Xiaomi Pad 6 मित्रांनो दैनंदिन जीवनात आपण अनेक इलेक्ट्रॉनिक्स डिवाइस वापरत असतो, किंबहुना आज आपण पाहिले तर अनेक डिवाइस ने आपण घेरलेले आहोत. त्यांच्या मदतीने आपली कामे सुखकर होत असतात. जसे की मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट वॉच, ब्लूटूथ, हेडफोन इत्यादी. ३०,०००/- च्या बजेटमध्ये मध्ये जर तुम्ही एक दमदार फीचर्स असलेला टॅब्लेट शोधत आहात, तर शाओमी टॅब ६ हा तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो, शाओमी ने हा टॅबलेट १८ एप्रिल २०२३ ला लॉन्च केला. जो मेटल बॉडी सह येतो. सदर लेखात आपण शाओमी पॅड ६ बाबत संपूर्ण मराठी माहिती जाणून घेणार आहोत.
तुम्हाला Xiaomi Pad 6 हा डे टु डे वापरासाठी उत्तम असा टॅब आहे. ज्याचे वजन ४९० ग्रॅम आणि जाडी ६.१ mm इतकी आहे हा टॅबलेट १४४ रिफ्रेश रेट सह seven stage adaptive sync ला सपोर्ट करतो. तसेच आयपी ५३ रेटिंग रेटिंग मुळे हा स्प्लॅश आणि डस्ट प्रुफ आहे. जो अँड्रॉइड १३ वर आधारित आहे. डॉल्बी व्हिजन ऍटमॉस चा सपोर्ट दिला आहे ज्यामुळे तुमचा मल्टी मीडियाचा एक्सपिरीयन्स चांगला बनतो.
Xiaomi Pad 6 सर्वसाधारण माहिती
मॉडेल | Xiaomi Pad 6 |
डायमेन्शन | 254*165.2*6.5mm (10.0*6.50*0.26 inches) |
लॉन्च | १८ एप्रिल २०२३ |
नेटवर्क | No sim |
व्हेरियंट्स | ८ जीबी + २५६ जीबी ६ जीबी + १२८ जीबी |
किंमत | ३०,४९८/- २६,९९९/- |
डिस्प्ले | २.८ k २८८०*१८०० ११ इंच १४४ Hz रेफ्रेश रेट ३०९ PPI एच डी आर १० (हाय डायनॅमिक रेंज) ५५० नीट ब्राईटनेस लो ब्लू लाईट प्रोटेक्शन गोरिला ग्लास ३ प्रोटेक्शन |
कलर्स | ब्लॅक, ब्ल्यू आणि गोल्ड |
प्रोसेसर | कॉलकॉम SM8250-AC स्नॅप ड्रॅगन ८७० प्रोसेसर |
ऑपरेटिंग सिस्टीम | अँड्रॉइड 13 MIUI Pad 14 |
कॅमेरा | 13 मेगापिक्सल f/2.2, ड्युअल एलईडी फ्लॅश, एचडीआर, पॅनारोमा, 4k @30fps, 1080@30/60fps 8 मेगापिक्सल f/2.2 |
सीपीयू | ऑक्टा कोर(1*3.2 GHz Kryo) |
रॅम | ८ जीबी / ६ जीबी |
स्टोरेज | १२८जीबी /२५६ जीबी |
कनेक्टिव्हिटी | वायफाय ब्लूटूथ 5.2 यूएसबी टाइप सी 3.2 |
बॅटरी | ८८४० mAH |
स्पीकर | कॉड स्पीकर डॉल्बी व्हिजन ऍटमॉस |
बॉक्स कंटेंट | शाओमी पॅड ६ ३३ वॅट एडाप्टर यु एस बी टाईप सी केबल क्विक स्टार्ट गाईड वाॅरंटी कार्ड |
Xiaomi Pad 6 व्हेरियंट्स आणि किंमत
८ जीबी + २५६ जीबी |
६ जीबी + १२८ जीबी |
शाओमी पॅड ६ चे सिक्स चे सध्या ८ जीबी + २५६ जीबी, ६ जीबी + १२८ जीबी असे दोन व्हेरियंट्स उपलब्ध आहेत. यांची किंमत अनुक्रमे २६,९९९/- आणि ३०,४९८/- वरील किंमत ही वेगवेगळ्या ई-कॉमर्स साइटवर वेगवेगळी असू शकते.
Xiaomi Pad 6 डिझाईन आणि डिस्प्ले
शाओमी टॅब ६ मध्ये अनेक दमदार फीचर्स मिळतात, शाओमी 6 चे डिझाईन हे सडपातळ आणि वापरण्यास हलके असे आहे, याची बिल्ड क्वालिटी उत्तम असून मेटल बॉडी मिळते. याला कॉर्निंग गोरिला ग्लास तरी चा प्रोटेक्शन मिळतं
याला २.८ k २८८०*१८०० रिझोल्युशन असलेला (२७.९४ cm) ११ इंचाचा डिस्प्ले मिळतो. सोबत १४४ Hz स्मूथ रेफ्रेश रेट, ३०९ PPI पिक्सल पर इंच, डीसीपी पी ३ वाईड कलर, एच डी आर १० (हाय डायनॅमिक रेंज) सपोर्ट, ५५० नीट ब्राईटनेस, लो ब्लू लाईट प्रोटेक्शन, ट्रू कलर ऑटोमॅटिक कलर ऍडजेस्टमेंट असा अनेक दमदार फीचर्स असलेला टू के डिस्प्ले मिळतो.
Xiaomi Pad 6 कलर्स
शाओमी टॅब ६ मध्ये तुम्हाला ब्लॅक, ब्ल्यू आणि गोल्ड असे तीन कलर पर्याय मिळतात.
Xiaomi Pad 6 प्रोसेसर आणि ऑपरेटिंग सिस्टिम
शाओमी टॅब ६ मध्ये तुम्हाला कॉलकॉम SM8250-AC स्नॅप ड्रॅगन ८७० प्रोसेसर मिळतो, जो एक चांगला परफॉर्मन्स तुम्हाला प्रोव्हाइड करतो. तसेच ऑपरेटिंग सिस्टीम अँड्रॉइड 13 MIUI Pad 14 दिली आहे, तसेच सीपीयू ऑक्टा कोर(1*3.2GHz Kryo)
कॅमेरा
या दमदार टॅबलेट मध्ये तुम्हाला मेन कॅमेरा 13 मेगापिक्सल f/2.2, ड्युअल एलईडी फ्लॅश, एचडीआर, पॅनारोमा,4k @30fps, 1080@30/60fps
सेल्फी कॅमेरा 8 मेगापिक्सल f/2.2, 1080@30fps, ज्या मार्फत व्हिडिओ कॉलिंग, फोटो, व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता.
स्टोरेज-रॅम
दमदार प्रोसेसरसह तुम्हाला यामध्ये ८ जीबी एल पी डी आर ५ रॅम आणि २५६ जीबी यु.एफ.एस. ३.१ स्टोरेज मिळतो. यात तुम्हाला एक्सट्रा मेमरी कार्ड साठी एक्स्ट्रा स्लॉट मिळत नाही.
कनेक्टिव्हिटी
कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये वायफाय ८०२.११ ए/बी/जी/एन/ए/६, ड्युअल बँड, वाय-फाय डायरेक्ट तसेच ब्लूटूथ 5.2, ए२डीपी, LE, यूएसबी टाइप सी 3.2 ॲक्सेसरी कनेक्टर मिळतो. त्यामध्ये कोणताही प्रकारची सिमकार्ड कनेक्टिव्हिटी/ सिम कार्ड पोर्ट मिळत नाही.
बॅटरी बॅकअप
या टॅबच्या मदतीने सलग दोन दिवस मल्टीमीडियाचा आनंद घेऊ शकता, यामध्ये ८८४० mAH दीर्घकाळ चालणारी बॅटरी मिळते. ज्याद्वारे तुम्ही मल्टी टास्किंग चा आनंद कोणताही खंड न पाडता घेऊ शकता. चार्जिंग साठी तुम्हाला 33 वॅटचा चार्जर मिळतो.
स्पीकर
शाओमी पॅड ६ मध्ये डॉल्बी व्हिजन ऍटमॉस सपोर्ट कॉड स्पीकर मिळतात. डॉल्बी व्हिजनमुळे आवाजाची गुणवत्ता अधिक चांगली होते.
डायमेन्शन
शाओमी पॅड ६ चे डायमेन्शन 254*165.2*6.5mm (10.0*6.50*0.26 inches) असून त्याचे वजन 490 ग्रॅम (1.08 lb) आहे. बिल्ड क्वालिटी बद्दल बोलायचे झाल्यास, ॲल्युमिनियम फ्रेम तसेच अल्युमिनियम बॅक आणि समोरील बाजूस गोरिला ग्लास ३ चे प्रोटेक्शन मिळते.
बॉक्स कंटेंट
बॉक्समध्ये आपणास शाओमी पॅड ६, ३३ वॅट एडाप्टर, यु एस बी टाईप सी केबल, क्विक स्टार्ट गाईड, वाॅरंटी कार्ड.
शाओमी पॅड ६ हा ३०,०००/- च्या आतील किमतीमध्ये येणारा एक दमदार आणि भरपूर सारे फीचर्स मिळणारा टॅब आहे. जो पूर्णता व्हॅल्यू फॉर मनी ठरतो. आता नाताळ दरम्यान शाओमी पॅड ६ वरती वेगवेगळ्या ई-कॉमर्स साईड फ्लिपकार्ट, ॲमेझॉन वर चांगला डिस्काउंट मिळू शकतो.
i phone 15 price, specs and features in Marathi
13. Семейные консультации юриста: как урегулировать споры?
юридическая помощь юридическая помощь .
Pingback: Shopsy.in वर खरेदी करा इतर ई-कॉमर्स कंपन्यांपेक्षा कमी किमतीत.
Truly remarkable!