Easy Puran Poli Recipes पुरण पोळीचा इतिहास तुम्हाला माहित आहे का ?

Easy Puran Poli Recipes | Puran Poli Recipes | पुरण पोळीचा इतिहास | Puran Poli | पुरण पोळी | Maharashtrian Dish | puran poli | पुरण पोळी पाक कृती

Easy Puran Poli Recipes

Puran Poli पुरण पोळीचा इतिहास तुम्हाला माहित आहे का ? Easy Puran Poli Recipes -डाळ, भात, भाजी, पापड, लोणचे या सगळ्या सोबत गरमागरम पुरण पोळी आणि त्यावर साजूक तुपाची धार मन भरेपर्यंत जेवायचं. प्रत्येक सणाला जेवणाचे ताट असं असतं, इतर पदार्थ बदलत असले तरी एक पदार्थ मात्र नियमित असतो तो म्हणजे पुरण पोळी आणि मराठी घरात प्रत्येक सणाला हजेरी लावणाऱ्या या पुरण पोळीला सुद्धा एक मोठा इतिहास आहे. महाराष्ट्रात गुढीपाडवा,मकर संक्रांत, होळी, बैल- पोळा, श्रावणात इ. सणांच्या दिवशी पुरणपोळी हमखास बनवली जाते. पुरण पोळी फक्त आपल्या महाराष्ट्रातच मिळते असा जर तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, केरळ अशा भारताच्या जवळपास सगळ्या भागात पुरण पोळी बनते. सगळीकडे मटेरियल सारखंच असतं पण नाव फक्त बदलते. पुराण काळातल्या १२ व्या शतकातला दक्षिण भारतीय राजा सोमेश्वर लिहिलेल्या संस्कृत संदर्भात पुरण पोळीचा उल्लेख आढळतो. गोविंदासांनी लिहिलेल्या भैषज्यरत्नावली आणि भावप्रकाश या दोन ग्रंथात पुरण पोळीचा रेसिपी सहित उल्लेख आहे. गोड भरलेली पोळी असा उल्लेख करत म्हणतो, तूर डाळ, चणा डाळ आणि मूग डाळ या तीन प्रकारच्या डाळींचे पुरण करावं ते कणकेत भरावे आणि लाटून साजूक तुपावर भाजावं. तूर डाळ, चणा डाळ आणि मूग डाळ हे तीन प्रकारच्या डाळींचे पुरण केल जात. पेशव्यांच्या स्वयंपाक घरातही शनिवार वाड्यावर जडणाऱ्या पंगतीमध्ये पुरण पोळ्यांच ताट हमखास फिरत असणार, कारण पेशव्यांच्या खाद्य इतिहासात पिवळ्या रंगाचे गुळ, चण्याच्या डाळीचे पुरण आणि वेलची घालून साजूक तुपावर भाजलेल्या गव्हाच्या पुरण पोळीचा उल्लेख सापडतो. पानिपतच्या युद्धानंतर अनेक जण युद्धभूमी च्या भागातच स्थायिक झाले, मराठा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कुटुंबांच्या जुन्या पिढ्या पुरण पोळी बनवायच्या. महाराष्ट्रातलं खास पकवान म्हणून पुरण पोळीची ओळख आजही कायम आहे. भारताच्या दक्षिण भागात जवळपास सगळीकडे पुरण पोळी बनते. तामिळनाडूमध्ये पुरण पोळीला उपुटू म्हणतात, यामध्ये काही प्रकार नारळ आणि साखर घालूनही बनवतात, केरळमध्ये पायसाबोली नावाने, कर्नाटक मध्ये नारळा ओबाट्टू आणि मुग डाळ ओबाट्टू असे दोन प्रकार केले जातात, गुजरात मध्ये पुरण पुरी, इतकेच नाही तर कच्छ, मारवाड भागातही मूग डाळीचे पुरण वापरून पोळी बनवतात, तिथे पोळी बनवताना गव्हा ऐवजी मैद्याचा वापर केला जातो. महाराष्ट्रातही पुरण पोळीची अनेक रुपे आहेत. श्रावणी शुक्रवारी पुरण घातलेल्या करंज्या करतात, नागपूरला पराठ्या सारखी जाडसर अशी पुरण पोळी बनवतात. तर कोकण आणि पुण्यात मऊ,पातळ पदर असलेली पुरण पोळी असते. या सगळ्याला जोडणारा समान धागा म्हणजे सण. कोणत्याही सणाला घरात गोड बनवावं असा प्रघात आहे. आपल्याकडे देवाला नैवेद्य दाखवताना नैवेद्याच्या थाळीमध्ये पुरणपोळी देखील असते, करायला थोडी अवघड असली तरी सगळं सामान घरातच उपलब्ध असल्याने पुरणपोळी लोकप्रिय ठरते. साजूक तुपाची धार सोडलेली पुरणपोळी खाण्याची सर या जगात कशालाच नाही. पुरणपोळीच्या तुमच्या आठवणी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

साहित्य (Puran Poli Recipes)

Easy puran poli recipes
  • १ कप चना डाळ – २५० ग्रॅम
  • १ कप किसलेला गुळ – २५० ग्रॅम
  • मैदा – १५०
  • १/२ कप गव्हाचे पीठ – १०० ग्रॅम
  • १/२ टीस्पून मीठ
  • ३-४ वेलच्या
  • १/२ टीस्पून सुंठ
  • तेल
  • तूप

पाक कृती

पुरण पोळी हवी तशी जमत नाहीये, तर इथं तुम्हाला पाच टिप्स मध्ये सविस्तर पुरण पोळी ची रेसिपी समजेल. डाळ कशी शिजली पाहिजे, पुरण कसे बनवावे, पोळी लाटायची कशी, कोणत्या गोष्टी पाहायच्या, कोणत्या गोष्टी टाळायच्या, या सगळ्या गोष्टी पुढे दिल्या आहेत. आज आपण एकदम मऊ लुसलुशीत भरपूर गुबगुबीत पुरणपोळी कशी करायची ते बघणार आहोत. आजचा लेख हा खास नवशिक्यांसाठी आहे. बर्‍याच जणांना पुरण जमत नाही अनेक प्रॉब्लेम्स येतात.

१. सर्वप्रथम चण्याची डाळ शिजवण्यासाठी एका भांड्यामध्ये पाच कप पाणी उकळत ठेवावे. एक कप चणाडाळ तिच्या चारपट पाणी घेऊन उकळण्यास ठेवावे, उकळी आल्यावर त्यात भिजलेली चनाडाळ घालून मंद आचेवर शिजू द्या.

Join Us

२. मैदा, गव्हाचे पीठ, मीठ, हळद एकत्र भिजवून चांगले एकजीव करून घ्यावे. त्यात १ टेबल स्पून तेल घालावे, यामुळे पोळ्या चांगल्या होतात. फार जास्त मऊ किंवा घट्ट मळू नये.

३. पीठ व्यवस्थित मऊ झाल्यास, त्यात २ टेबल स्पून तेल लावून चांगले मळून हा गोळा कमीत कमी १ तास झाकण ठेवून तसेच ठेवून द्यावे.

४. चना डाळ मंद आचेवर अर्ध्या तासात चांगली शिजते. डाळ दाबून पाहावी, पिठूळ नरम झाली तर चांगली शिजली असे समजावे.

५. डाळ चाळणीत काढून, त्यातील पाणी ‘कट’ बाजूला काढावे. या पाण्याची आमटी देखील बनवली जाते.

६. डाळ आणि पाणी वेगळे करून झाल्यावर पुरण शिजवण्यास ती एका भांड्यात / कढईत १ टेबल स्पून तूप घालून त्यात शिजलेली चनाडाळ घालून त्यात किसलेला गुळ मिक्स करून मंद आचेवर गुळ पूर्ण विरघळू द्यावा.

७.१० ते १५ मिनिटांत पुरण शिजले कि गुळ आणि डाळ छान एकजीव होते. त्यामध्ये वेलची, जायफळ, सुंठ पूड टाकून पुरण एकजीव करावे.

८. पुरण थंड झाल्यावर ते मिश्रण मिक्सरमध्ये / स्मॅशर ने बारीक करून घ्यावे.

९. पोळ्या बनविण्यासाठी पीठ आपण १ तास मळून ठेवले होते. त्याला तेलाच हात लावून परत चांगले मळून, पीठाचे गोळे करून घ्यावे.

१०. मोदकासारखी पारी करून त्यात चांगल्या प्रमाणात पुरण घालून नि बंद करून हाताने चपटा करून पोळी लाटावी.

११. अशा प्रकारे सगळ्या पोळ्या लाटून झाल्यावर तवा मध्यम आचेवर ठेवून पोळी दोन्ही बाजूंनी भरपूर तूप घालून खरपूस भाजून घ्यावी.या पोळ्या खुसखुशीत बनतातच. आणि ५-६ दिवस आरामात टिकतात.

हे देखील वाचा.

पालक पनीर

घावणे

https://www.youtube.com/channel/UC_UaICnJA_RzyLWgrFWMg_g

1 thought on “Easy Puran Poli Recipes पुरण पोळीचा इतिहास तुम्हाला माहित आहे का ?”

  1. Pingback: Sakharoli Recipe महाराष्ट्राची फेवरेट झटपट तयार होणारी साखरोळी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
रणबीर कपूर ने खरेदी केली महागडी कार Ranbir Kapoor buy new Luxury Car आंबोली घाटातील ही ठिकाणे तुम्ही पाहिली का? Amboli Ghat Famous Places ‘Very high’ COVID levels detected in 7 states 1st CNG Bike Bajaj Freedom 125 Lavasa city बद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?