Mahindra XUV 3XO झाली लॉन्च, मिळणार तगडे फीचर्स

Mahindra XUV 3XO
Mahindra XUV 3XO

Mahindra XUV 3XO भारतात महिंद्रा कंपनी आपल्या दमदार वाहनांसाठी ओळखली जाते, भारतीय बाजारपेठेत तसेच जगभर अनेक दमदार वाहने लॉन्च करून एक वेगळाच ठसा उमटवला आहे. भारतात आपणास रस्त्यावर स्कॉर्पिओ, थार, एक्स यु व्ही ७०० अशी महिंद्रा कंपनीची अनेक वाहने पाहण्यास मिळतात. या लेखात आपण Mahindra XUV 3XO या नवीन लॉन्च झालेल्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

२९ एप्रिल २०२४ रोजी Mahindra XUV 3XO या कॉम्पॅक्ट एसयूव्ही च्या लॉन्चिंग ची घोषणा केली, भारतात या कारची डिलिव्हरी ही २६ मे पासून सुरू होणार आहे. या कॉम्पॅक्ट एसयूव्ही ची किंमत ही ७.४९ लाख – १३.९९ लाख इतकी आहे.Mahindra XUV 3XO या कारचे भारतीय बाजारपेठेत नऊ व्हेरिएंट उपलब्ध आहेत. तसेच यामध्ये पेट्रोल, टर्बो पेट्रोल आणि डिझेल असे तीन इंजिन पर्याय आपणास मिळतात.

Mahindra XUV 3XO इंजिन

mStallion (TGDi) Engine ११९७ सीसी, ३ सिलेंडर, ४ वॉल्व टर्बो चार्जर, ऑटोमॅटिक/ मॅन्युअल इंजिन मिळते.

१) १.२ लिटर पेट्रोल इंजिन १०९ बीएचपी आणि २०० एन एम टॉर्क जनरेट करते.

२) १.२ लिटर टर्बो पेट्रोल इंजिन १२९ बीएचपी आणि २३० एन एम टॉर्क जनरेट करते.

३) १.५ लिटर डिझेल इंजिन ११५ बीएचपी आणि ३०० एन एम टॉर्क जनरेट करते.

इंधन आणि परफॉर्मन्स

ही कार दोन्ही इंधन प्रकार यामध्ये मिळतात शिवाय ४२ लिटर कॅपॅसिटी असलेला फ्यूल टॅंक मिळतो जो तुम्हाला चांगली रेंज प्रदान करतो.

ADAS फीचर्स

महिंद्रा या कारमध्ये Advance Driving Assistance System -level 2 प्रदान करते. यामुळे ड्रायव्हिंग करताना सुरक्षितता वाढते. ही सिस्टीम आधुनिक असून अनेक रडार, सेंसर, कॅमेरे मिळून काम करतात व रस्त्यावरील अडथळे ओळखून ड्रायव्हरला सतर्क करतात. व अनेक कॅमेरे व सेन्सर्स च्या मदतीने कारवर नियंत्रण करतात.

Mahindra XUV 3XO किंमत आणि व्हेरियंट

No.VerientPrice
1MX1Rs.7.49 lakh
2MX2 PRORs.8.99 lakh
3MX2 PRO ATRs.9.99 lakh
4MX3Rs.9.49 lakh
5AX5Rs.10.69 lakh
6AX5 L MTRs.11.99 lakh
7AX5 L ATRs.13.49 lakh
8AX7Rs.12.49 lakh
9AX7LRs.13.99 lakh

Mahindra XUV 3XO टॉप फिचर्स

महिंद्रा ने आपल्या डिझाईन मधील बदलांमुळे महिंद्राच्या गाड्या रोड वर एक वेगळाच रोड प्रेझेन्स प्रदान करतात. महिंद्रा आपल्या ग्राहकांना फ्युचरिस्टिक डिझाईन सोबत दमदार परफॉर्मन्स सह मायलेज देणारे इंजिन प्रदान करतात. सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीमध्ये आधुनिक फीचर्स महिंद्रा ऑफर करते. यामध्ये ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन व्हीव, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेक, सिग्नल रिकॉग्निशन, पार्किंग असिस्टंट इ. सह सुरक्षेसाठी सहा एअर बॅग, इलेक्ट्रिकली ऍडजेस्टेबल ओआरव्हीएम.

Xiaomi SU 7 ev info in Marathi जाणून घ्या सगळे अपडेट.

सुरक्षा

महिंद्रा ने लॉन्च केलेल्या Mahindra XUV 3XO या एसयूव्ही मध्ये ग्राहकांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिले आहे. कॉम्पॅक्ट एस यु व्ही मध्ये देखील महिंद्राने सुरक्षेसाठी सहा एअर बॅग ऑफर केल्या आहेत. ज्यामध्ये २ एअर बॅग फ्रंट साईडला, २ एअर बॅग ड्रायव्हर आणि को पॅसेंजर, २ एअर बॅग मागील लोकांसाठी दिल्या आहेत.

पॅनारॉमिक सनरूफ

Mahindra XUV 3XO या कॉम्पॅक्ट एसयूव्ही मध्ये महिंद्रा कंपनीने मार्केटमध्ये आत्तापर्यंत कोणीही न केलेली गोष्ट ती म्हणजे या कारमध्ये तुम्हाला पॅनारॉमिक सनरूफ देते.

Mahindra XUV 3XO
Mahindra XUV 3XO

पार्किंग असिस्ट

Mahindra XUV 3XO या आत्याधुनिक कॉम्पॅक्ट एसयूव्ही मध्ये पार्किंग असिस्ट फीचर्स मिळते ज्यामुळे वाहन पार्किंग करताना याचा उपयोग होतो. पार्किंग असिस्ट ही प्रणाली अनेक सेंसर च्या मदतीने कार्य करते.

सीट बेल्ट

या कारमध्ये ग्राहकांच्या सुरक्षेसाठी थ्री पॉईंट सीट बेल्ट ऑफर करण्यात आले आहेत. यामुळे प्रवासादरम्यान अधिक सुरक्षा प्रदान करतात.

इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल ओआरव्हीएम

या फीचर्स मुळे ड्रायव्हर्स ना खूप फायदा होतो प्रत्येक वेळेस मॅन्युअली मिरर ऍडजस्ट करावा लागत नाही. ओआरव्हीएम हे इलेक्ट्रिकली कंट्रोल होतात.

३६० कॅमेरा

३६० डिग्री कॅमेरा सिस्टीम मुळे चालकाला कारच्या आजूबाजूचे दृश्य डॅशबोर्ड मधील डिस्प्ले मध्ये दिसते यामुळे संभाव्य अडथळे, शिवाय पार्किंग अधिक सुलभ करण्यास मदत होते.

या कारचा टर्निंग रेडियस ५.३ मिटर असून आपणास इलेक्ट्रिक स्टेरिंग मिळते. XUV 3XO ची लांबी ३९९० एम एम, रुंदी १८२१ एम एम, उंची १६४७ एम एम इतकी असून यामध्ये ३६४ लिटरचा बूट स्पेस मिळतो. या कारची सीटिंग कॅपॅसिटी पाच जणांची असून पाच जण यामधून आरामात प्रवास करू शकतात. यासह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी १०.२४ टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, अँड्रॉइड ऑटो, ॲपल कार प्ले, वायरलेस फोन चार्जिंग, यूएसबी पोर्ट ए आणि टाईप सी., ब्लाइंड स्पॉट मॉनिटर, ट्यूबलेस रेडियल टायर्स, एलईडी डी आर एल, एलईडी हेडलाईट, एलईडी टेल लाईट, एलईडी फॉग लॅम्प, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम, सेंट्रल लॉकिंग, इलेक्ट्रॉनिक्स ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन, टायर प्रेशर मॉनिटर, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल इ. असे अत्याधुनिक अप्रतिम फीचर्स महिंद्रा ऑफर करते. सदर लेखांमधून तुम्हास Mahindra XUV 3XO संपूर्ण माहिती मिळाली असेल, तसेच नवनवीन ऑटो अपडेट मिळवण्यासाठी कोकण कल्चर ला नक्की फॉलो करा तसेच सदर लेख कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा.

अधिकृत संकेतस्थळ क्लिक करा

हे देखील वाचा

जीवनविद्या मिशन

Tata Harrier Facelift

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
All New Mahindra’s Budget Friendly Compact SUV XUV 3X0 Launch पृथ्वी बद्धल या रोचक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? top fact about earth उन्हाळ्यात आरोग्याची अशी घ्या काळजी. सुपरस्टार महेश बाबू चे कार कलेक्शन पाहून व्हाल थक्क | Mahesh Babu Luxury Car Collection Ferrari Purosangue फरारी ने लाँँच केली SUV तुम्ही पाहिली का ?