Earn Money Online | 3 Easy Way to Earn Money Online |Online Money Making Platform | Earn Money online | 3 best way earning money | easy way to earn |
Earn Money Online इंटरनेट मुळे या डिजिटल जगात आता सगळे काही शक्य आहे. घरबसल्या आपण बरीच कामे करू शकतो, इंटरनेट आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग खूप जवळ आले आहे, आणि या सगळ्यामुळे नोकरीची व्याख्याच बदलून गेली. आता पैसे कमवण्यासाठी विशिष्ठ पदवी अथवा विशिष्ट वयोमर्यादा असणे बंधनकारक नाही. आता ज्याच्याकडे विशिष्ठ कौशल्य असेल तर तो व्यक्ती त्या क्षेत्रात ऑनलाईन घरबसल्या पैसे कमवू शकतो. आज आपण असेच काही घरबसल्या गुंतवणुकीशिवाय असंख्य आणि नवीन असे बरेच मार्ग आहेत ज्याद्वारे आपण ऑनलाईन पैसे कमवू शकतो.
3 Easy Way to Earn Money Online
फ्रीलान्सिंग
फ्रीलान्सिंग हा एक ऑनलाईन पैसे कमविण्यासाठी उत्तम पर्याय आहे, यामध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसार काम करू शकता. तुमच्यावर कोणत्याही प्रकारचे बंधन नसते, फक्त तुम्ही तुमच्या आवडत्या कौशल्यात परफेक्ट असणे गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही क्षेत्र निवडू शकता. – कंटेंट रायटिंग, ग्राफिक्स डीझायनिंग, डेटा एन्ट्री इत्यादी अनेक प्रकारच्या अनेक नोकऱ्या/ प्रोजेक्ट उपलब्ध आहेत. तुम्ही फ्रीलान्सर म्हणून काम करू शकता.
फ्रीलान्सिंगची सुरुवात कशी कराल
पण फ्रीलान्सर म्हणून काम करण्यागोदर काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते. उदा. आपले संभाषण कौशल्य, टाईम मॅनेजमेंट, वाटाघाटी करणे, समस्या सोडवणे, ग्राहक संबंध व्यवस्थापन, करार इत्यादी. गोष्टीत तरबेज असणे अवश्य आहे. एखाद्या क्षेत्रात काम करण्याअगोदर आपल्या अंगी असणारी कौशल्य ओळखून तुम्ही फ्रीलान्सर म्हणून ग्राहकाला काय देऊ शकता याबद्दल विचार करा आणि त्यामध्ये कुशल बना. यासाठी तुमचा पोर्टफोलियो बनवून त्यात तुमचे बेस्ट जे काम असेल ते दाखवा. यामुळे प्रोजेक्ट मिळण्यास मदत होईल. एखादे काम करण्याअगोदर प्रकल्पाची व्याप्ती, जटीलता आणि बाजारातील मागणी पाहून तुमचे दर सेट करा. त्यासोबतच तुमच्या अटी, पेमेंट पद्धती आणि एक वेबसाईट बनवा, तसेच फ्रीलान्सिंग प्लॅटफॉर्म वर जाऊन तुमचे कौशल्य आणि अनुभव दर्शवा आणि ग्राहक मिळवण्यासाठी सोशल मिडीयाचा पुरेपूर वापर करा. Upwork, Fiverr, Freelancer सारखे अनेक प्लॅटफॉर्म तुम्हाला तुमची कौशल्य आणि सेवा ग्लोबल ग्राहकांना देऊ करतात.
युट्युब चॅनल
युट्युब चॅनल हा देखील एक उत्तम पर्याय आहे. युट्युब चॅनलद्वारे देखील तुम्ही चांगले पैसे कमवू शकता पण यासाठी तुम्हाला त्यात नियमितता राखणे गरजेचे आहे. नियमित विडीयो बनवून पोस्ट करणे तसेच दर्जेदार कंटेंट व्हीवर्सना दिल्याने चॅनल माॅनेटाईझ होण्यासाठीच्या ज्या नियम व अटी आहेत त्यांची पूर्तता झाल्यांनतर तुम्ही तुमच्या विडीयो वर येणारे व्हीव्सच्या हिशोबाने पैसे कमवू शकता.
चॅनल सुरु करण्यासठी खूप खर्च येतो अशातला भाग नाही तुमची सुरुवात तुम्ही मोबाईल पासून देखील करू शकता. चॅनल चे नाव देखील लगेच लोकांच्या लक्ष्यात राहील असे असावे, यामुळे साब्स्क्रायबर आणि व्हीव्स वाढण्यास मदत होते.
पण चॅनल माॅनेटाईझ होण्यासाठी १००० सबस्क्रायबर आणि ४००० पब्लिक वाॅच Hrs. पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला गुगल ऍड च्या माध्यमातून पैसे कमविण्याची संधी मिळते. काही युट्युब क्रिएटर्स महिन्याला लाखो रुपये कमवत आहेत, काही स्थितीमध्ये पहिले पेमेंट यायला पण अनेक आठवडे लागू शकतात. ते पूर्णतः तुमचा कंटेंट आणि त्याच्या क़्वालिटी वर अवलंबून असते.
अलीकडेच युट्युब ने Shorts video आणले याच्यामार्फत तुम्ही शाॅर्टस विडीयो पोस्ट करू शकता व त्याद्वारे देखील कमाई करू शकता.
अश्या प्रकारे तुम्ही व्लाॅग बनवू शकता किंवा ज्या गोष्टीची तुम्हाला आवड आहे / ज्यामध्ये कुशल आहात त्याचे विडीयो बनवून तुम्ही सुरुवात करू शकता.
ब्लॉग
ब्लॉगिंगकरून देखील ऑनलाईन कमाई केली जाऊ शकते आज खूप सारे लोक हे घरबसल्या ब्लॉगिंग करून चांगली कमाई करत आहेत. लेखनाची आवड असल्यास तुम्ही देखील ब्लॉग लिहून एक चांगला उत्पन्नाचा स्त्रोत बनवू शकता.
ब्लॉग तयार करण्यासाठी आपल्याला एक वेबसाईट तयार करावी लागेल ज्या मार्फत आपण ब्लॉग पोस्ट करू शकतो. वेबसाईट साठी उपयुक्त असे नाव आणि दर्जेदार कंटेंट असणे आवश्यक आहे. ब्लॉग लिहित असताना त्यात सातत्य असले पाहिजे. कोणतीही गोष्ट साध्य करायची असल्यास त्यात सातत्य असणे आवश्यक आहे. ब्लॉग देखील नियमित लिहिले तर आपण त्याद्वारे ऑनलाईन कमाई करू शकतो.
ब्लॉग सुरु करण्यासाठी दोन मार्ग आहेत एक म्हणजे ब्लाॅगर.कॉम हा प्लॅटफाॅर्म पूर्णतः फ्री आहे यावर तुम्ही विनामूल्य वेबसाईट बनवून सुरुवात करू शकता. यामध्ये डोमेन आणि होस्टिंग ही ब्लॉगर ची असते.
दुसरा मार्ग म्हणजे वर्ड प्रेस – डोमेन आणि होस्टिंग विकत घेऊन वेबसाईट बनवणे, यामार्फत देखील तुम्ही एक उत्तम वेबसाईट बनवू शकता यामध्ये तुम्हाल डोमेन निवडीचे स्वातंत्र्य असते. तुम्हाला हवे असलेला डोमेन तुम्ही एक ठराविक रक्कम देऊन विकत घेऊ शकता. तसेच आपल्या वेबसाईट हवे तसे डिझाईन करू शकता.
ब्लॉग लिहून तुम्ही ब्लाॅग द्वारे विविध प्रकारे कमाई करू शकता. Affiliate Marketing अनेक ई कॉमर्स साईट आहेत ज्या Affiliate Marketing चा पर्याय देतात, याद्वारे आपण ब्लॉग वर Google AdSense, Affiliate Marketing, Sponsorship इत्यादी द्वारे चांगली कमाई करू शकतो.
वाचा
New i phone 15 price, specs and features in Marathi
Insightful piece
Pingback: AICTE Internship info in Marathi इंटर्नशिप: महत्वाची माहिती आणि लाभ