Easy Aaloo Paratha Recipe in Marathi

Aaloo Paratha
Aaloo Paratha Recipe in Marathi

Paratha Recipe in Marathi : पराठा हा दिसायला सर्वसाधारण भाकरी, चपाती, पोळी या सारखाच असुन, उत्तर भारतीयांच्या जेवणात खास आढळणारा पदार्थ म्हणजे पराठा होय. हल्ली गल्ली बोळात देखील पराठा हाऊस सुरू झालेले पाहायला मिळतात. तसं पाहिलं तर पराठा हा झटपट तयार होणारा आणि पौष्टिक पदार्थ आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या वापरून आपण अनेक प्रकारचे पराठे तयार करू शकतो. पराठा हा नाश्ता तसेच माध्यांन भोजनासाठी देखील चालतो.

खरपूस पंजाबी पद्धतीचे आलू पराठे कसे करायचे ते लेखात बघू सारण करताना कोणती काळजी घ्यावी, सारणाचे योग्य प्रमाण, पराठा लाटताना कोणती काळजी घ्यावी याची संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखात मिळेल. थंडीचे दिवस आहेत असे पराठ्यांचे वेगवेगळे प्रकार गरमागरम पराठे आणि त्यासोबत चटणी, दही खायला मजा येते. तर लेख शेवटपर्यंत वाचा आणि कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा‌.

साहित्य Aaloo Paratha Recipe

चार कप गव्हाचे पीठ
चार टेबलस्पून बेसन
चवीपुरता मीठ
तेल
पाणी
बटाट्याचा स्टफिंग साठी चार बटाटे
१/२ टेबल स्पून लाल तिखट
चिरलेल्या हिरव्या मिरच्या
कांदा
कोथिंबीर
जिरे
उपलब्ध असल्यास मॅगी मसाला
१/२ लिंबाचा रस
हिंग, मोहरी, लसुण

कृती

अगदी चपाती लाटण्यासाठी जसे पीठ मळतो तसे पीठ मळून घ्यायचे. खूप घट्ट न ठेवता एकदम मऊसूत कणिक मळून त्याला थोडंसं तेल लावून, पंधरा ते वीस मिनिटं ठेवा. तोपर्यंत बटाट्याच्या स्टफिंग साठी उकडून घेतलेले बटाटे स्मॅश करून त्यात मिरची पावडर, चिरलेली हिरवी मिरची, कांदा, कोथिंबीर, बेसन, भाजून घेतलेले जिरे, मॅगी मसाला, लिंबाचा रस, हिंग टाकून व्यवस्थित एकजीव करून घ्या. एका भांड्यामध्ये मोहरी, कढीपत्त्याची पाने टाकून फोडणीमध्ये हळद थोडं तिखट टाकून कांदा छान परतून घ्या, आता त्यामध्ये तयार केलेले बटाट्याचे स्टफिंग टाकून छान असे मिक्स करा. पाच मिनिटानंतर तयार झालेला मसाला एका ताटामध्ये काढून थंड करून घ्या.

पुढे पिठाचे थोडे जाडसर गोळे करून त्यामध्ये वरील तयार केलेली बटाट्याची स्टफिंग व्यवस्थित भरून घ्या, सगळे पराठे लाटून घ्या, सगळे पराठे लाटून झाल्यानंतर ते तव्यावरती किंवा पॅन वरती तेल किंवा बटर च्या साह्याने खरपूस भाजून घ्या त्यावरती छान असेच टेक्सचर येईल. पराठा भाजून झाल्यानंतर त्यावर तूप किंवा लोणी घालून ते दही, चटणी, लोणचे किंवा टोमॅटो कॅचप सोबत सर्व्ह करा.

Aaloo Paratha Recipe in Marathi

अशाप्रकारे तुम्ही वेगवेगळे स्टफिंग तयार करून अनेक प्रकारचे पराठे बनवू शकता पालक पनीर पराठा, पनीर पराठा, लाल माठ पराठा, मुळ्याचा पराठा, पराठा, मिक्स व्हेजिटेबल पराठा, मेथी पराठा, मेथी गाजर पराठा, मशरूम पराठा, साबुदाणा पराठा, कोबी पराठा अशा विविध भाज्या, पदार्थ वापरून आपण पौष्टिक असे अनेक प्रकारचे पराठे बनवू शकतो.

अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज कोकण कल्चर ला नक्की फॉलो करा आणि लेख कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा.

हे देखील वाचा

दशग्रीवा

पुरणपोळीचा इतिहास आणि सोपी रेसिपी

पालक पनीर

झटपट धावणे कसे बनवावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

o