PM Suryoday Yojana राम मंदिर सोहळा पार पडल्यानंतर अवघ्या काही वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेसाठी प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा केली. या योजनेमार्फत सरकारद्वारे देशातील एक कोटी कुटुंबांना छतावरील सौर पॅनल देण्यात येणार आहेत. याद्वारे सोलर पॅनल बसवण्याचा विचार करत असणाऱ्यांसाठी जणू पर्वणीच आहे. या योजनेद्वारे शाश्वत ऊर्जेच्या वापरासोबतच विजेची कमालीची बचत होणार आहे. या अंतर्गत केंद्र सरकार आपणास तीन किलो वॅट पॅनलवर ४० टक्के सबसिडी तसेच दहा किलो वॅट साठी २० टक्के अनुदान शासनामार्फत दिले जाईल. संपूर्ण भारतभरात शहरी आणि ग्रामीण भागात छतावरील सोलर पॅनल साठी विशेष प्रोत्साहन दिले जात आहे. याचा परिणाम २० ते २५ गिगावॅट ऊर्जा क्षमता वाढेल. तसेच राज्यातील वीज वितरण कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होऊन त्यांचे आर्थिक आरोग्य सुधारेल. ज्या व्यक्तींना या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठी अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज उपलब्ध आहे तेथून अर्ज करू शकता. तीन किलो वॅट प्लांट साठी साधारणता १ लाख २६ हजार रुपये खर्च येतो त्यातील ५४ हजार सरकार सबसिडी देते यामुळे हा प्लांट लावण्यासाठी आपल्याला किमान खर्च ७२ हजार रुपये इतका होतो तसेच प्लांट हा प्लांट एकदा बसवल्यानंतर याचे आयुष्यमान हे किमान पंचवीस वर्षाचे आहे, या हिशोबाने जर पाहिले तर २५ वर्षासाठी प्रत्येक दिवशी सरासरी आठ रुपये खर्च येतो. या प्लांट द्वारे स्वतःच्या विजेचे गरज पूर्ण होऊन, जादा तयार झालेली वीज विकून देखील कमाई करू शकता. या योजनेमार्फत देशभरातील एक कोटी घरांमध्ये सोलर पॅनल बसवण्याचे लक्ष आहे. तस पहाल तर सरकार मागील एक दशकापासून “नॅशनल रुफ टॉप स्कीम” द्वारे सोलर पॅनल बसवण्याचे काम करत आहे. पण ही योजना नियोजित वेळेच्या खूप मागे आहे. प्रधानमंत्री सूर्योदय योजनेद्वारे ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्यासाठी चालना देणे. विजेची बचत, आणि पर्यावरण संरक्षण ही उद्दिष्टे समोर ठेवून बनवली गेली आहे.
सोलर एनर्जी वापरणारे टॉप १० राज्य
राज्य | सोलार रूफ स्टॉप कॅपॅसिटी (मेगावॅट) |
---|---|
गुजरात | २८९८.१६ |
महाराष्ट्र | १७१६.३० |
कर्नाटक | १५६२.११ |
राजस्थान | १००२.४४ |
केरळ | ५१२.६७ |
हरियाणा | ४८६.२३ |
तमिळनाडू | ४४९.२२ |
तेलंगणा | ३४३.७८ |
पंजाब | २९८.९२ |
मध्य प्रदेश | २९६.०२ |
PM Suryoday Yojana सर्वसाधारण माहिती
योजनेचे नाव | PM Suryoday Yojana |
कोणी सुरू केली | पंतप्रधान नरेंद्र मोदी |
उद्दिष्ट | ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनणे, विजेची बचत, पर्यावरण संरक्षण |
कधी सुरू केली | २२ जानेवारी २०२४ |
लाभार्थी | देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय लोक |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकृत संकेतस्थळ | https://solarrooftop.gov.in/ |
PM Suryoday Yojana पात्रता निकष
निवासी स्थिती
या योजनेचा लाभ घेण्यासाठी भारतीय असणे गरजेचे आहे, केवळ इथल्या लोकांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
उत्पन्न
सदर योजनेचा फायदा हा गरजूंना होईल याची खात्री करण्याकरिता अर्जदाराच्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र तसेच त्याचे उत्पन्न हे वार्षिक एक लाख ते दीड लाख असणाऱ्या अल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यास याचा लाभ घेता येतो.
मालमत्तेचा मालकी हक्क
जा घरावर सोलर पॅनल बसवणार त्या घराचा मालकी हक्क हा अर्जदाराकडे असणे आवश्यक आहे.
अगोदर लाभ घेतलेले लाभार्थी
या योजनेअगोदर एखाद्या लाभार्थ्याकडे अगोदरच सोलर पॅनल युनिट असेल, किंवा या अगोदर एखाद्या योजनेचा लाभ घेतला असेल अशा लाभार्थ्यांना सोडून, ज्यांना लाभ मिळाला नाही अशा लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येते.
PM Suryoday Yojana उद्दिष्टे
देशात चालू असलेल्या “नॅशनल रुफ टॉप स्कीम” द्वारे सुरू असलेली योजना तिला पंतप्रधान सूर्योदय योजनेमार्फत अधिक प्रभावी करणे.
ऊर्जा क्षेत्रातील वितरण कंपन्यांना आर्थिक स्थिरता प्राप्त करणे, आणि त्यांचा भार कमी करणे.
ऊर्जा क्षेत्रावरील भार कमी करून शाश्वत ऊर्जेचा पुरेपूर वापर करून ऊर्जा क्षेत्रात भारताला अग्रेसर बनवणे.
मध्यमवर्गीय लोकांवरील अतिरिक्त वीज देयक भार कमी करून त्यांचे जीवनमान सुधारणे.
सौर ऊर्जेच्या वापरास प्राधान्य देऊन नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे
आवश्यक कागदपत्रे
प्रधानमंत्री सूर्योदय योजने साठी अर्जदारांनी भरलेल्या पडताळणीसाठी महत्त्वाच्या आवश्यक कागदपत्रांची दस्तऐवज यादी. सदर अर्जदाराकडे पुढील सगळे दस्तऐवज असणे आवश्यक आहे.
१. अर्जदाराचे आधार कार्ड
२. लाईट बिल
३. उत्पन्न दाखला
४. मोबाईल नंबर
५. बँक पासबुक
६. पासपोर्ट साईज फोटो
७. रेशन कार्ड
८. अधिवास पुरावा.
या योजनेसाठी अर्ज भरणे लवकरच सुरू होईल अधिकृत साईडला भेट देऊन अर्जदार पीएम सूर्योदय योजनेसाठी अर्ज करू शकतो. बीपीएलधारक किंवा गरीब श्रेणीतील नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी वेबसाईटवर लिंक तयार होताच तुम्ही त्यासाठी नोंदणी करू शकता.
PM Suryoday Yojana अर्ज कसा करावा?
१. प्रथम तुम्हाला पंतप्रधान सूर्योदय योजना https://solarrooftop.gov.in/ या ऑफिशियल पोर्टल वर क्लिक करा.
२. होम पेज ओपन होईल Apply वर क्लिक करा.
३. पुढे आपले राज्य आणि जिल्हा सिलेक्ट करून दिलेली इतर माहिती भरा.
४. त्यानंतर तुमचा विज बिल वरील ग्राहक क्रमांक भरा.
५. विज बिल खर्च आणि इतर माहिती भरून झाल्यानंतर सोलर पॅनल माहिती भरा.
६. आता आपल्या घराच्या छताचे माप भरा.
७. आपल्या छताच्या मापानुसार नुसार आपल्याला सोलर पॅनल सिलेक्ट करायचे आहे.
८. अशाप्रकारे अर्ज भरून सबमिट करा. अर्ज भरल्यानंतर सरकार या योजनेअंतर्गत सबसिडी आणि इतर बाबींची पूर्तता करून सोलर पॅनल बसवून दिले जाईल.
PM Suryoday Yojana ऑफलाईन अर्ज कसा करावा?
जे नागरिक आणि कुटुंब प्रधानमंत्री सूर्योदय योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करू इच्छितात.
१. प्रधानमंत्री सूर्योदय योजने साठी विभागीय कार्यालयातून योजनेविषयी संपूर्ण माहिती घ्यावी लागेल.
२. विभागीय कार्यालयातून प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा नोंदणी फॉर्म तुम्हास उपलब्ध होईल.
३. सदर फॉर्म संपूर्ण वाचून व्यवस्थित भरून घ्या.
४. तसेच सोबत जोडावयास सांगितलेले सगळे दस्तऐवज स्व प्रमाणित करा.
५. सर्व कागदपत्रांसह रजिस्ट्रेशन फॉर्म जमा करा, व त्याची पावती घ्या.
वरील स्टेप द्वारे तुम्ही ऑफलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. आणि सदर योजनेचा लाभ घेऊ शकता. ज्यांना ऑनलाईन शक्य नसल्यास ते अर्जदार ऑफलाईन रजिस्ट्रेशन मार्फत अर्ज करू शकता.
PM Suryoday Yojana फायदे
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेमुळे भारतीय जनतेला कोणते फायदे होणार आहेत हे पुढे दिले आहेत.
- पी एम सूर्योदय योजनेमुळे देशातील गरीब व मध्यमवर्गीय लोकांना जास्तीच्या वीज बिलातून सूट मिळणार आहे.
- शाश्वत वीज निर्मिती आणि ऊर्जेचा वापर कमी करणे या माध्यमातून एक कोटी एक कोटी जनतेला त्यांच्या घरांच्या छतावर सोलर पॅनल देऊन २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करणे.
- ऊर्जा क्षेत्रावरील भार कमी करून ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनणे.
- विज बिलावरील मोठा खर्च कमी करणे.
- मोफत विजेचा प्रश्न प्रधानमंत्री सूर्योदय योजनेमार्फत पूर्ण करणे.
- देशातील गरीब तसेच मध्यमवर्गीय नागरिकांना कोणतेही बिल न भरता विज वापरण्यास सक्षम बनवणे.
- केंद्र सरकार द्वारा देशातील सर्व गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळेल.
- या योजनेद्वारे लाभार्थ्याला २४/७ तास वीज मिळेल सोबत सामाजिक व आर्थिक विकास साधता येईल.
अधिकृत वेबसाईट क्लिक करा
Indira Gandhi National old Age Pension Scheme
Mukhyamantri Saur Krushi Pump Yojna 2023
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेमुळे संपूर्ण भारतातील मध्यमवर्गीय जनतेला सोलर पॅनलच्या योजनेमार्फत विज बिलातून दिलासा मिळणार आहे. तसेच सौर ऊर्जेच्या वापरामुळे शाश्वत ऊर्जेचा वापर हा भारताच्या विकासासाठी तसेच आर्थिक स्थिरतेसाठी होणार आहे. या योजनेमार्फत संपूर्ण भारताला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याचे लक्ष आहे.
Pingback: Electoral Bonds वर का बंदी घातली गेली? जाणून घ्या संपूर्ण माहिती.