कृती आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे चविष्ट पदार्थ फार पूर्वीपासून बनवले जातात. येथील प्रत्येक सणाला विशेष अशा गोडधोड पदार्थांची रेलचेल नेहमीच असते, अगदी नववर्षाची सुरुवात गुढीपाडवा ते अगदी होळी, दिवाळी प्रत्येक सणाला एक विशिष्ट पदार्थ ठरलेला असतोच. यामध्ये पुरणपोळी, मोदक, शेवया, शिरा, करंजी, नारळाची कापे, श्रीखंड, लाडू इ. अनेक वेगवेगळ्या पदार्थांचा यामध्ये समावेश होतो. आपण साखरोळी हा एक पारंपरिक गोड पदार्थ याची झटपट तयार होणारी रेसिपी पाहणार आहोत. महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये खूप लोकप्रिय आहे. साखरोळी प्रामुख्याने गव्हाचे पीठ अथवा मैदा आणि गुळ वापरून तयार केली जाते.
Sakharoli Recipe – साखरोळीचा इतिहास
Sakharoli Recipe साखरोळीचा इतिहास महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृती इतकाच जुना आहे. Sakharoli हा एक पारंपरिक गोड पदार्थ आहे, ज्याची उत्पत्ती खेड्यांमधील घराघरांत झाली आहे. पूर्वीच्या काळात, गावांमध्ये उपलब्ध असलेल्या साध्या साहित्यांचा वापर करून महिलांनी या घरगुती गोड पदार्थाची निर्मिती केली. साखरोळ्या विशेषतः सण, उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये बनवल्या जातात. यामध्ये मुख्यतः गूळ, गव्हाचे / मैदा पीठ या घरात सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंचा वापर केला जातो.
पुरण पोळीचा इतिहास तुम्हाला माहित आहे का ?
Sakharoli Recipe – साहित्य
साखरोळीची पारंपारिक पाककृती साखरोळ्या बनविण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य:
- १/२ किलो गव्हाचे अथवा मैद्याचे पीठ
- १/२ किलो बारीक किसलेला गूळ
- १ टेबल स्पून वेलची पूड
- १/२ टेबल स्पून बेकिंग पावडर
- १/४ टेबल स्पून मीठ
- तळण्यासाठी तेल
- २ ग्लास पाणी
Sakharoli Recipe – कृती
- सर्वप्रथम एक ग्लास पाणी एका टोपामध्ये घेऊन, त्यामध्ये बारीक किसलेला गूळ घालून हे मिश्रण गुळ मिक्स होईपर्यंत मध्यम आचेवर गरम करून घ्या.
- त्याचा पातळ पाक तयार होईल, आता हे मिश्रण थोडे थंड होऊ द्या.
- गव्हाचे अथवा मैद्याचे पीठ चाळणीने चाळून घ्या.
- एक मोठे बाऊल घेऊन त्यामध्ये गव्हाचे/मैद्याचे पीठ घ्या. त्यामध्ये वेलची पूड, बेकिंग पावडर, मीठ आणि गुळा चा तयार केलेला पाक मिसळून एकत्र करून घ्या मिश्रण जास्त घट्ट झाल्यास थोडे पाणी टाकून छान असे एकजीव करून घ्या.
- हे मिश्रण ग्राइंडर ने छान एकजीव करून घ्या व ३० मिनिटे एका भांड्यामध्ये तसेच ठेवून द्या.
- आता गॅसवर एका भांड्यामध्ये मध्यम आचेवर तेल गरम करण्यास ठेवा तेल गरम झाल्यानंतर, आपण तयार केलेले मिश्रण छोटा चमचा अथवा कपाच्या सहाय्याने तेलामध्ये गोलाकार सोडा व दोन्ही बाजूने छान असे खरपूस तळून घ्या.
- सर्व साखरोळ्या तयार झाल्यानंतर त्या थंड होऊ द्या आणि नंतर सर्व्ह करा.
घावणे कसे बनवले जातात याची संपूर्ण माहिती
साखरोळ्या गोड असल्या तरीही त्यांचे काही आरोग्यदायी लाभही आहेत. यामध्ये वापरले जाणारे गूळ हे आयर्न, कॅल्शियम आणि फॉस्फोरस यांचा उत्कृष्ट स्रोत आहेत. गूळ शरीरात ऊर्जा वाढवण्यासाठी आणि रक्ताची पातळी सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. याशिवाय, गव्हाचे पीठ हे फायबर, जीवनसत्त्वे, आणि खनिजे यांचे उत्तम स्रोत आहेत, जे पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत.
साखरोळ्या या महाराष्ट्राच्या पारंपरिक गोड पदार्थांपैकी एक असून त्यांच्या गोड चवीमुळे आणि पोषणमूल्यामुळे त्या आजही लोकांच्या पसंतीस उतरतात.
नवनवीन रेसिपींचे अपडेट मिळवण्यासाठी कोकण कल्चर नक्की फॉलो करा तसेच सदर रेसिपी कशी वाटली हे देखील कमेंट करून जरूर कळवा.
हे देखील वाचा