Kukut Palan Yojana | कुक्कुट पालन कर्ज योजना २०२३ – अर्ज, सबसिडी, कागदपत्रे संपूर्ण माहिती.

Kukut Palan Yojana | kukkut palan mahiti | kukut palan karj yojana in marathi | kukut Palan Yojana Maharashtra | कुक्कुट पालन योजना | अंडी उत्पादन व्यवसाय | पोल्ट्री व्यवसाय संपूर्ण माहिती | कुक्कुट पालन कर्ज योजना

kukut palan yojana

शासनाच्या विविध योजना

Kukut Palan Yojana सदर योजना ही महाराष्ट्र शासनाद्वारे चालवली जाणारी योजना आहे, केंद्र आणि राज्य शासन शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी तसेच बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी अनेक महत्वाच्या योजना राबवीत असते, सदर लेखात आपण कुक्कुट पालन योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

शासनाच्या विविध योजना –

राष्ट्रीय कृषी विकास

राष्ट्रीय कृषी विकास सदर योजना केंद्र शासनाची मुख्य योजना आहे जी महाराष्ट्रातही लागू करण्यात आली आहे. कृषी उत्पादन वाढ व आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देते. या योजने अंतर्गत कुक्कुटपालन हा त्यातील एक दुवा आहे, यामार्फत कुक्कुट पालन फार्म स्थापन करण्यासाठी तसेच उपकरणे खरेदी आणि कुक्कुट पालन प्रशिक्षण कार्यकमात प्रवेशासाठी या योजनेमार्फत शेतकरी अर्थसहाय्य मिळवू शकतात.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अंतर्गत लघुउद्योग उभारण्यास शासनाद्वारे आर्थिक सहाय्य दिले जाते. व्यक्ती किंवा गट या योजनेमार्फत कर्ज / अनुदानाचा लाभ घेऊ शकतात.

नाबार्ड

नाबार्ड – नॅशनल बँक फॉर ॲग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट योजने द्वारे कृषी तसेच ग्रामीण विकास उपक्रमात सहभागी असलेल्या शेतकरी आणि उद्योजक यांना अर्थ सहाय्य आणि कर्ज सहाय्य दिले जाते. ज्या निधीचा उपयोग पोल्ट्री शेड (फार्म) उभारण्यासाठी, तसेच उपकरणे खरेदी करण्यासाठी आणि इतर खर्चासाठी केला जातो.

महाराष्ट्र राज्य कुक्कुट पालन विकास योजना

महाराष्ट्र राज्य कुक्कुट पालन विकास योजने अंतर्गत फार्म बांधणी तसेच कुक्कुट उत्पादन वाढविण्यासाठी लाभार्थी व्यक्ती, स्वयं-सहायता गट, सहकारी संस्था इत्यादींना आर्थिक सहाय्य प्रदान करते. याच्या मार्फत पिल्ले, तलंग, खाद्य, उपकरणे तसेच इतर वस्तूंच्या खरेदीसाठीअर्थ सहाय्य तसेच त्यांच्या खरेदीवर सबसिडी देते.

राष्ट्रीय पशुधन अभियान

राष्ट्रीय पशुधन अभियान ही केंद्र शासनाद्वारे चालवली जाणारी योजना आहे जी कुक्कुट पालनासहित पशुधन विकासाला चालना देते. शेतकरी या योजने द्वारा कुक्कुट पालन तसेच त्यासंबंधी इतर घटकांसाठी अनुदान मिळवू शकतो.

Kukut Palan Yojana- उद्देश

सदर योजनेचा उद्देश हा राज्यातील कुक्कुट पालन विकास उपक्रमांना प्रोत्साहन देऊन खालील उद्दिष्ठे साध्य करण्याचा आहे.

रोजगार निर्मिती – कुक्कुट पालन योजने अंतर्गत लाभार्थ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी तसेच ग्रामीण व्यवसायिक आणि बेरोजगारांना रोजगाराच्या संधी निर्माण करून कुक्कुट पालनास प्राधान्य देत, शाश्वत उत्पन्नामार्फत आर्थिक स्त्रोत निर्माण करणे.

उत्पादनात वाढ – भारताच्या वाढत्या लोकसंख्ये सोबत बाजारातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी अंडी तसेच मांस यांसह इतर पोल्ट्री उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात येतो. शेतकऱ्यांना/ लाभार्थ्यांना उत्पादन वाढीसाठी आवश्यक अशा पायाभूत सुविधांची निर्मिती शासना मार्फत करून दिली जाते, तांत्रिक दृष्ट्या लागणारे साहित्य आणि प्रशिक्षण यांचा समावेश यामध्ये होतो.

कौशल्य विकास व क्षमता वाढीवर भर कुक्कुट पालन करणारे लाभार्थी गट, शेतकरी यांच्यात “कौशल्य विकास आणि क्षमता” निर्माण करून त्यांना प्रोत्साहन देऊन. कुक्कुट पालन व्यवस्थापनाच्या विविध पैलूंची सविस्तर माहिती देणे, कौशल्य विकास व क्षमता वाढीवर आधारित कार्यक्रम, कार्यशाळा तसेच प्रात्याक्षिके घेणे, यामध्ये कोंबड्यांच्या जातीची ओळख / निवड, आहार, रोग नियंत्रण आणि व्यावसायिक विपणन इत्यादी बाबींचा समावेश यात होतो.

तंत्रज्ञान – उत्पादकता, कार्यक्षमता, व्यावसायिक नफा मिळवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून उत्पादन वाढीस प्रोत्साहित करणे, पोल्ट्री फार्मसाठी प्रगत उपकरणे, वैज्ञानिक तंत्रज्ञान अवलंबण्यास प्रोत्साहन देणे. सुधारित जातींच्या वापराला प्राधान्य देणे.

बाजारपेठ आणि उत्पादनाचे मूल्यवर्धन – कुक्कुट पालन योजेनेचा उद्देश पोल्ट्री उत्पादनासाठी मार्केट आणि उत्पादनाचे मुल्यवर्धन करणे, शेतकऱ्यांना तसेच लाभार्थ्यांना बाजारपेठ मिळवून देण्यास मदत करणे. पोल्ट्री प्रक्रिया उद्योग स्थापन करणे तसेच स्वयंपाकासाठी तयार पदार्थ उदा. प्रोसेस पॅकेज चिकन, पॅकेज अंडी तसेच कुक्कुट पालनावर आधारित मूल्यवर्धित उत्पादनाच्या वाढीस प्रोत्साहन देऊन त्यास बाजारपेठ उपलब्ध करून देणे.

पोल्ट्री उद्योगात वरील उद्दिष्टांची अमंलबजावणी करून महाराष्ट्रातील कुक्कुट पालन योजने मार्फत आर्थिक विकासात योगदान देऊन शेतकरी आणि उद्योजकांचे जीवनमान सुधारण्याचे ध्येय आहे.

Kukut Palan Yojana आवश्यक कागदपत्रे.

१. आधार कार्ड

२. मतदान कार्ड

३. रहिवासी दाखला

४. ७/१२ व ८ अ उतारा / ग्रामपंचायत नमूना नंबर ४

५. पासपोर्ट साईझ फोटो

६. बँक पासबुक प्रत

७. मोबाईल नंबर

८. जात प्रमाणपत्र

९. रेशन कार्ड (एका कुटुंबातील एकच व्यक्ती लाभ घेऊ शकतो.)

१०.प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत.

११. दिव्यांग असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र

लाभार्थी निकष

कुक्कुट पालन योजना महाराष्ट्रात जे लाभार्थी आधीपासूनच हा व्यवसाय करत आहेत किंवा लाभार्थ्यांकडे अंडी उबविण्याचे यंत्र (Egg Incubator Machine) आहेत असे लाभार्थी, कुक्कुट पालन योजने अंतर्गत स्वयं रोजगार मिळवू इच्छुक व्यक्ती / गट / समूह तसेच कुक्कुट पालन व्यवसायाबद्दल ज्ञान असणाऱ्या व्यक्तीं या योजनेंतर्गत लाभ मिळतो. तसेच योजनेत सहभागी लाभार्थ्यांनी कुक्कुट पालन व्यवसायचे ज्ञान मिळवणे आवश्यक आहे. त्यासाठी काही निकष शासनाने निर्धारित केले आहेत, वरील बाबींचा विचार केला जातो.

रहिवासी – लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असणे आवश्यक आहे, निवासाचा पुरावा असणे आव्श्याक्क आहे.

वय – या योजनेत पात्रतेसाठी किमान वय हे वेग वेगळे असू शकते. वय वर्ष १८ पेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती कुक्कुट पालन योजेनेसाठी अर्ज करू शकतात. काही विशिष्ट श्रेणीसाठी विशिष्ठ वायोमर्यादा असू शकते.

जमिनीची मालकी / करार – कुक्कुट पालनासाठी पोल्ट्री फार्मसाठी आवश्यक अशी मालकी हक्क असलेली जमीन किंवा विशिष्ठ काळासाठी भाडेपट्टी करारावरील जमीन, योग्य स्थान तसेच पायाभूत सुविधांसह पोल्ट्री फार्म उभारण्यासाठी आवश्यक जमीन असणे गरजेचे आहे.

आर्थिक स्थिती – कुक्कुट पालनासाठी ज्यांना मदतीची आवश्यकता आहे त्यांचापर्यंत योजनेचे लाभ पोहोचणे यासाठी आर्थिक निकषांवर आधारित पात्रता निश्चितीसाठी उत्पन्न प्रमाणपत्रे लागु शकतात.

प्रशिक्षण – कुक्कुट पालन योजने साठी पुर्वानुभव किंवा प्रशिक्षण, अनुभव आवश्यक असू शकतो, यामुळे हे निश्चित करण्यास मदत होते की अर्जदार / लाभार्थ्याकडे कुक्कुट पालन योजनेत प्रभावी पणे सामील होण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्य आणि अनुभव आहेत.

सहकारी संस्था आणि स्वयं सहायता गट – सहकारी संस्था, एकत्रित काम करणारे स्वयं सहायता गट, कुक्कुट पालन करणाऱ्या गटांच्या अर्जांना प्रोत्साहन देऊन या गटांना विशेष प्राधान्य दिले जाते. त्यासाठी विशिष्ठ पात्रता निकष असू शकतात.

कुक्कुट पालन योजना अनुदान

महाराष्ट्र शासन कुक्कुट पालन योजने साठी ५० टक्के अनुदाने देते, आणि अनुसुचीत जाती/ जमातीसाठी ७५ टक्के अनुदान दिले जाते.

कुक्कुट पालन योजना अर्ज कसा कराल

मुंबई आणि मुंबई उपनगर हे दोन जिल्हे सोडून इतर सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जाते.

ऑनलाइन तसेच ऑफलाइन अशा प्रकारे अर्ज करू शकता. सामान्यतः अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रे जोडून प्राधिकरणाकडे ( पंचायत समिती मधील पशुसंवर्धन विभागाकडे ) जमा करणे.

जवळच्या राष्ट्रीयकृत बँक मध्ये जाऊन बँकेच्या अधिकाऱ्यांकडून माहिती मिळेल, तसेच अर्ज नमुना दिला जाईल. अर्जा मध्ये सराव सविस्तर माहिती भरून अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करावा. यानंतर बँकचे अधिकारी फार्मच्या जागेला भेट देऊन. फार्म आणि कुक्कुट पालन गुंतवणुकी वर बँक ठरलेल्या निर्धारित निकषानुसार कर्ज देते. सर्व कागदपत्रे पडताळणी नंतर कर्ज राशी दिली जाते.

अर्ज कुठे कराल.

१. सहकारी बँका

२. क्षेत्रीय ग्रामीण बँका

३. वाणिज्य बँका

४. राज्य सहकारी कृषी आणि विकास बँका

५. व्यावसायिक बँका

अधिकृत वेबसाईट क्लिक करा.

पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे – जी.आर. क्लिक करा

अटल पेन्शन योजना

आयुष्मान भारत योजना

मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना

सौर कृषी पंप योजना

सुकन्या समृद्धी योजना

Join our Whats app Group Click Here

FAQ :

कुक्कुट पालन योजना म्हणजे काय ?

बाजारातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी अंडी आणि मांस यांसह पोल्ट्री उत्पादन वाढविण्यासाठी तसेच रोजगाराच्या संधी निमार्ण करण्यासाठी शासनाने राबवलेली महत्वकांक्षी योजना.

कोणत्या प्रकारच्या कुक्कुट पालन योजना उपलब्ध आहेत ?

ग्रामीण भागातील कुक्कुट पालन, ब्रॉयलर फार्मिंग, लेयर फार्मिंग, पोल्ट्री युनिट इत्यादी.

महाराष्ट्रात कुक्कुट पालन योजने मार्फत किती अनुदान / सबसिडी मिळते ?

महाराष्ट्रात कुक्कुट पालन योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर अनुक्रमे ५० % / ७५ % असे निर्धारित केलेल्या निकषानुसार अनुदान मिळते.

3 thoughts on “Kukut Palan Yojana | कुक्कुट पालन कर्ज योजना २०२३ – अर्ज, सबसिडी, कागदपत्रे संपूर्ण माहिती.”

  1. Dear Website Owner,

    I hope this email finds you well. I recently discovered your website and was impressed by the quality of your content and the helpful information you offer to your audience. In light of this, I would like to propose a backlink exchange that could benefit both our websites.

    My website, https://m.cheapestdigitalbooks.com/, is focused on providing affordable digital books to readers around the world. We currently have a strong online presence with a Domain Authority (DA) of 13, a Page Authority (PA) of 52, and a Domain Rating (DR) of 78. Our website features 252K backlinks, with 95% of them being dofollow, and has established connections with 5.3K linking websites, with 23% of these being dofollow links.

    I believe that a mutually beneficial backlink exchange could be of great value for both of our websites, as it may lead to an increase in website authority and improve our search engine rankings. In this collaboration, I am willing to add backlinks from my website using your desired keywords and anchor texts. In return, I would be grateful if you could include backlinks with my desired keywords and anchor texts on your website.

    I kindly request that you visit my website, https://m.cheapestdigitalbooks.com/, to get a sense of the potential benefits this partnership could bring to your site. I am confident that this collaboration will provide a win-win situation for both parties, and I look forward to learning more about your thoughts on this proposal.

    Thank you for considering my offer. I am excited about the potential growth this partnership may bring to our websites and am eager to discuss the details further. Please do not hesitate to reach out to me at your convenience.

    Best regards,

    David E. Smith
    Email: david@cheapestdigitalbooks.com
    Address: 3367 Hood Avenue, San Diego, CA 92117

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
All New Mahindra’s Budget Friendly Compact SUV XUV 3X0 Launch पृथ्वी बद्धल या रोचक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? top fact about earth उन्हाळ्यात आरोग्याची अशी घ्या काळजी. सुपरस्टार महेश बाबू चे कार कलेक्शन पाहून व्हाल थक्क | Mahesh Babu Luxury Car Collection Ferrari Purosangue फरारी ने लाँँच केली SUV तुम्ही पाहिली का ?