तेजश्री बद्दल या   रोचक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?

तिचे शालेय शिक्षण हे चंद्रकांत पाटकर विद्यालय डोंबिवली मध्ये झाले आहे.

तेजश्रीने   व्ही झी वझे आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स या कॉलेज मधून पदवीचं शिक्षण घेतलं आहे.

तेजश्री ही अभिनया सोबत दिग्दर्शन आणि निर्मितीची धुरा देखील सांभाळते.

तिने झेंडा (2010) या सिनेमामधून मराठी चित्रपट सृष्टी मध्ये पदार्पण केले 

तेजश्रीला 2013 मध्ये होणार सून मी या घरची या मालिकेमध्ये जान्हवीची भूमिका मिळाली. आणि शशांकसोबत तिच्या जोडीला प्रेक्षकांनी खूप पसंत केले.   

तिने शर्यत, लग्न पाहावे करून, डॉ. प्रकाश बाबा आमटे, जजमेंट, असेही एकदा व्हावे यांसारख्या विविध मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. 

तेजश्रीने बबलू बॅचलर या हिंदी सिनेमातून हिंदी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. या सिनेमात तिने शर्मन जोशी सोबत काम केलं आहे. 

तेजश्री आणि तिची मैत्रीण कीर्ती नेरकर या दोघीनी मिळून 'टेक ड्रीम्स' नावाची प्रॉडक्शन कंपनी सुरु केली आहे.

या प्रोडक्शन कंपनीच्या आधारे या दोघीना वेगवेगळ्या गोष्टी प्रेक्षकांच्या समोर घेऊन यायच्या आहेत.