Mahindra Thar 5 door : भारत ही चारचाकी वाहनांसाठी जगभरातील तिसरी अशी सर्वात मोठी बाजारपेठ आहे, चारचाकी वाहनांच्या बाजारपेठेत भारता अगोदर चायना आणि युएस या दोघांचा नंबर लागतो. बहुराष्ट्रीय कंपन्यांसोबतच भारतातील ऑटोमोबाईल्स कंपन्या देखील त्यांना तोडीस तोड आणि दर्जेदार वाहने बनवत आहेत, त्यातील प्रमुख चारचाकी वाहन निर्मात्या कंपन्यांपैकी टाटा आणि महिंद्रा ही दोन नावे नेहमीच चर्चेत असतात. टाटा मोटर्स ने जसे त्यांच्या वाहनांमध्ये अमुलाग्र बदल घडवून नवीन दर्जेदार, जागतिक बाजारपेठेला आव्हान देणारी वाहने बनवून ग्राहकांमध्ये नावलौकिक मिळवला. तसेच महिंद्रा कंपनीच्या वाहनांनी देखील ग्राहकांच्या मनावर एक ठसा उमटवला आहे. स्कॉर्पिओ, एक्स यु व्ही ७००, थार ४*२, थार ४*४ ने मार्केटवर अधिराज्य गाजवले आहे.
या लेखात आपण महिंद्रा थार चे अपडेटेड व्हर्जन Mahindra Thar 5 door च्या लॉंचिंग बाबत जाणून घेणार आहोत. थार ४*२ आणि ४*४ या भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ घालत आहेत. यांची सक्सेसर म्हणून Mahindra Thar 5 door ही बहुचर्चित ऑफ रोड एसयूव्ही 2024 च्या मध्यावधीत लॉन्च केली जाणार आहे. महिंद्रा कंपनी कडून आलेल्या अपडेट नुसार Mahindra Thar 5 door, १४ ऑगस्ट २०२४ रोजी भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली जाणार आहे.
Mahindra Thar 5 door टेस्टिंग
महिंद्रा थार ची सक्सेसर म्हणून या Mahindra Thar 5 door कडे पाहिले जात आहे. सोबतच कंपनी अनेक नवीन अपडेट यामध्ये करू शकते. भारतातील रस्त्यांवर अनेकदा टेस्टिंग दरम्यान महिंद्रा थार ला पाहिले गेले आहे. थार चा लुक हा साधारण महिंद्रा आरमाडा सारखा सिमिलर असून त्यामध्ये कॉस्मेटिक चेंज करून आता पाच दरवाजे असलेली अपडेटेड आणि या अगोदरच्या थार पेक्षा जास्त स्पेस मिळेल, तसेच याचा समोरील लूक हा साधारण आता बाजारपेठे मध्ये असणाऱ्या थार सारखाच पाहायला मिळत आहे.
Mahindra Thar 5 door स्पर्धा
सध्या भारतीय बाजारपेठेत असलेल्या ऑफ रोड एसयूव्ही फोर्स गुरखा, मारुती जिम्नी यांच्याशी या अपडेटेड थार ची थेट स्पर्धा असेल. मारुतीने देखील लॉन्च केलेल्या जिम्नी वरती डिस्काउंट द्यायला सुरुवात केली आहे. भारतातील गुरखा, जिम्नी आणि थार या ऑफ रोड कॅपॅबिलिटी असणाऱ्या वाहनांपैकी कोणती भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरते हे थार च्या लॉन्च नंतरच पाहता येईल.
Mahindra Thar 5 door किंमत
पाच दरवाजे असलेल्या नवीन थार ची किंमत अंदाजे पंधरा ते सोळा लाख रुपये असू शकते. तसेच कंपनीकडून किती व्हेरियंट लॉन्च केले जातात यावर अवलंबून असेल. नवीन कार ची किंमत व्हेरियंट आणि फीचर्स यावर अवलंबून असेल याबाबत अपडेट हे लॉन्च इवेंट दरम्यानच समजू शकतील.
Mahindra Thar स्पेस आणि फीचर्स
नवीन थार ही ५ दरवाजे पर्यायासह येणार असून यामध्ये सीटिंग कॅपॅसिटी, आतील जागा आणि व्हिलबेस देखील वाढला आहे. आत देखील आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. मिडिया रिपोर्ट नुसार यामध्ये पूर्णतः नवीन इंटेरियर चांगले डॅशबोर्ड, अँड्रॉइड ऑटो, ॲपल कार प्ले, सुरक्षेसाठी एअर बॅग, यासह ADAS – Advance Driver Assistance System देण्यात येण्याची शक्यता आहे.
Mahindra Thar इंजिन
नवीन थार मध्ये आपणास दोन इंजिन पर्याय मिळू शकतात. यामध्ये 2.2 Ltr. mHawk डिझेल इंजिन 2.0 Ltr. mStallion पेट्रोल इंजिन या इंजिनांसह नवीन इंजिन पर्याय आणू शकतात. यासह ड्राईव्ह ट्रेन पर्यायामध्ये ४*२ आणि ४*४ पर्याय असतील. महिंद्रा या वर्षाच्या मध्यापर्यंत १४ ऑगस्ट २०२४ रोजी थारचे ऑफिशियल लॉन्चिंग करणार आहे.
Pingback: Foldable iPhone ॲपल देखील लॉन्च करणार जाणून घ्या अपडेट...
Pingback: New Ferrari Purosangue information in Marathi
Pingback: Bajaj Pulsar NS 400 z info in marathi लवकरच NS 400 होणार लाँच