IC 814 The Kandahar Hijack : नेटफ्लिक्स आणि इतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या अनेक वेब सिरीजची धामधुम पहायला मिळतेय. आणि या ओटीटी प्लॅटफॉर्म वर वेब सिरीज पाहणाऱ्यांची संख्या देखील खूप आहे. या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक वेब सिरीज येतात – जातात, काही प्रसिद्ध होतात, तर काही वादाच्या भोवऱ्यात सापडतात. IC 814 The Kandahar Hijack ही वेब सिरीज वादग्रस्त ठरली आहे.
IC 814 The Kandahar Hijack ही वेब सिरीज वादात सापडली असून लोकांचा प्रचंड रोष याबाबत दिसत आहे, मूळ घटनेतील त्यातील पात्रांची नावे या वेब सिरीज मध्ये बदलल्याने हा सगळा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळते. या वेब सिरीज वर बहिष्कार टाकण्यात यावा ही मागणी आता जोर धरू लागली आहे. या वेब सिरीजची कथा ही १९९९ च्या विमान हायजॅक घटनेवरून घेण्यात आली आहे तसेच या वेब सिरीज मध्ये या घटनेत सहभागी असणाऱ्या दहशतवाद्यांची खरी ओळख लपवण्यात आली आहे असा वादाचा मुद्दा आहे. या वेब सिरीजचे दिग्दर्शन है अनुभव सिन्हा या दिग्दर्शकाने केले असून, विमान हायजॅक झाल्याच्या घटनेवर ही कथा आधारित आहे. २९ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्स वर प्रदर्शित झालेल्या या वेब सिरीज मध्ये विशिष्ट समुदायातील दहशतवाद्यांची / अपहरणकर्त्यांची नावे निर्मात्यांनी बदलली असून त्यांना शंकर, भोला अशी ठेवल्याने ही वेब सिरीज वादामध्ये सापडली असून या वेब सिरीज वर बहिष्कार टाकण्याची मागणी करण्यात येत आहे.
IC 814 The Kandahar Hijack मागची खरी गोष्ट
The Kandahar Hijack कंधहार हायजॅक भारतातील विवादास्पद घटना आहे जी २४ डिसेंबर १९९९ ला काठमांडू येथून उड्डाण केलेल्या भारतीय विमानाच्या पाच दहशतवाद्यांनी अपहरण केले. पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या मदतीने C 814 च्या अपहरणाचा कट रचला गेला होता. कट रचण्याचे कारण असे होते की जम्मूच्या तुरुंगातून मसूद अजहर ची सुटका करणे, सरकारवर दबाव टाकून मसूद अजहर याला जम्मूच्या तुरुंगातून बाहेर काढणे हा होता. १५ जुलै १९९९ ला कोट बालवाल या ठिकाणी जेल ब्रेक दरम्यान मसुद अजहर चा साथीदार मारला गेला होता. त्यामुळे मसूद ला देखील भीती होती ती भारतीय गुप्तचर संस्था त्याला देखील चकमकीत मारून टाकतील.
हे वाचा – झुकेगा नहीं साला, बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालण्यासाठी पुष्पा २ येतोय भेटीला
IC 814 The Kandahar Hijack सरकारवर दबाव टाकून मसूद ला सोडण्यासाठी ५ दहशतवाद्यांनी मिळून विमानाचे अपहरण केलं होते. काठमांडू वरून नेपाळ येणाऱ्या इंडियन एअरलाइन्स विमानाचे अपहरण करून, एका प्रवाशाची हत्या देखील करण्यात आली होती यामुळे भारत सरकार वरील दबाव वाढला होता. विमानाचे अपहरण करून दुबईला नेऊन इंधन भरण्यात आले व तेथे काही प्रवाशांची सुटका करण्यात आली. तेथून पुढे कंधारला विमान उतरवण्यात आले, भारतीयांना सोडण्याच्या बदल्यात भारतीय तुरुंगात असलेल्या त्यांच्या साथीदारांना सोडण्याची मागणी करण्यात आली. भारत सरकारला त्यावेळी ही मागणी जीवित हानी टाळण्यासाठी मान्य करावी लागली होती. त्या वेळचे परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग हे तीन दहशतवादी घेऊन कंधारला गेले होते यामध्ये मुश्ताक अहमद जरगर, अहमद उमर सईद शेख, मसूद अजहर हे तीन दहशतवादी होते. पुढे मसूद अजहर ने जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेची स्थापना केली व तो आजही मोकाट आहे.