Amazing TATA HARRIER facelift 2023 रेंज रोव्हर सारखे दमदार फीचर्स आता टाटा हॅरियर मध्ये

TATA HARRIER

TATA HARRIER new facelift 2023 भारतातील दिग्गज ब्रँड टाटा मोटर्स ने अलीकडच्या काळात अनेक सेफ कार लाँच करून स्पर्धेत असणाऱ्या इतर कंपन्यांना चांगलेच धोबीपछाड करून सोडले आहे. सध्या बाजारात टाटा मोटर्सच्या टीयागो, टिगोर, अल्ट्रॉझ, तसेच एस.यु.व्ही. सेगमेंट मध्ये पंच, नेक्सॉन, हॅरीयर, सफारी इत्यादी कार आहेत. नेक्सॉन, हॅरीयर, सफारी यांचे फेसलिफ्ट २०२३ दमदार फीचर्स देऊन लाँच केले. या तिन्ही एस.यु.व्ही. नव्या रुपात पाहायला मिळत आहेत. या लेखात आपण टाटा हॅरीयर या एस.यु.व्ही. बद्दल जाणून घेणार आहोत. टाटा हॅरीयर ही त्याच्या उत्कृष्ट डिझाईन आणि रोड प्रेझेन्स साठी ओळखली जाते लाँच झाल्यावर कमी वेळात लाखो लोकांच्या हृदयावर टाटा हॅरीयर राज्य केले. त्याचेच अपडेटेड व्हर्जन आता ऑक्टोबर 2023 मध्ये TATA Motors ने अनेक दमदार फीचर्स देऊन लाँच केले. या एस.यु.व्ही. ची किंमत ही (Ex-Showroom) रु.१५.४९ लाखांपासून सुरु होते तसेच टाटा हॅरीयरचे टॉप व्हेरीएंट हे रु.२६.४४ लाखांपर्यंत जाते. टाटा हॅरीयरचे २४ वेगवेगळे व्हेरीएंट उपलब्ध आहेत. तसेच बरेच नवीन कलर आणि पर्याय दिले आहेत. पण सध्या उपलब्ध असलेले सगळे व्हेरीएंट हे डीझेल वरील आहेत. लोकांच्या मागणीनुसार TATA Motors लवकरच हॅरीयरचे पेट्रोल व्हेरीएंट बाजारपेठेत आणू शकते. आता ऑक्टोबर मध्ये लाँच झालेल्या व्हेरीएंट मध्ये मध्ये आता पूर्णतः नवीन डिझाईन फ्रंट ग्रील आणि प्रोजेक्टर हेडलॅम्प सेटअप सह नवीन कलर्स आणि कोस्मेटिक बदलांमुळे भारदस्त लुक लक्ष्य वेधून घेतो. भरतात जेव्हा सुरक्षित वाहनांची चर्चा होते तेव्हा TATA Motors च नाव अग्रक्रमाने घेतल जातं.

Tata harrier

Engine –

टाटा हॅरीयर मध्ये १९५६ सीसी चे ४ सिलेंडर वाले इंजिन मिळते जे १६७.६७ बीएचपी @ (३७५० आरपीएम) – पावर जनरेट करते आणि ३५० एनएम टॉर्क @ (१७५०-२५००आरपीएम) जनरेट करते. एक दमदार इंजिन टाटा हॅरीयर मध्ये मिळते.

TATA HARRIER

Gesture control tail gate-

TATA Harrier मध्ये आता तुम्हाला Gesture control मिळते शिवाय key ने तुम्ही tail gate खोलू शकता बंद करू शकता. बंद करण्यासाठी गेट वर एक बटण देखील देण्यात आले आहे.

Blind spot detection mirror –

Tata Harrier मध्ये इलेक्ट्रोनिक फोल्डेबल मिरर मिळतात तसेच यामध्येच तुम्हाला Blind spot detection फिचर मिळतो याच्या मदतीने, आपल्या वाहनाच्या बाजूच्या लेन मध्ये एखादे वाहन जवळ आल्यास मिरर मध्ये LIGHT च्या मदतीने आपणास सूचना मिळते.

TATA HARRIER

Dual zone climate control –

ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोलच्या मदतीने ड्रायव्हर आणि को- ड्रायव्हर हे त्यांना पाहिजे तसे Temperature कंट्रोल करू शकतात

Panoramic Sunroof –

TATA Harrier मध्ये तुम्हाला Panoramic Sunroof मिळते. Sunroof

Ventilated front seat –

शिवाय TATA Harrier मध्ये Ventilated front seat चा पर्याय मिळतो यामुळे तुम्ही आरामदायी प्रवासाची मजा घेऊ शकता. शिवाय उन्हात गाडी लावल्या नंतर गरम सीट मुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्तता होणार आहे. पण सध्या फक्त फ्रंट सीट मध्ये हा पर्याय देण्यात आला आहे.

360 degree camera –

TATA Harrier मध्ये 360 degree camera देण्यात आला आहे याच्या मदतीने पार्क करताना किंवा रिव्हर्स घेताना याची मदत होते. यामध्ये ३६० डिग्री थ्रीडी व्हिव चा एक्स्पीरियंस घेऊ शकता. शिवाय डिस्प्ले आणि कॅमेरा क्वालिटी पण चांगली मिळते.

Amazing TATA HARRIER facelift 2023 रेंज रोव्हर सारखे दमदार फीचर्स आता टाटा हॅरियर मध्ये

Safety Global NCAP crash test –

६ एअर बॅग- सगळ्या भारतीय चारचाकी वाहनांमध्ये २ एअर बॅग या कंपल्सरी केल्या आहेत, भारतात अगदी छोटया कारमध्ये पण २ एअर बॅग दिल्या जातात. टाटा हॅरीयर मध्ये सुरक्षेसाठी ६ एअर बॅग दिल्या आहेत. तसेच टाटा हॅरीयर पूर्णतः नवीन असा ओमेगा ए.आर.सी. प्लॅटफॉर्म वर विकसित करण्यात आली आली आहे, जो प्लॅटफॉर्म रेंज रोव्हर साठी वापरण्यात येतो.

Audio Systems-

10 speaker JBL Audio Systems जी तुमचा ड्रायव्हिंग एक्स्पीरियंस मजेदार बनवते, जे.बी.एल. चे दमदार स्पीकर

ADAS System

Advanced Driver- Assistant System (ADAS System) हल्ली सगळेच ग्राहक हे सुरक्षेला अधिक महत्व देवून अधिक सुरक्षित कार खरेदी करण्यावर भर देत आहेत, यामुळे आणि सरकारच्या वाहनाच्या सुरक्षेतील नियमावलीमुळे कार्स कंपन्या या अधिक सेफ्टी फीचर्स देत आहेत, अलीकडेच तुम्ही ADAS System बद्दल ऐकले असेल. ADAS System म्हणजे वाहनामध्ये एका सॉफ्टवेअर चा समावेश केलेला असतो. जे आपोआप काम करते, कारमधील कॅमेरे, रडार आणि इतर सेन्सर्सच्या सहाय्याने समन्वय साधून कार स्वयं नियंत्रित केली जाते आणि अपघातापासून बचाव करते.ज्यामध्ये Adaptive Cruise Control ब्लाइंड-स्पॉट डिटेक्शन सिस्टम, लेन चेंज असिस्ट, पार्क असिस्ट, रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट इत्यांदींचा समावेश आहे. या फिचर मुळे कार अधिक सुरक्षित बनते.

Colors Option

टाटा हॅरीयर मध्ये बऱ्याच दमदार फिचर सोबत अनेक कलर पर्याय देखील मिळतात,

Seaweed Green
Sunlit Yellow
Lunar White
Ash Gray
Coral Red
Pebble Gray
Oberon Black

व्हेरीएंट आणि किंमत (TATA HARRIER Ex Showroom Price)

क्र.HARRIER व्हेरीएंटकिंमत (Ex-Showroom)
TATA Harrier Smart
१९५६ सीसी, डीझेल, मॅन्युअल, १६.८ kmpl
रु.१५.४९ लाख


TATA Harrier Smart (O)
१९५६ सीसी, डीझेल, मॅन्युअल, १६.८ kmpl
रु.१५.९९ लाख
TATA Harrier Pure
१९५६ सीसी, डीझेल, मॅन्युअल, १६.८ kmpl
रु.१६.९९ लाख
TATA Harrier Pure Plus
१९५६ सीसी, डीझेल, मॅन्युअल, १६.८ kmpl
रु.१६.६९ लाख
TATA Harrier Pure Plus S
१९५६ सीसी, डीझेल, मॅन्युअल, १६.८ kmpl
रु.१९.६९ लाख
TATA Harrier Pure Plus S Dark Edition
१९५६ सीसी, डीझेल, मॅन्युअल, १६.८ kmpl
रु.१९.९९ लाख
TATA Harrier Pure Plus AT
१९५६ सीसी, डीझेल, ऑटोमॅटिक, १४.४ kmpl
रु.१९.९९ लाख
TATA Harrier Adventure
१९५६ सीसी, डीझेल, मॅन्युअल,१६.८ kmpl
रु.२०.१९ लाख
TATA Harrier Pure Plus S AT
१९५६ सीसी, डीझेल, ऑटोमॅटिक (TC), १४.४ kmpl
रु.२१.०९ लाख
१०TATA Harrier Pure Plus S Dark Edition
१९५६ सीसी, डीझेल, ऑटोमॅटिक (TC) १४.४ kmpl
रु.२१.३९ लाख
११TATA Harrier Adventure Plus
१९५६ सीसी, डीझेल, मॅन्युअल, १६.८ kmpl
रु.२१.६९ लाख
१२TATA Harrier Adventure Plus S Dark Edition
१९५६ सीसी, डीझेल, मॅन्युअल, १६.८ kmpl
रु.२२.२४ लाख
१३TATA Harrier Adventure Plus A
१९५६ सीसी, डीझेल, मॅन्युअल, १६.८ kmpl
रु.२२.६९ लाख
१४TATA Harrier Fearless Dual Tone
१९५६ सीसी, डीझेल, मॅन्युअल, १६.८ kmpl
रु.२२.९९ लाख
१५TATA Harrier Adventure Plus AT
१९५६ सीसी, डीझेल, ऑटोमॅटिक (TC) १४.४ kmpl
रु.२३.०९ लाख
१६TATA Harrier Fearless Dark Edition
१९५६ सीसी, डीझेल, मॅन्युअल, १६.८ kmpl
रु.२३.५४ लाख
१७TATA Harrier Adventure Plus Dark Edition
१९५६ सीसी, डीझेल, ऑटोमॅटिक (TC) १४.४ kmpl
रु.२३.६४ लाख
१८TATA Harrier Adventure Plus A AT
१९५६ सीसी, डीझेल, ऑटोमॅटिक (TC) १४.४ kmpl
रु.२४.०९ लाख
१९TATA Harrier Fearless Dual Tone AT
१९५६ सीसी, डीझेल, ऑटोमॅटिक (TC) १४.४ kmpl
रु.२४.३९ लाख
२०TATA Harrier Fearless Plus Dual Tone
१९५६ सीसी, डीझेल, मॅन्युअल, १६.८ kmpl
रु.२४.४९ लाख
२१TATA Harrier Fearless Dark Edition AT
१९५६ सीसी, डीझेल, ऑटोमॅटिक (TC) १४.४ kmpl
रु.२४.९४ लाख
२२TATA Harrier Fearless Dark Edition
१९५६ सीसी, डीझेल, मॅन्युअल, १६.८ kmpl
रु.२५.०४ लाख
२३TATA Harrier Fearless Plus Dual Tone AT
१९५६ सीसी, डीझेल, ऑटोमॅटिक (TC) १४.४ kmpl
रु.२५.८९ लाख
२४TATA Harrier Fearless Plus Dark Edition AT
१९५६ सीसी, डीझेल, ऑटोमॅटिक (TC) १४.४ kmpl
रु.२६.४४ लाख

TATA MOTORS Official Website

TATA NEXON EV

Tesla model s

Yamaha RX 100 new model launch

Join our Whats app Group Click Here

1 thought on “Amazing TATA HARRIER facelift 2023 रेंज रोव्हर सारखे दमदार फीचर्स आता टाटा हॅरियर मध्ये”

  1. Pingback: Upcoming New Ferrari Purosangue information in Marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
All New Mahindra’s Budget Friendly Compact SUV XUV 3X0 Launch पृथ्वी बद्धल या रोचक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? top fact about earth उन्हाळ्यात आरोग्याची अशी घ्या काळजी. सुपरस्टार महेश बाबू चे कार कलेक्शन पाहून व्हाल थक्क | Mahesh Babu Luxury Car Collection Ferrari Purosangue फरारी ने लाँँच केली SUV तुम्ही पाहिली का ?