Aayushman Bharat Yojana 2023 Best health Scheme

Aayushman Bharat Yojana, Best health Scheme आयुष्मान भारत योजना, प्रधान मंत्री जन आरोग्य योजना किंवा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना ही एक केंद्र सरकार द्वारा सुरु केलेली योजना आहे. सदर योजना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालया मार्फत आयुष्मान भारत मिशन अंतर्गत २०१८ मध्ये सुरु केली गेली. राज्य शासनामार्फत महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना २ जुलै २०१२ पासून राज्यात चालू करण्यात आली. महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व २००८ साली सुरु केलेल्या राष्ट्रीय आरोग्य विमा योजना या दोन योजनांचे आयुष्मान भारत योजनेत विलीनीकरण केले गेले, आणि दोन्ही योजना एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेत केंद्र सरकार गरीब, मध्यमवर्गीय कुटुंब व शहरातील गरीब कुटुंबाना आरोग्य विमा उपलब्ध करून देते. आयुष्यमान भारत योजना या योजनेला प्रधान मंत्री जन आरोग्य योजना असेही म्हटले जाते. आयुष्मान भारत योजना ही आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या ‘आयुष्मान भारत मिशन’ मार्फत चालवण्यात येते.. सदर योजना ही २०१८ मध्ये सुरु करण्यात आली. या योजने अंतर्गत केंद्र सरकार गरीब व शहरातील गरीब कुटुंबाना आरोग्य विमा देते ज्यामार्फत गरीब व शहरातील मध्यमवर्गीय लोकांना मोफत उपचार दिले जातात. यासाठी तुम्हाला यासाठी तुम्हाला आयुष्मान भारत या योजनेचे कार्ड काढावे लागेल. हे कार्ड बनविण्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत काही निकष/नियम निर्धारित करण्यात आलेत,त्या निकषांना पात्र ठरणारे लोक हे कार्ड बनवून सदर योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेंतर्गत समाजातील आर्थिक दृष्ट्या मागास लोकांना ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात, दर वर्षी १० कोटी कुटुंबाना प्रतिवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळत आहे. सदर लेखात आयुष्यमान भारत योजनेची संपूर्ण माहिती पाहूया.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २५ सप्टेंबर २०१९ रोजी ‘प्रधानमंत्री जन आरोग्य’ (आयुष्यमान भारत योजना) या योजनेची घोषणा केली. आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून गरीब कुटूंब व शहरी गरीब/ मध्यमवर्गीय कुटूंबातील सदस्यांना आरोग्य विमा उपलब्ध करणार आहे. आर्थिक जनगणना २०११ नुसार ग्रामीण भागातील ८ कोटी कुटुंबे तसेच शहरी भागातील २ कोटी कुटुंबे आयुष्मान भारत योजनेच्या कक्षेत येतात. सध्य स्थितीत ६२,६६७ कुटुंब पात्र आहेत. आयुष्मान भारत योजनेच्या कक्षेत ५० कोटी लोक उपचार घेऊ शकतील. प्रत्येक कुटुंबाला प्रतिवर्षी पाच लाख रुपयेचा वैद्यकीय विमा मिळतो. राज्य शासनाने सुरु केलेली “महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना” २ जुलै २०१२ पासून महाराष्ट्रातील जनतेसाठी चालू करण्यात आली तसेच २००८ साली चालू केलेल्या “राष्ट्रीय आरोग्य विमा योजना” या दोन योजनांचे “आयुष्मान भारत योजनेत” विलीनीकरण करण्यात आले. यांची सांगड घालून दोन्ही योजना एकत्रित राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.या योजनेंतर्गत हॉस्पीटल मध्ये दाखल होण्याच्या तीन दिवस आधीपासून ते डिस्चार्ज झाल्यावर १५ दिवसांपर्यंत येणारा सर्व खर्च या योजने मार्फत करता येतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सदर व्यक्तीला हॉस्पिटल मध्ये “आयुष्मान भारत योजनेचे” आयुष्यमान कार्ड दाखवावे लागेल. गोल्डन कार्ड कसे बनवायचे त्याच्या पायऱ्या पुढे दिल्या आहेत.

aayushman bharat yojana

सर्व साधारण माहिती (Aayushman Bharat Yojana)

योजनेचे नाव आयुष्मान भारत योजना
सुरुवात म. पंतप्रधान नरेंद्र मोदी – सप्टेंबर २०१८
योजनेचा प्रकारकेंद्र शासनाची योजना
लाभार्थीदेशातील नागरिक
उद्देश५ लाख रुपयांचा आरोग्य विमा / सुविधा उपलब्ध करून देणे.
वर्ष२०२३
विभाग राष्ट्रीय स्वास्थ्य प्राधिकरण
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन / ऑफलाईन

आयुष्यमान भारत योजनेत कोणाला मिळत आहे विमा कव्हर ?

केंद्र सरकार महिला, लहान मुले, वरिष्ठ नागरिक प्रौढ यांना प्राधान्याने सामील करून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचा आकार व वयाचे कोणतेही बंधन नाही. सर्व शासकीय रुग्णालये तसेच पॅनलवरील रुग्णालयांमध्ये “आयुष्मान भारत योजनेच्या” लाभार्थ्यांसाठी Cashless उपचार केले जातील.

आयुष्मान भारत योजना पात्रता

एस.ई.सी.सी. च्या अहवालानुसार आयुष्यमान भारत योजनेत डी१, डी२, डी३, डी४, डी५ आणि डी६ कॅटेगरीतील लोकांना आयुष्यमान भारत योजनेत समाविष्ट करण्यात आले आहेत. शहरी भागातील लाभार्थ्यांसाठी पेशा / कामा नुसार लोक या योजनेत सहभागी होऊ शकतात. राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेत जे आधीपासून सहभागी असलेले आपोआप आयुष्यमान भारत योजनेत सामील झाले आहेत.

ग्रामीण भाग पात्रता

पक्के घर नसलेले, कुटूंबात वयस्कर व्यक्ती नसणे, महिला कुटुंब प्रमुख, दिव्यांग व्यक्ती, अनुसुचीत जाती – जमातीतील व्यक्ती, भूमिहीन व्यक्ती, वेठबिगार/ मजूर, सफाई कामगार हे आयुष्यमान भारत योजनेस पात्र असतील.

त्याचसोबत ग्रामीण परिसरातील बेघर, निराधार, आदिवासी इ. लोक “आयुष्मान भारत योजनेचा” लाभ घेऊ शकतात.

शहरी भाग पात्रता

भिकारी, कचरा वेचणारे, घरकाम करणारे, छोटे दुकानदार, शिवणकाम करणारे, फेरी वाले, रॅगपीकर, टेलर स्वीपर, हस्तकला कामगार, स्वच्छता कामगार, माळी, बांधकाम कामगार, कामगार, चित्रकार, वेल्डर, सुरक्षा रक्षक, कुली, वॉशर मॅन, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, असेंबलर, दुरुस्ती कामगार, परिवहन कामगार, रिक्षा चालक, कंडक्टर, कार्ट खेचाण, वेटर, दुकानातील कामगार, सहाय्यक, शिपाई, वितरण सहाय्यक, मोची, फेरीवाला, विक्रेते, रस्त्यावर काम करणारे ,व इतर अन्य व्यक्ती.

Aayushman Bharat Yojana

आयुष्मान भारत योजना ऑनलाईन नोंदणी कशी करावी

आयुष्यमान भारत योजनेसाठी नोंदणी खूप सोपे आहे. सर्व लाभार्थींना लागू आहे, जर आपल्याला PMJY साठी ऑनलाइन नोंदणी करायची असेल तर आपण पुढे दिल्या प्रमाणे करू शकता.

पी.एम.जे.ए.वाय. योजनेसाठी ऑफिशिअल वेबसाईट ला भेट द्या.

मी पात्र या टॅब यावर क्लिक करा.

त्यानंतर मोबाईल नंबर Captcha कोड सबमिट करा आणि जनरेट ओटीपी बटणावर क्लिक करा.

पुढे आपले राज्य आणि नाव, रेशन कार्ड नंबर(फॅमिली नंबर), मोबाइल नंबर टाका.

आपले कुटुंब आयुष्मान भारत योजनेत समाविष्ट असल्यास आपले नाव निकालामध्ये दिसून येते.

आवश्यक असणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड / पॅनकार्ड
  • संपर्क तपशील (मोबाइल, पत्ता, ईमेल)
  • जातीचे प्रमाणपत्र
  • उत्पन्न दाखला (वार्षिक उत्पन्न वर्षाकाठी १ लाखांपर्यंत असेल), कुटुंबाची सद्यस्थिती – संयुक्त / विभक्त

शासन निर्णय – मफुयो-२०२३/प्र.क्र.१६०/आरोग्य६ -२८जुलै,२०२३ क्लिक करा.

हॉस्पिटल लिस्ट पहा क्लिक करा.

आयुष्यमान भारत योजना कार्ड कसे तयार करायचे

१. सर्वात आधी https://beneficiary.nha.gov.in/ भेट द्यायची.

२.पुढे पोर्टल च्या होमे पेज वर beneficiary व Operator असा पर्याय असेल त्यापैकी beneficiary हा पर्याय निवडून मोबाईल क्रमांक प्रविष्ट करून Verify वर क्लिक करा.

३. Verify करून एक OTP येईल तो टाकून दिलेला Captcha टाका.

४. पुढे Log In पर्याया वर क्लिक करा.

५. Scheme, State, District आणि Search By असे पर्याय दिसतील, त्यामध्ये Scheme मध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना निवडून State मध्ये आपले राज्य District मध्ये तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता तो जिल्हा निवडून Search By मध्ये तुम्हाला तीन पर्याय दिसतील Family ID, Aadhar Number आणि Name.

६. यापैकी आधार नंबर टाकून Search करा.

७. पुढे तुम्हाला रेशन कार्ड मधील नावे दिसतील, प्रत्येकाचे नाव तुम्ही पाहू शकता. तिथेच पुढे तुमच्या आयुष्यमान भारत योजना कार्डचा Status दिसेल.

८. कार्ड काढले नसेल Not Generated असे दिसेल.

९. ज्या व्यक्तीच आयुष्यमान कार्ड काढायचे आहे, त्या व्यक्ती सामोरील ॲक्शन मधील कार्ड वर क्लिक करा.

१०. व्हेरिफाय करून घ्या व दिलेली माहिती वाचून Allow करा.

११. Aadhar OTP सिलेक्ट करा, आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर आलेला OTP टाकून, Authenticate करून घ्या.

१२. आता पुढील पेज ओपन होईल येथे स्क्रोल करून खाली eKYC चा पर्याय दिसेल त्यामध्ये आधार ओटीपी /फिंगरप्रिंट असे पर्याय दिसतील त्यापैकी आधार ओटीपी हा पर्याय निवडा आणि आलेला (Aadhar One Time Password) OTP टाकून, पुढे आलेली माहिती वाचून घ्या. Accept करून Allow करा.

१३. Allow केल्यानंतर मोबाईल वर एक One Time Password येईल, तो टाकून झाल्यावर तुमची माहिती दिसेल. भरलेली माहिती आणि पोर्टल वरील माहिती बरोबर आहे का ते तपासून घ्या.

१४. Match Score green आहे का तपासून पाहा.

१५. माहिती तपासून तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. त्यासाठी परवानगी देण्यासाठी Allow करून तुमचा Live फोटो अपलोड करा, आणि Proceed वर क्लिक करा.

१६. दिलेली माहिती भरून, मोबाईल नंबर टाकून Verify करून घ्या. व मोबाईल वर आलेला OTP टाका.

१७. पुढील माहिती भरून घ्या जन्म वर्ष, नाते (रेशन कार्ड वरील नाते – कुटुंब प्रमुख / अथवा जे नाते असेल ते टाकावे),पिन कोड, राज्य, जिल्हा, ग्रामीण भाग/ शहरी भाग, उप जिल्हा/ तहसील, गाव इ.

१८. संपूर्ण माहिती भरून Submit बटनावर क्लिक करा. पुढे तुमच कार्ड जनरेट होईल आणि Download चा पर्याय दिसेल. तेथून कार्ड Download करून घ्या.

सुकन्या समृद्धी योजना

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना

मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना

Join our Whats app Group Click Here

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
All New Mahindra’s Budget Friendly Compact SUV XUV 3X0 Launch पृथ्वी बद्धल या रोचक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? top fact about earth उन्हाळ्यात आरोग्याची अशी घ्या काळजी. सुपरस्टार महेश बाबू चे कार कलेक्शन पाहून व्हाल थक्क | Mahesh Babu Luxury Car Collection Ferrari Purosangue फरारी ने लाँँच केली SUV तुम्ही पाहिली का ?