Maruti Jimny पुढील लेखात मारुती जिम्नी बाबत जाणून घेणार आहोत. तीची किंमत १०.७४ लाख रुपयांपासून सुरू होते, आधीच्या तुलनेत ही किंमत २ लाख रुपयांनी स्वस्त झाली आहे. तर आता यात काय बदल आहे, काय फरक आहे, तुम्ही ती खरेदी करावी की नाही ?
मारुती जिम्नी मध्ये Zeta आणि Alfa असे व्हेरीएन्ट आहेत. मारुती सध्या जिम्नी वर तुम्हाला कंपनी १ ते २ लाखांची सूट देखील देत आहे. जर तुम्ही Zeta घेत असाल तर किंमत आधीच २ लाख रुपयांनी कमी झाली आहे. तुम्ही Alfa घेत असाल तर किंमत १ लाख रुपयांनी कमी झाली आहे. समोरील बाजूस क्रोम ग्रील मिळते तसेच हॅलोजन हेडलॅम्प, हॅलोजन टर्न सिग्नल मिळतात. मारुती जिम्नीचा लूक एकदम भारदस्त मिळतो, मॉर्डन जिप्सी असल्यासारखा भास होतो. यामध्ये युनिक फीचर म्हणजे हेडलाईट वॉशर मिळतो. दर्शन भागात रफ टेक्सचर प्लास्टिक मटेरिअल आहे जे स्क्रॅच रेझिस्टंट आहे.
Maruti Jimny सर्वसाधारण माहिती
माइलेज | १६.३९ किमी/लीटर |
इंजिन | १४६२ सी.सी. |
पॉवर ( बीएचपी @ आरपीएम) | १०३.३९ बीएचपी @ ६००० आरपीएम |
टॉर्क ( एन एम @ आरपीएम) | १३४.२ एन एम @ ४००० आरपीएम |
सिलेंडर | ४ |
इंधन प्रकार | पेट्रोल |
सीटिंग कॅपॅसिटी | ४ |
ट्रान्समिशन | मॅन्युअल / ऑटोमॅटिक |
बूट स्पेस | २११ लीटर |
फ्युल टँक | ४० लीटर |
बॉडी टाईप | एसयूव्ही |
ग्राउंड क्लिअरन्स | २१० एमएम |
डायमेन्शन | Lenght 3985 Width 1645 height 1720 |
व्हील बेस | 2590 |
वजन | 1545 Kgs |
पावर स्टेरिंग | Yes |
पावर विंडो फ्रंट | Yes |
ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल | Yes |
ऍडजेस्टेबल स्टेरिंग | Yes |
रीडिंग लॅम्प | Yes |
क्रूज कंट्रोल | Yes |
फोल्डर सीट | Yes |
ऑटोमॅटिक हेड लॅम्प | Yes |
डिजिटल क्लॉक | Yes |
एबीएस | Yes |
ब्रेक असिस्ट | Yes |
सेंट्रल लॉकिंग | Yes |
एअर बॅग | 6 |
व्हीकल स्टॅबिलिटी कंट्रोल सिस्टीम | Yes |
रियर कॅमेरा | Yes |
हिल असिस्ट | Yes |
Maruti Jimny Zeta मॅन्युअल मध्ये १.५ लिटर नॅचरल ऍस्पेक्ट पेट्रोल इंजिन मिळतं जे १०३ हॉर्स पॉवर आणि १३४ एन एम टॉर्क जनरेट करते. ऑटोमॅटिक वर्जन कडे जाल तर किंमत थोडी वाढते. इंजिनच्या वरील भागाला कोणत्याही प्रकारच इन्सुलेशन मिळत नाही. मारुती जिम्नीच इंजिन खूप रिफाइंड आणि स्मूथ आहे. यात ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन ऑफर केले जाते.
बिल्ड क्वालिटी आणि फिट अँड फिनिश उत्तम आहे. मारुती जिम्नी साईड प्रोफाइलने पाहिल्यास मिनी जी वॅगन असल्यासारखा फील येतो. डिझाईन बॉक्स टाईप वाटत असलं तरीही रोड प्रेझेंस चांगला आहे.
बेस व्हेरिएंट मध्ये अलॉय व्हील मिळत नाहीत. टायर प्रोफाइल ( १९५/८० आर १५ ) साईज मिळते.
नॉर्मल मिरर जे इलेक्ट्रॉनिक अड्जस्टेबल मिळतात. बेसिक हँडल, नॉर्मल अँटेना, तसेच मागच्या प्रोफाईल ने बघितल्यास मागे टेल माउंटेड स्पेअर व्हील मुळे चांगला लुक येतो. मागील बाजूस स्टीलचे गेट आहे जे एका बाजूने उघडते, ते हायड्रोलिक असिस्टेड आहे, त्यामुळे तुम्हाला जास्त ताकद वापरावी लागत नाही ही एक चांगली गोष्ट आहे, योग्य बूट स्पेस मिळतो. आत मध्ये लाईट, १२ व्होल्टचे चार्जिंग सॉकेट आणि बूट स्पेस खालीच तुम्हाला टूल किट मिळतो.
आतमध्ये नॉर्मल हँडल, विंडो कंट्रोल, साईट पॅसेंजर साठी ॲडजस्टेबल हेड रेस्ट, फोल्डेबल सीट मिळतात. आत मध्ये टाटा नेक्सन इतका स्पेस नसला तरी बऱ्यापैकी स्पेस, अंडर थाई सपोर्ट आणि हेड रूम उपलब्ध आहे. मधल्या रोमध्ये दोन एडल्ट आणि एक मूल आरामात बसू शकतात. मागे रियर वायपर, डीफॉरगर, रिअर कॅमेरा, रिअर पार्किंग सेंसर दिले आहेत.
पुढील पुढील बाजूस एक रगेड मजबूत हार्ड प्लास्टिक इंटरियर लुक मिळतो. ऍडजेस्टेबल स्टेरिंग, कॉल कंट्रोल, मल्टीमीडिया कंट्रोल, हेडलाईट कंट्रोल, अनलॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर पाहून जिप्सी ची आठवण येते. यासोबत सात इंचाचा टच पॅनल मिळतो,जो अँड्रॉइड ऑटो ॲपल कार प्ले त्यांना सपोर्ट करतो.
गिअर सोबत ऑफ रोडिंग साठी एक्स्ट्रा टू हाय, फोर हाय, फोर लो मोड देण्यात आले आहेत. ज्या द्वारे तुम्ही ऑफ-रोडिंगची पूर्ण मजा घेऊ शकता. मारुती जिम्नी ला ‘माउंटन गोट’ डोंगरी शेळी असे देखील म्हटले जाते कारण डोंगरातल्या शेळीसारखी, ती अशी कुठेही चढते ही वजनाने हलकी असून ऑफ रोडिंग कॅपेबिलिटीसाठी बनवली गेली आहे. तसेच अरुंद रस्त्यांवरूनही सहज जाते.
Maruti Jimny व्हेरियंट्स आणि किमती
Maruti Jimny Zeta | 12.74 lakh |
Maruti Jimny Alfa | 13.69 lakh |
Maruti Jimny Alfa Dual Tone | 13.85 lakh |
Maruti Jimny Zeta AT | 13.94 lakh |
Maruti Jimny Alfa AT | 14.89 lakh |
Maruti Jimny Alfa Dual Tone AT | 15.05 lakh |
जर तुम्ही मारुती जिम्नीच्या खरेदीचा प्लॅन करत असाल तर आता वर्षा अखेरीस कंपनी गाड्यांवर भरघोस डिस्काउंट देत आहे. Zeta व्हेरीएन्ट सरासरी दोन लाख तसेच Alfa व्हेरीएन्ट वरती एक लाख असा डिस्काउंट दिला जात आहे. हा डिस्काउंट डिसेंबर 2023 अखेरपर्यंत असेल.
मारुती जिम्नी हे एक विश्वासार्ह वाहन आहे, सोबत तुम्हाला मारुती सुझुकीचा विश्वास मिळतो.
Visit Official Web Site – Click here
Pingback: New Ferrari Purosangue information in Marathi