Yamaha MT 15 v2 : यामाहा अनेक दशके भारतीय दुचाकी बाजारात आपला दबदबा कायम ठेवला आहे. अगदी यामाहा RX100 पासून ते अगदी यामाहा आर १५ अशा अनेक दुचाकी भारतीय बाजारपेठेत सादर करून भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. यामाहा ही भारतातील प्रीमियम दुचाकी बनवणारी एक अग्रगण्य कंपनी आहे. जी भारतात आपल्या १३ दुचाकी मॉडेल्स वितरित करते, यामध्ये प्रामुख्याने MT 15 v2, R 15 v4, R 15 s, FZ FI v3 / v4, RAY ZR 125 FI Hybrid, Arox 155, Fascino 125 FI Hybrid, FZ x, MT 03, F Z 25, R3, FZ s 25 अशा स्कूटर, मोटार सायकल, मॅक्सि स्कूटर, स्पोर्ट बाईक, सुपर बाईक वेगवेगळ्या प्रकारच्या दुचाकी यामाहा भारतीय बाजारात वितरित करते आणि विक्री पाश्चात सेवा पुरविते.
यामाहा च्या अग्रेसिव्ह स्पोर्टी डिझाईन मुळे यामाहाचा एक मोठा चाहता वर्ग भारतात आहे. प्रीमियम सेगमेंट मध्ये यामाहा एमटी ०३, आर ३ या दुचाकींची विक्री करते.
या लेखामध्ये आपण केटीएम कंपनीला तगडी टक्कर देणारी १५० सीसी सह येणारी दमदार स्पोर्टी दुचाकी एमटी १५ बाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
Yamaha MT 15 v2 ही R15 चे नेकेड स्ट्रीट फायटर व्हर्जन असून ती स्पोर्टी आणि दमदार मोटरसायकल आहे, जी दैनंदिन रायडर्सच्या वापरासाठी डिझाईन केलेली आहे. Yamaha MT 15 v2 ही KTM 125 Duke, Bajaj Pulsar NS 200, Bajaj Pulsar N 250, TVS RTR 2004v यांसोबत स्पर्धा करते आणि यांना तगडे आव्हान देखील देते. यामाहा एमटी १५ ही अनेक आधुनिक फीचर्स सह येते. या दुचाकीची किंमत १.६८- १.७४ लाख* (एक्स शोरूम) इतकी आहे.
Bajaj Pulsar NS 400 भारतीय बाजारपेठेत लॉन्च
Yamaha MT 15 v2
मॉडेल | Yamaha MT 15 v2 |
इंजिन | १५५ सी सी |
पॉवर | १८.१ बीएचपी @१००० आरपीएम |
टॉर्क | १४.१ एन एम @१००० आरपीएम |
मायलेज | ४८-५६ के एम पी एल |
ट्रान्समिशन | ६ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स |
गिअर शिफ्ट पॅटर्न | १ डाऊन ५ अप |
फ्युल कॉम्प्रेशन रेशो | ११.६:१ |
फ्युल टॅंक | १० लिटर |
इमिशन | BS 6 |
फ्युल | पेट्रोल पेट्रोल |
ब्रेकिंग | ड्युअल चॅनेल ए बी एस |
वजन | १४१ किलो |
ग्राउंड क्लिअरन्स | १७० एम एम |
सीट हाईट | ८१० एम एम |
Yamaha MT 15 v2 दमदार इंजिन
Yamaha MT 15 v2 मध्ये १५५ सीसी लिक्विड कुल्ड (SOHC) सिंगल ओव्हरहेड कमशाफ्ट सिंगल सिलेंडर इंजिन येते जे १८.४ पी एस पाॅवर @१०,००० आरपीएम आणि १४.१ एन एम @७५०० आरपीएम टॉर्क जनरेट करते. सहा स्पीड गिअरबॉक्स सह यामध्ये वेरीएबल वॉल्व ऍक्च्युएशन (VVA) टेक्नॉलॉजी येते जी एका ठराविक आरपीएम नंतर अधिक ऊर्जा आणि टॉर्क जनरेट सक्षम आहे. एमटी १५ मध्ये १० लिटरची इंधन क्षमता असलेल फ्युल टॅंक देण्यात आला आहे, जो तुम्हाला ५००-५५० किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज प्रदान करतो. यामाहा च इंजिन हे रिलायबल आणि विश्वासू आहेत जे आपल्या दमदार कामगिरीसाठी ओळखले जातात.
Yamaha MT 15 v2 फीचर्स
Yamaha MT 15 v2 मध्ये साईड स्टॅन्ड इंजिन कट ऑफ सेंसर, वन असिस्ट वन स्लीपर क्लच तसेच ड्युअल चॅनेल ए बी एस, व्ही व्ही ए टेक्नॉलॉजी, बाय फंक्शनाल एलईडी हेड लॅम्प एलईडी टेल लॅम्प, मल्टी फंक्शनल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, गिअर पोझिशन इंडिकेटर, अलॉय व्हील, ट्यूबलेस रेडियल टायर, वाय कनेक्ट ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी राईड इन्फॉर्मेशन, लास्ट पार्किंग लोकेशन, अपसाईड डाऊन फोर्क्स सह डिझाईन आणि फिट अँड फिनिश उत्तम मिळते.
Yamaha MT 15 v2 किंमत आणि व्हेरियंट
Yamaha MT 15 v2 Standard | 1,68,000 (Ex- Showroom) |
Yamaha MT 15 v2 Deluxe | 1,72,700 (Ex- Showroom) |
Yamaha MT 15 v2 Moto GP Edition | 1,73,500 (Ex- Showroom) |
Yamaha MT 15 v2 कलर पर्य
Racing Blue |
Ice Fluo-Vermillion |
Metallic Black DLX |
Dark Matte Blue |
Metallic Black |
MotoGP Edition |
Cyan Storm Dlx |
Cyber Green Dlx |
बिल्ड क्वालिटी, सस्पेन्शन, ब्रेक
यामाहा एमटी १५ मध्ये अनेक दर्जेदार फीचर्स मिळतात. प्रामुख्याने एमटी ही डेल्टा बॉक्स फ्रेम वर विकसित केलेली आहे, यामध्ये तुम्हाला पुढे अपसाईट डाऊन सस्पेन्शन मागे मोनोशॉक सस्पेन्शन मिळतो. या 155 सीसीच्या दुचाकी मध्ये ब्रेकिंग साठी अनुक्रमे २८२ आणि २२० एम एम डिस्क सह ड्युअल चॅनेल ए बी एस यामध्ये ऑफर करण्यात आले आहेत, यामुळे ब्रेकिंग अधिक सुरक्षित होते. एमटी १५ मध्ये तुम्हाला १७० एम एम ग्राउंड क्लिअरन्स मिळतो जो भारतातील रस्त्यांसाठी पुरेसा आहे.
तुम्ही जर एका रिलायबल आणि स्पोर्टी लुक असणाऱ्या दुचाकीच्या शोधात असाल तर Yamaha MT 15 v2 ही तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. दमदार लुक आणि चांगला रोड प्रेझेन्स यामाहा ऑफर करते. शिवाय १५५ सीसीचे दमदार इंजिन जे तुम्हाला ४८-५० के एम पी एल चा मायलेज देते.
असेच नवनवीन ऑटो अपडेट मिळवण्यासाठी कोकण कल्चर ला नक्की फॉलो करा, तसेच सदर लेख कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा.
यामाहा ऑफिशियल वेबसाईट क्लिक करा.
हे देखील वाचा.
महिंद्राची ही गाडी झाली लॉन्च, मिळणार तगडे फीचर्स