Karande Bhaji Recipe | बटाट्याला पूरक असा करांदा | air potato

Karande Bhaji Recipe : कोकणातील निसर्ग जसा स्वर्गाची अनुभूती देणारा आहे. येथील निसर्गात कमालीची विविधता आढळून येते. प्रत्येक पट्ट्यात निसर्गाचं एक आगळे वेगळे रूप आपणास पहावयास मिळते. कोकणातील निसर्ग जितका सुंदर आहे. तेवढीच संपन्न येथील खाद्य संस्कृती आहे.

कोकणातील माणूस हा पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गात वेगवेगळ्या ऋतूत मिळणाऱ्या विविध नैसर्गिक भाज्या, कंदमुळे, फळभाज्या यांचा समावेश कोकणी माणसाच्या जेवणामध्ये असतो. या लेखामध्ये आपण करांदा (Yam) या कंदवर्गीय असणाऱ्या भाजी बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया, कोकणात सहज उपलब्ध होणारा करांदा हा दिसायला ओबडधोबड असला तरी चव मात्र एक नंबर असते. कोकणातील लोकांच्या रोजच्या जीवनातील हा घटक असल्याने त्यांना याचे विशेष आकर्षण असे नाही. यामध्ये असणारे पोषक तत्व आणि आणि याचे औषधी उपयोग हे देखील आपण या लेखात पाहणार आहोत.

Karande Bhaji Recipe

करांद्याचे वैज्ञानिक नाव (डायोस्कोरिया बेलबिफेरा) Dioccorea Bulbifera असून करांदा हा प्रोटीन, फॅट, फायबर यांसारख्या पोषक घटकांनी परिपूर्ण आहे. याला एअर पोटॅटो असे देखील म्हटले जाते. बटाट्याला पूरक म्हणून करांद्याकडे पाहिले जाते. करंदा हा जमिनीमध्ये वाढणाऱ्या बटाट्यांप्रमाणे असतो, कोकणात हा बारमाही उपलब्ध असतो. करांदा हा जमिनीमध्ये शाखांच्या स्वरूपात विस्तारत जातो. तसेच याच्या वेलींवर देखील छोटे छोटे करांदे लागतात. त्यांचा आकार हा तळ हातामध्ये बसेल इतका असतो. तसेच वेलीच्या मुळापाशी वाढणारा करांदा हा वेलींवर वाढणाऱ्या करांद्यापेक्षा तुलनेने मोठा असतो. कोकणी बांधव सुरण, करांदे हे मार्च ते मे च्या दरम्यान काढणे पसंत करतात. कारण यावेळी जमीन सुखी असते तसेच करांद्याची देखील पूर्ण वाढ झालेली असते. त्यामुळे मार्च ते मे च्या दरम्यान करांदे काढले जातात. हे करांदे कोरड्या जागेत ठेवल्यास ते पूर्ण वर्षभर टिकतात.

Karande Bhaji Recipe करांद्याच्या जाती

करांद्याच्या कोकणात प्रामुख्याने दोन जाती आढळतात. काळा आणि पांढरा जे खाण्या योग्य असतात तसेच या व्यतिरिक्त यांसारखेच दिसणारे रानटी कडवट करांदे देखील आढळतात जे पूर्णता कडू असतात.

Join Us

Karande Bhaji Recipe करांद्याचे औषधी गुणधर्म

दिसायला ओबडधोबड असलेल्या करांद्याला आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. करांदा हा खोकला, मधुमेह, अल्सर, दमा, कर्करोग आणि आतड्यासंबंधी आजारावर गुणकारी आहे. याचा उपयोग हर्निया आणि त्वचेच्या संसर्गजन्य रोगावर देखील केला जातो.

Karande Bhaji Recipe

कसे खावेत ?

वेलीवरील तसेच जमिनीमधील करांद्यांसाठी समान पद्धत आहे. करांद्यांची तुम्ही भाजी देखील बनवू शकता, अथवा शिजवून खाऊ शकता. करांद्यांवरती माती असल्याने दोन ते तीन वेळा करांदे सर्वप्रथम स्वच्छ धुऊन घ्यावेत व त्याचे चाकूच्या सहाय्याने दोन तुकडे करावे. कुकर किंवा एखाद्या भांड्यामध्ये करांदे पूर्ण बुडतील इतके पाणी ठेवून त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून छान उकडून घ्या. पंधरा ते वीस मिनिटं उकडून घेतल्यानंतर पाणी काढून टाकून करांदे खाऊ शकता.

या व्यतिरिक्त कोकणातील पारंपरिक पद्धत ती म्हणजे करांदे चुलीत भाजून खाणे होय, पावसाळ्यात करांदे चुलीत भाजून खाण्याची मजा काही औरच चुल किंवा पाणचुलीतील निखाऱ्यांवर खरपूस भाजलेल्या करांद्याना ना एक वेगळीच चव येते, भाजलेला करांद्यामध्ये एक वेगळाच फ्लेवर ऍड होतो.

karande bhaji recipe

Karande Bhaji Recipe भाजी

साहित्य

  • पाच ते सहा मध्यम आकाराचे करांदे
  • फोडणीचे साहित्य- राई, जिरे, हिंग, हिरवी मिरची/ मिरची पावडर, कडीपत्ता
  • तेल
  • ३-४ लसुन
  • १/२ टेबल स्पून हळद
  • १/२ टेबल स्पून जिरे पावडर
  • चवीनुसार मीठ
  • चिमूटभर काळी मिरी पावडर

कृती

सर्वप्रथम करांदे हे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुऊन. प्रत्येक करांदा मध्ये कापून त्याचे दोन भाग करून घ्या.

आता कुकरमध्ये किंवा एका भांड्यामध्ये पाणी घेऊन सर्व करांदे त्यामध्ये टाका व चवीनुसार मीठ टाकून दहा ते पंधरा मिनिटे चांगले शिजवून घ्या.

करांदे शिजल्यानंतर एका भांड्यात घेऊन त्यावरील साल काढून टाका.

आता तुमच्या सोयीनुसार त्याच्या फोडी करून घ्या.

मध्यम आचेवर कढईमध्ये थोडे तेल घेऊन थोडे गरम करून घ्या त्यामध्ये फोडणीसाठी राई, जिरे टाकून थोडे लालसर होईपर्यंत परतून घ्या.

आता यामध्ये लसुन आणि हिरव्या मिरच्या / मिरची पावडर, कडीपत्ता टाकून घ्या त्यामधे स्वादासाठी थोडे हिंग टाका.

हे सर्व मिश्रण चांगले एकजीव करून घ्या त्यामध्ये आपण केलेल्या करांद्यांच्या फोडी टाका.

त्यात अर्धा टी स्पून हळद, जिरे पावडर, चिमूटभर काळीमिरी पावडर, चवीनुसार मीठ टाकून सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्या.

आता त्यामध्ये कोथिंबीर टाका व त्यावर झाकण ठेवून पाच ते दहा मिनिटे शिजू द्या.

त्यामध्ये पाणी टाकू नये कारण करांदे हे अगोदरच शिजवून घेतल्यामुळे पाण्याची आवश्यकता भासत नाही.

अगदी अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तयार होणारी झटपट करांदे भाजी रेसिपी नक्की ट्राय करा.

करांद्याची भाजी आपण अनेक प्रकारे करू शकतो. वरील झटपट पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तयार होणारी भाजी ची रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो. करांद्याची कापे, करांद्याची रस्सा भाजी असे अनेक प्रकार यापासून तयार केले जातात ते आपण पुढील लेखात पाहू.

मित्रांनो अशाच कोकणातील नवनवीन आणि अनभिज्ञ रेसिपी पाहण्यासाठी आमचे पेज कोकण कल्चर ला नक्की फॉलो करा तसेच वरील लेख कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा.

हे देखील वाचा

दशग्रीव्हा

Suran Bhaji Recipe

Suran Bhaji Benefits

Aaloo Paratha Recipe

कोकणातील प्रसिद्ध घावणे

1 thought on “Karande Bhaji Recipe | बटाट्याला पूरक असा करांदा | air potato”

  1. Pingback: drumstick Shevga benefits प्रथिनांचे भांडार आहे ही भाजी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
रणबीर कपूर ने खरेदी केली महागडी कार Ranbir Kapoor buy new Luxury Car आंबोली घाटातील ही ठिकाणे तुम्ही पाहिली का? Amboli Ghat Famous Places ‘Very high’ COVID levels detected in 7 states 1st CNG Bike Bajaj Freedom 125 Lavasa city बद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?