लावासा बद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

लावासा हे भारतातील पहिले खाजगी शहर असून ते २५००० एकर परिसरात पसरलेले आहे.

जे  पुण्यापासून ५० आणि मुंबई पासून १८० किमी अंतरावर असलेले एक निसर्गरम्य ठिकाण आहे.  

या ठिकाणाला महाराष्ट्राचे स्वित्झर्लंड असे संबोधले जाते. 

हे शहर हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी द्वारे विकसित केले आहे,

या शहराची रचना ही इटलीच्या पोर्टोफिनो शहराप्रमाणे आहे.

लावासा मध्ये हिरवेगार पर्वत, शांत तळी आणि सुंदर घाट परिसराचा आस्वाद घेता येतो.

येथे तुम्ही बोटिंग, ट्रेकिंग, सायकलिंग आणि इतर साहसी क्रिडा प्रकारांचा आनंद घेऊ शकता 

होणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, महोत्सव आणि उत्सव  यांचे वेळोवेळी आयोजन केले जाते.

राहण्यासाठी विविध हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि गेस्ट हाऊसेसची येथे उत्तम व्यवस्था आहे.