सुकन्या समृद्धी योजना | Sukanya Samriddhi Yojana details in Marathi

Sukanya Samriddhi Yojana in Marathi Sukanya Samriddhi Yojana marathi, Sukanya Samriddhi Yojana Maharashtra, Sukanya Samruddhi Yojna Details in Marathi, Sukanya Samruddhi Yojna

Sukanya Samriddhi Yojana

सुकन्या समृद्धी योजना Sukanya Samriddhi Yojana

Sukanya Samriddhi Yojana in Marathi
केंद्र सरकार आणि राज्य सरकार राज्यातील तसेच देशातील जनतेसाठी अनेक महत्वकांक्षी योजना राबवत असते. २२ जानेवारी २०१५ रोजी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “बेटी बचाओ, बेटी पढाओ.” हे अभियान सुरु करण्यात आले, या योजने अंतर्गत मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना राबवली जाते, मुलीचे शिक्षण, आरोग्य, मुलीचे लग्न आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी हि खूप फायदेशीर बचत योजना आहे. कमी गुंतवणुक असलेली हि केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेला Sukanya Wealth Account, सुकन्या समृद्धी खाते, पंतप्रधान सुकन्या योजना या नावाने देखील ओळखले जाते. वरील योजने नुसार आई वडील आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी किंवा मुलीच्या लग्न खर्चासाठी दर महिन्याला ठराविक पैसे जमा करून मुलगी २१ वर्षाची झाल्यावर परतावा म्हणून मोठी रक्कम मिळते.


या योजने साठी मुलीचे वय हे (०-१०) असणे आवश्यक आहे. एका कुटुंबात जास्तीत जास्त २ सुकन्या समृद्धी योजनेची खाती खोलू शकता. कमीत कमी गुंतवणूक हि २५०/- रूपये ते १.५ लाख रुपये (वार्षिक) यामध्ये तुम्ही प्रत्येक महिना, ३ महिने, ६ महिने किंवा वार्षिक अशा प्रकारे तुमच्या सोयीनुसार कधीही गुंतवणूक करू शकता. सध्या सुकन्या समृद्धी योजने मध्ये आपल्या गुंतवणुकीवर ८% परतावा मिळतो. हा व्याजदर दर तिमाही मध्ये बदलत असतो. या योजनेची सुरुवात ही २०१५ साली केली त्या वेळी या योजनेचा व्याजदर हा ९.१ टक्के इतका होता. सध्य स्थितीत हाच दर ७.६ टक्के आहे. अर्थव्यवस्थेतील चढ उतारांप्रमाणे कमी जास्त होत असतो.

सुकन्या समृद्धी योजना खाते खालील कोणत्याही राष्ट्रीयकृत बँक मध्ये उघडता येते.

बँक ऑफमहाराष्ट्र  Bank of Maharashtra बँक ऑफ इंडिया BOI
सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया Central Bank of India इंडियन ओवरसीज बँक Indian Overseas Bank
इंडियन बँक Indian Bank इंडियन बँक Indian Bank
आयडीबीआय बँक IDBI Bank आय सी आय सी आय ICICI Bank
देना बँक Dena Bank कॉर्पोरेशन बँक Corporation Bank
कॅनरा बँक Canara Bank बँक ऑफ बडोदा Bank Of Baroda
एक्सिस बँक Axis Bank आंध्रा बँक Andra Bank
इलाहाबाद बँक Ilahabad Bank भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया State Bank of India
स्टेट बँक ऑफ मैसूर State Bank of Mysore स्टेट बँक ऑफ हैदराबाद State Bank of Hyderabad
स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर Sate bank of Bikaner & Jaipur स्टेट बँक ऑफ पटीयाला State Bank of Patiyala
विजया बँक Vijaya Bank युनायटेड बँक ऑफ इंडिया United Bank of India
युनियन बँक ऑफ इंडिया Union Bank of India युको बँक UKO Bank india
सिंडीकेट बँक Syndicate Bank सिंडीकेट बँक Syndicate Bank
पंजाब नॅशनल बँक Panjab National Bank पंजाब अँड सिंध बँक Panjab And Sindh Bank
ओरीयंटल बँक ऑफ कॉमर्स Oriental Bank Of Commerce स्टेट बँक ऑफ त्रावणकोर State Bank of Travancore

Sukanya Samriddhi Yojana Application Process बँक मध्ये खाते उघडण्याची पद्धत

१) सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतीही ऑनलाईन सुविधा नाही या योजनेचा फॉर्म फक्त ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करू शकता, अथवा संबंंधित बँक मधून घ्यावा लागेल.

२) अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या झेरोक्स प्रती जोडून अर्ज बँक मध्ये जमा करा.

३) बँक जोडलेल्या कागदपत्रांची छाननी केली जाईल.

४) खाते उघडण्यासाठी कमीत कमी २५०/- रुपये जमा करावे लागतील.

५) पैसे भरल्या नंतर बँक कडून पासबुक मिळते त्यामध्ये १५ वर्ष सलग गुंतवणूक / पैसे भरावे लागतील.

६) अशा प्रकारे बँकच्या माध्यमातून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडण्याची पद्धत

१) सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतीही ऑनलाईन सुविधा नाही या योजनेचा फॉर्म फक्त ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करू शकता, अथवा संबंंधित पोस्ट ऑफिस मधून घ्यावा लागेल.

२) अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या झेरोक्स प्रती जोडून अर्ज पोस्ट ओफिस मध्ये जमा करा.

३) पोस्ट ओफिस जोडलेल्या कागदपत्रांची छाननी केली जाईल.

४) खाते उघडण्यासाठी कमीत कमी २५०/- रुपये जमा करावे लागतील.

५) पैसे भरल्या नंतर पोस्ट ओफिस कडून पासबुक मिळते त्यामध्ये १५ वर्ष सलग गुंतवणूक / पैसे भरावे लागतील.

६) अशा प्रकारे पोस्ट ऑफीसच्या माध्यमातून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

Sukanya Samruddhi Yojana
Sukanya Samruddhi Yojana

Sukanya Samriddhi Yojana | What is the Structure of this scheme ? / संरचना

१) आपले खाते सुरु झाल्यानंतर तुम्ही गुंतवणुक सुरु केल्यानंतर तुमचे पैसे हे मुलीच्या २१ वर्षा पर्यंत ब्लॉक होऊन जातात.ते आपणास मुलीच्या २१ व्या वर्षी मिळतात, तसेच मुलीच्या १८ व्या वर्षी ५०% रक्कम हि मुलीच्या शिक्षणासाठी काढू शकता तेही मुलीचे कॉलेज ला ऍडमिशन झाल्यानंतर संबधित कागद पत्रे देऊन ५०% रक्कम काढू शकता. तसेच २१ व्या वर्षी शिल्लक अथवा पूर्ण रक्कम मिळते.

२) सुकन्या समृद्धी योजना खाते खोलल्या नंतर सलग १५ वर्षे गुंतवणूक करणे गरजेचे आहे. उदा. (मुलीच्या वयाच्या ०-१०) मुलीच्या जन्मापासून खाते खोलल्या नंतर दर वर्षी जर १,५०,०००/- असे / किंवा दर महा १०,०००/- ते १२,५००/- १५ वर्ष गुंतणूक केल्यास मुलीच्या वयाच्या २१ व्या वर्षी ६७,००,०००/- लाखांचा टॅक्स फ्री परतावा मिळतो.
यात नियमित १५ वर्ष गुंतणूक करणे गरजेचे आहे जर एखाद्या वर्षी गुंतवणुकीत खंड पडल्यास सुकन्या समृद्धी योजना खाते निष्क्रिय होऊ शकते.
शून्य जोखीम.

३) ८% फिक्स परतावा जो एफ.डी. वगैरे पेक्षा उत्तम आहे.

४) तसेच सुकन्या समृद्धी योजनेचा संपूर्ण परतावा हा कर मुक्त असतो.

५) सुकन्या समृद्धी योजना खाते उघडल्यावर फक्त १५ वर्षा पर्यंत त्या खात्यात तुम्ही पैसे भरायचे असतात. पुढील १५ ते २१ वर्ष या खात्यात पैसे भरण्याची गरज नसते या योजनेत ३५.२७ % रक्कम आपली तसेच उर्वरित ६४.७३ % रक्कम हि व्याजाच्या स्वरुपात मिळते. या योजनेचे मुख्य उद्धिष्ट मुलींचे सामाजिक आर्थिक तसेच त्यांचे जीवनमान सुधारून त्यांचा शैक्षणिक विकास साधून त्यांना आत्मनिर्भर करणे.

६)योजनेतील नवीन बदल-

या अगोदर सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत एका कुटुंबातील फक्त २ मुलींना लाभ घेता येत होता, परंतु आता नवीन बदला नुसार एकाच कुटुंबातील ३ मुलीना सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येईल.

योजनेचे नाव सुकन्या समृद्धी योजना
विभाग महिला व बाल विकास विभाग
सुरुवात कधी व कोणी केली २२ जानेवारी २०१५ केंद्रसरकार / पंतप्रधान नरेंद्र मोदी
लाभार्थी कुटुंबातील लहान मुली
लाभ आर्थिक सहाय्य
उद्देश मुलींच्या कल्याणासाठी प्रोत्साहन देणे
अर्ज करण्याची पदधत ऑफ लाईन पद्धतीने पोस्ट ऑफिस मार्फत
Sukanya Samriddhi Yojana in Marathi

महत्वाच्या लिंक

सुकन्या समृद्धी योजना ऑफिशिअल वेबसाईट क्लिक करा

सुकन्या समृद्धी योजना शासन निर्णय क्लिक करा

सुकन्या समृद्धी योजना पोस्ट ऑफिस फॉर्म क्लिक करा

सुकन्या समृद्धी योजना अर्ज क्लिक करा

Benefits of Sukanya Samruddhi Yojana सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे

मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यास मदत होते.
सध्या उपलब्ध असलेल्या व्याजदरापेक्षा या योजने मध्ये व्याजदर चांगला मिळतो.
केंद्र सरकारची योजना असल्यामुळे सरकारकडून पैश्याची हमी दिली जाते.
पैसे बुडण्याची शक्यता नाही.
मुलीचे शिक्षण, आरोग्य,तसेच भविष्यासाठी उत्तम बचत योजना आहे.
देशातील प्रत्येक मुलीला याचा लाभ घेता यतो.
राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये सुकन्या समृद्धी खाते उघडून लाभ घेता येतो.
सुकन्या समृद्धी योजने मध्ये चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळते.
योजनेचा कालावधी २१ वर्ष असला तरी प्रत्यक्षात लाभार्थ्याला फक्त १५ वर्ष पैसे भरावे लागतात. पुढील १६ ते २० वर्ष पैसे भरावे लागत नाहीत.
अनाथ मुलीला दत्तक घेतल्यास देखील सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत लाभ दिला जातो.

Disadvantage of Sukanya Samriddhi Yojana सुकन्या समृद्धी योजनेचे तोटे

या योजनेचा गुंतवणूक कालावधी हा २१ वर्ष आहे.
या योजनेत मिळणारा सध्याचा व्याजदर हा ७.६ % इतका आहे. २१ वर्ष गुंतवणूक करून कमी लाभ दिला जातो जो इतर म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करून मिळणाऱ्या लाभापेक्षा खूप कमी आहे.
२१ वर्षा अगोदर मुलीचे लग्न झाल्यास या मुलीला या योजनेचा लाभ मिळत नाही, तिला या योजनेतून निष्क्रिय केले जाते.
सुकन्या समृद्धी योजनेत अधिकतम गुंतवणूक १.५ लाख आहे परंतु या पेक्षा जास्त रक्कम गुंतवल्यास त्या जादा रकमेवर व्याज दिले जात नाही.

Eligibility पात्रता

अर्जदार महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.

अटी

मुलीच्या जन्मापासून तिच्या वय वर्ष १० या कालावधीत सुकन्या समृद्धी खाते उघडणे गरजेचे आहे. याचा लाभ वाय वर्ष १० च्या आतील मुलींनाच घेता येतो.

सुकन्या समृद्धी खात्या मध्ये पैसे भरण्यासाठी रोख रक्कम, डिमांड ड्राफ्ट, चेक च्या सहाय्याने भरावे लागतात.

मुलीचे वर २१ वर्ष झाल्यावर सदर गुंतवणूकीची रक्कम मिळते.

फक्त मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

खाते बंद करायचे असल्यास

सुकन्या समृद्धी खाते सुरु करून ५ वर्ष पूर्ण झाल्यास खाते बंद करत येते.

लाभार्थीचा अथवा पालकाचा मृत्यु झाल्यास हे खाते बंद करता येते.

लाभार्थ्यास आजार झाल्यास अशा स्थितीत सदर खाते बंद करू शकतो.

सुकन्या समृद्धी खाते उघडण्यास आवश्यक कागद पत्रे

  • मुलीच्या जन्माचा दाखला
  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • आई-वडीलांचे मतदान ओळखपत्र
  • रेशन कार्ड
  • वीज बिल
  • मुलीच्या आई वडीलांचा फोटो
  • रहिवासी दाखला

मुलीचे आई वडील नसल्यास मुलीची देखभाल करणाऱ्या व्यक्तीचे कागदपत्र असणे अवश्यक आहे.

गुंतवणूक तक्ता

MONTHLY YEARLY 14 YEARS MATURITY
250 3000 42000 127474
500 6000 84000 254948
1000 12000 168000 509895
5000 60000 840000 2549477
10000 120000 1680000 5098955
12500 150000 2100000 6373693

Join our Whatsapp Group Click Here

सदर योजने अंतगर्त विचारले जाणारे प्रश्न

सुकन्या समृद्धी योजनेचा गुंतवणूक कालावधी किती आहे ?

सुकन्या समृद्धी योजनेचा गुंतवणूक कालावधी हा १५ वर्षाचा आहे.

सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत ठेवीचा कालावधी किती आहे ?

– सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत ठेवीचा कालावधी हा २१ वर्षाचा आहे.

सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत परतावा हा करमुक्त असतो का ?

– सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत ठेवीचा परतावा पूर्णतः करमुक्त असतो.

सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत व्याजदर किती मिळतो ?

– या योजनेची सुरुवात ही २०१५ साली केली त्या वेळी या योजनेचा व्याजदर हा ९.१ टक्के इतका होता. सध्य स्थितीत हाच दर ७.६ टक्के आहे. अर्थव्यवस्थेतील चढ उतारांप्रमाणे कमी जास्त होत असतो.

सुकन्या समृद्धी योजने मधील पैसे कधी काढू शकतो ?

– तुम्ही गुंतवणुक सुरु केल्यानंतर तुमचे पैसे हे मुलीच्या २१ वर्षा पर्यंत ब्लॉक होऊन जातात.ते आपणास मुलीच्या २१ व्या वर्षी मिळतात, तसेच मुलीच्या १८ व्या वर्षी ५०% रक्कम हि मुलीच्या शिक्षणासाठी काढू शकता तेही मुलीचे कॉलेज ला ऍडमिशन झाल्यानंतर संबधित कागद पत्रे देऊन ५०% रक्कम काढू शकता. तसेच २१ व्या वर्षी शिल्लक अथवा पूर्ण रक्कम मिळते.

Sukanya Samriddhi Yojana सुकन्या समृद्धी योजनेची संपूर्ण माहिती आपणास प्राप्त झाली असेल अशी मी आशा करतो, सदर योजनेबाबत काही प्रश्न असल्यास आम्हाला कमेंट करून किंवा मेल करून जरूर कळवा. आम्ही लवकरात लवकर आपल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू. माहिती आवडल्यास आपल्या मित्रमंडळींना शेअर करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
All New Mahindra’s Budget Friendly Compact SUV XUV 3X0 Launch पृथ्वी बद्धल या रोचक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? top fact about earth उन्हाळ्यात आरोग्याची अशी घ्या काळजी. सुपरस्टार महेश बाबू चे कार कलेक्शन पाहून व्हाल थक्क | Mahesh Babu Luxury Car Collection Ferrari Purosangue फरारी ने लाँँच केली SUV तुम्ही पाहिली का ?