How to Earn Money From Fiverr

How to Earn Money From Fiverr : जग फार वेगाने प्रगती करत आहे, तितक्याच वेगाने माणसांची जीवनशैली देखील बदलत आहे. या काळात प्रगती सोबत नोकरीची व्याख्या देखील बदलली आहे. आता पैसे कमवण्यासाठी आठ तास -बारा तास अशा नोकरीची आवश्यकता नाही. ज्याच्याजवळ कौशल्य आहे, तो व्यक्ती ऑनलाईन देखील पैसे कमवू शकतो. या लेखात आपण अशाच एका ऑनलाईन प्लॅटफॉर्म बद्दल जाणून घेणार आहोत.

Fiverr हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की ज्याद्वारे लोक त्यांच्या कौशल्यानुसार घरूनच चांगले पैसे कमवत आहेत. या प्लॅटफॉर्मवर डिझाइनिंग, मार्केटिंग, ग्राफिक्स, लेखन इत्यादी सेवा जगभरात देऊन लोक चांगली कमाई करत आहेत.

How to Earn Money From Fiverr
How to Earn Money From Fiverr

पुढील मार्गाने कमवू शकतो ऑनलाईन पैसे How to Earn Money From Fiverr

कंटेंट रायटिंग

मित्रांनो जर तुम्हाला लेखनाची आवड असेल, तर तुम्ही Fiverr या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर लेखन करून देखील चांगले पैसे कमवू शकता, डिजिटल मार्केटमध्ये कंटेंटला खूप महत्त्व आहे, अनेक जण विपणनासाठी इंटरनेटचा मार्ग अवलंबून ऑनलाइन मोडद्वारे व्यवसायाच्या शाखा विस्तारत आहेत. तुम्ही जर कॉन्टॅक्ट रायटिंग करत असाल तर तुम्ही याद्वारे चांगले पैसे कमवू शकता. यासाठी तुमचा कंटेंट हा दर्जेदार असणे गरजेचे आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला तुमच्या निवडीचे स्वातंत्र्य असते म्हणजे तुम्हाला येत असलेल्या भाषेमध्ये तुम्ही कंटेंट रायटिंग करू शकता. तुम्ही एकापेक्षा अधिक भाषांच्या जाणकार असाल तर तुम्ही अधिक भाषांमध्ये कंटेंट लिहून पैसे कमवू शकता.

डेटा एन्ट्री

डेटा एन्ट्री हे एक असे काम आहे जे तुम्ही घर बसला एका पीसीद्वारे किंवा लॅपटॉप द्वारे करू शकता या मार्फत देखील तुम्ही घर बसल्या Fiverr वर चांगले पैसे कमवू शकता. डेटा एन्ट्री चा अनुभव असल्यास उत्तमच, Fiverr वर तुम्हाला असे बरेच ग्राहक मिळतील, जे तुम्हाला डेटा एन्ट्री चे काम देऊ शकतात. पण यासाठी तुम्हाला तुमची प्रोफाईल वर बनवावी लागेल. तुम्ही फिवर वर डेटा एन्ट्री सर्विस देणार असाल, तर तुम्ही याद्वारे घरबसल्या चांगले पैसे कमवू शकता. तुम्ही डेटा स्क्रॅपिंग, वेब रिसर्च, कलेक्शन यासारख्या सुविधांच्या माध्यमातून सेवा देऊ शकता. गुगल स्प्रेडशीट, एक्सल किंवा एम एस वर्ड मध्ये तुम्ही काम करू शकता.

भाषांतर करणे

तुमची जर एकापेक्षा अधिक भाषांवर चांगली पकड असेल वा एकापेक्षा अधिक भाषा तुम्हाला अवगत असतील तर तुम्ही Fiverr वर भाषांतराचे काम करून चांगले पैसे कमवू शकता. या कामामध्ये ग्राहकाने दिलेली सामग्री ही ग्राहकास अपेक्षित असलेल्या भाषेमध्ये भाषांतरित करून द्यावी लागेल. त्यामध्ये लेख, डेटा, इन्फोग्राफिक्स, व्हिडिओ इत्यादी माध्यमे असू शकतात. जागतिकीकरणामुळे आणि बदलत्या धोरणामुळे सर्व देश एकमेकांशी व्यापार व्यवहार, देवाणघेवाण इत्यादी मध्ये पुढाकार घेत आहेत, यामुळे एक स्तरावर अनेक संधी उपलब्ध होत आहेत. अशातच प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्या देशाची भाषा समजणे शक्य नसते. म्हणून ते लोक भाषांतर करणारे आपल्या कामासाठी नेमतात ज्याद्वारे ते जगातील कोणत्याही देशात अडथळ्यांशिवाय त्यांचा व्यवसाय व्यवहार देवाणघेवाण वाढवू शकतील. जर तुम्हास एकापेक्षा अधिक भाषा येत असतील तर तुमच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे, जो तुम्हास घरबसल्या चांगले पैसे कमवण्याची संधी देऊ शकतो.

ग्राफिक्स/ लोगो डिझाईन करणे

एखादी गोष्ट मनावर बिंबविण्यासाठी आजकाल सगळ्याच मल्टिनॅशनल कंपन्या ग्राफिक्स मार्फत विपणन करतात. त्यामुळे व्यवसाय वृद्धी होण्यास मदत होते. Fiverr वर देखील लोगो किंवा ग्राफिक्स डिझाइनिंग करून तुम्ही चांगले पैसे कमावू शकता, मराठी तुमच्याकडे ग्राफिक्स डिझाइनिंग चे ज्ञान आणि कौशल्य असणे गरजेचे आहे. यामार्फत Fiverr वर असे जगभरातील असंख्य ग्राहक मिळतील की जे ग्राफिक्स किंवा लोगो डिझाईनिंग करून घेण्यासाठी पैसे मोजण्यास तयार असतात. लोगो हा ब्लॉग, चॅनेल त्यांची ओळख म्हणून काम करत असतो, साठी ग्राहक हे दर्जेदार लोगो बनवून घेण्यास सुख असतात, ग्राफिक्स चे देखील बरेच काम येथे तुम्हाला मिळू शकते. तुम्हाला लोगो डिझाईन ग्राफिक्स बद्दल माहिती असल्यास, ग्राहकाच्या आवश्यकतेनुसार आकर्षक लोगो डिझाईन करून तुम्ही Fiverr मार्फत पैसे कमावू शकता.

3 Easy Ways to Earn Money Online

वेबसाईट डिझाईन करणे

तुम्ही जर डेव्हलपर असाल तर Fiverr द्वारे चांगले पैसे वेबसाईट डिझाईनिंग द्वारे कमवू शकता. आज व्यवसायाची प्रत्येक गोष्ट ग्लोबली मांडण्यासाठी वेबसाईटची आवश्यकता असते. यासाठी वेबसाईट डिझाईनिंग करून घेणारे ग्राहक Fiverr वर उपलब्ध आहेत. जर तुम्ही डेव्हलपर असाल तर तुमच्यासाठी हीच चांगली संधी आहे. तुम्हास पिवर वर बरेच वेगवेगळे क्लाइंट सापडतील ज्यांना त्यांच्या इच्छेनुसार वेबसाईट बनवायची आहे. यासाठी तुम्ही तुमच्या प्रोफाईल प्रमाणे शुल्क आकारू शकता. वर्डप्रेस वेबसाईट तर तुम्ही कोडिंग शिवाय डिझाईन करू शकता. आणि ऑनलाइन कमाई करू शकता.

How to Earn Money From Fiverr
How to Earn Money From Fiverr

Fiverr खाते कसे बनवावे?

पुढे दिलेल्या पायऱ्या अनुसरून तुम्ही Fiverr वर खाते तयार करू शकता.

 • सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्या
 • https://www.fiverr.com
 • Join/ signup वर क्लिक करून तुम्ही गुगल किंवा इतर सोशल मीडिया खात्याद्वारे signup करून खाते बनवू शकता.
 • युजरनेम आणि पासवर्ड सेट करा.
 • प्रोफाइल बनवा- त्यामध्ये तुम्ही देणारी सेवा, तुमची कौशल्य आणि केलेली इतर कामे समाविष्ट करा.
 • पुढे नियम व अटी त्यांचे पूर्ण वाचन करून त्या स्वीकारा.
 • ईमेल किंवा एसएमएस द्वारे तुमचे खाते व्हेरिफाय करून घ्या.
 • प्रोफाइल मध्ये तुमच्या कामाचा अनुभव, उदाहरण जोडा त्यामुळे येणारे ग्राहक तुमचे काम पाहू शकतील.

Fiverr काम कसे कराल?

 • Fiverr वर तुमच्या खात्यात लॉगिन करा.
 • आता Start Selling किंवा Become a Seller वर क्लिक करून तुमच्या स्किल आणि इंटरेस्ट नुसार Service सिलेक्ट करा.
 • Create a Gig – तुम्ही देत असलेली सर्विस त्याचे विश्लेषण, त्या सेवेसाठी आकारात असलेली किंमत टाकून संपूर्ण माहिती सहित क्रिएट गिग वर क्लिक करा.
 • Gig निश्चित करण्याअगोदर एकदा चेक जरूर करा.
 • तुम्ही देत असलेल्या सेवेच्या बदल्यात ठराविक अशी किंमत निश्चित करा.

तर मित्रांनो Fiverr प्लॅटफॉर्म बद्दल तुम्हास बऱ्यापैकी माहिती मिळाली असेल. असेच नवनवीन गोष्टींबद्दल जाणून घेण्यासाठी आमचे पेज कोकण कल्चर नक्की फॉलो करा. How to Earn Money From Fiverr हा लेख कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा.

देखील वाचा

Dashgrivha

Foldable iPhone

New Ferrari Purosangue

How to Earn Money From Fiverr | How to Earn Money From Fiverr | How to Earn Money From Fiverr

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
All New Mahindra’s Budget Friendly Compact SUV XUV 3X0 Launch पृथ्वी बद्धल या रोचक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? top fact about earth उन्हाळ्यात आरोग्याची अशी घ्या काळजी. सुपरस्टार महेश बाबू चे कार कलेक्शन पाहून व्हाल थक्क | Mahesh Babu Luxury Car Collection Ferrari Purosangue फरारी ने लाँँच केली SUV तुम्ही पाहिली का ?