Shevga benefits: भारतीय खाद्य संस्कृती खूप संपन्न असून यात कमालीची विविधता आढळून येते. प्रत्येक प्रांतानुसार ही खाद्य संस्कृती बदलत जाते. आज आपण अशाच एका पौष्टिक, आरोग्यदायी औषधी गुणधर्म असणाऱ्या भाजीबद्दल जाणून घेणार आहोत. शेवगा… हल्ली मार्केटमध्ये तुम्ही या भाजीचा बोलबाला पाहिला असेल, अगदी शेवग्याची पावडर ते पालेभाजी किंवा शेवग्याच्या शेंगा. या हल्ली पावसाळा सोडला तर इतर महिने आपणास मार्केटमध्ये दिसून येतात. भारत हा शेवग्याचा सगळ्यात मोठा उत्पादक देश आहे. याचे उत्पादन हे श्रीलंका, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स सारख्या आशियाई देशांमध्ये देखील घेतले जाते.
Shevga benefits शेवग्याचे आरोग्यासाठी खूप सारे फायदे आहेत. शेवगा ही मोरिंगा Moringa Oleifera प्रजातीतील वनस्पती आहे. जी महाराष्ट्रातील बहुतेक भागांत आढळून येते, शेवग्याचे महत्त्व पाहता आता लोक या शेवग्याची मोठ्या प्रमाणात लागवड करू लागले आहेत. शेवग्याच्या शेंगांची भाजी तसेच याच्या पानांची देखील भाजी केली जाते.
विशेष म्हणजे या झाडाची फांदी (लावल्यास) लागवड केल्यास ती फांदी देखील झाडाचे स्वरूप घेते.
शेवग्याच्या झाडाची वाढ ही पटकन होते, तसेच याची उंची १०-१५ मीटर पर्यंत वाढते. शेवग्याच्या झाडास कमी पाणी असले तरीही चालते कमी पाण्यात देखील त्याची चांगली वाढ होते. साधारणतः वर्षातून दोनदा या झाडाला फुले येतात. भारतात वेगवेगळ्या भागात या भाजीला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते मराठी मध्ये शेवगा, तमिळमध्ये मरूंगाई, मल्याळम मध्ये मुरीगंगा इ. आयुर्वेदामध्ये देखील या भाजीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, शेवग्याचे झाड हे भरपूर पोषक तत्त्वांनी समृद्ध आहे. याच्या बियांपासून तेल देखील काढले जाते.
Shevga benefits पोषक तत्व
शेवग्याचे पौष्टिक मूल्य प्रति 100 ग्रॅम
ऊर्जा | ६४ कॅलरीज |
कर्बोदके | ८.२८ ग्रॅम |
फायबर | २.० ग्रॅम |
प्रथिने | ९.४० ग्रॅम |
फॅट | १.४० ग्रॅम |
शेवग्यामध्ये पालक पेक्षा जास्त लोह, दुधा पेक्षा जास्त कॅल्शियम आणि प्रथिन्यांचे भांडार आढळते, त्यामध्ये अँटिऑक्सिडंट, अँटी एजींग आणि एंटी फंगल गुणधर्म आढळतात.
Shevga benefits शेवग्यामध्ये आढळणारी जीवनसत्व
शेवग्याच्या भाजीमध्ये विटामिन ए, थायमीन बी १, रीबोफ्लेविन बी २, नियासीन बी ३, विटामिन बी ६, फो बी ९, विटामिन सी इत्यादी जीवनसत्व आढळून येतात. जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात.
Shevga benefits शेवग्यामध्ये आढळणारी खनिजे
शेवग्याच्या भाजीमध्ये मुबलक प्रमाणात खनिजे देखील आढळतात ती पुढील प्रमाणे कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, मॅंगनीज, पोटॅशियम, सोडियम, झिंक, फॉस्फरस.
Shevga benefits फायदे
शेवग्याच्या सात्विक भाजीच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, मुतखडा, कोलेस्ट्रॉल, रक्तदाब, पचनक्रिया, सांधेदुखी इ. समस्या वर फायदा होतो, शिवाय त्याच्या पूर्ण तयार झालेल्या बियांपासून खाद्यतेल काढले जातात, तेल काढल्यानंतर त्याचा उर्वरित टाकाऊ भाग खत म्हणून किंवा पाणी शुद्ध करण्यासाठी वापरला जातो. तसेच या झाडाची पाने, फुले, बिया या आयुर्वेदामध्ये औषध म्हणून वापरल्या जातात.
त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत
शेवग्यामध्ये आढळणाऱ्या औषधी गुणधर्मामळे शेवग्याच्या सेवनाने त्वचेवर चमक येऊन त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते शेवग्याचा अर्क हा हायड्रेटींग असल्याने प्रदूषणाच्या हानिकारक दुष्परिणामांपासून त्वचेचे संरक्षण करतो. तसेच तेल हे चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच डाग कमी करण्यासाठी नैसर्गिक उपचार म्हणून काम करतात. शेवग्याच्या पानांची भाजी, शेंगांची पावडर सेवन केल्याने रक्त शुद्धी होते त्यामुळे त्वचा तजेलदार होऊन निरोगी बनते.
डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत
शेवग्याची भाजी ही बहुगुणकारी आहे. यामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट चे प्रमाण मोतीबिंदू सारख्या आजारांवर अतिशय गुणकारी आहे, डोळ्यांसाठी खूप अनुकूल आहेत, जे डोळ्यांच्या विकारापासून संरक्षण करतात.
संसर्ग
शेवग्याच्या भाजीमध्ये आढळणारे एंटी फंगल, अँटिबॅक्टरियल गुणधर्म यामुळे राईझोपस मुळे होणारे संसर्ग, यांच्याशी लढण्यासाठी कार्यक्षम आहे. घसा, छाती, त्वचेचे संसर्ग रोखण्यासाठी शेवग्याच्या भाजीमध्ये असणारे अँटिऑक्सिडंट गुणकारी ठरतात.
रोगप्रतिकारक शक्ती
शेवग्याच्या भाजीचा आहारातील समावेश हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो, शेवग्यामध्ये आढळणारे पौष्टिक गुणधर्म तसेच प्रथिने इत्यादी सर्वसाधारण सर्दी, खोकला, ताप यांच्या संक्रमणापासून बचाव करतात. खोकल्यावर आराम मिळवण्यासाठी शेवग्याच्या शेंगांचे अतिशय गुणकारी आहे.
शुक्राणू संख्या
अमेरिकन जर्नल ऑफ न्यूरो सायन्स मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात असे दिसून आले की शेवग्याच्या भाजीमध्ये कामोत्तेजक गुणधर्म असतात, शेवग्याच्या भाजीचे सेवन इरेक्टाइल डिस फंक्शन वर फायदेशीर ठरते. तसेच यामुळे टेस्टोस्टेरॉन ची पातळी सुधारून शुक्राणू संख्या वाढवण्यास मदत होते.
- मुतखडा
- आतड्यांचे आजार
- कर्करोगाचा धोका कमी करण्यास उपयुक्त
- रक्तदाब
- मधुमेह
- गर्भधारणा, स्तनपान
- वृद्धत्वाची लक्षणे
- हिमोग्लोबिन
- साखरेची पातळी नियंत्रित
- जीवनसत्व आणि खनिजांची कमतरता दूर करण्यास मदत
आहारात शेवग्याच्या भाजीचा समावेश केल्याने वरील आजार हे बरे होण्यास मदत होते, तसेच रोगप्रतिकारक क्षमता वाढते. पुढील लेखात आपण शेवग्याच्या पानाच्या भाजीची रेसिपी, शेंगांच्या भाजीची रेसिपी, शेवग्याच्या शेंगांचे सूप शेवग्याचा पराठा याबाबत सविस्तर जाणून घेऊ.
असेच नवनवीन लेख वाचण्यासाठी आमचे पेज कोकण कल्चर ला नक्की फॉलो करा तसेच लेख कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा.
हे देखील वाचा
Pingback: Shevga Recipes शेवग्याच्या झटपट तयार होणाऱ्या पौष्टिक रेसिपी