Jackfruit Fries Recipe | तळलेले फणसाचे गरे

Jackfruit Fries Recipe | तळलेले फणसाचे गरे : मित्रांनो कोकणातील खाद्य संस्कृती किती संपन्न आहे, हे तर आपणास माहित आहेच. कोकणात वेगवेगळ्या हंगामात मध्ये वेगवेगळी फळे येत असतात. उन्हाळ्यात होळीनंतर ते अगदी पावसाला सुरुवात होईपर्यंत कोकणामध्ये आंबा, फणस मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. येथील कोकणी बांधव आंबा, फणस, करवंद, काजू, कोकम, आवळा इत्यादी फळांपासून अनेक वेगवेगळे चविष्ट दर्जेदार पदार्थ बनवत असतात. यातील काही फळांवरती प्रक्रिया करून ती किमान (एक ते दीड वर्ष) पुढच्या मोसमा पर्यंत टिकतील अशा काही रेसिपी बनवून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरतात. आज आपण अशाच एका पदार्थाची पाककृती पाहणार आहोत.

मित्रांनो तुम्हाला फ्रेंच फ्राईज हे तर माहीत असतीलच. बर्गर किंग, मॅक डी यांसारख्या शॉप मध्ये बर्गर कॉम्बो घेतल्यानंतर आपणास बर्गर सोबत एक कोक आणि फ्रेंच फ्राईज मिळतात. या फ्रेंच फ्राईजला तोडीस तोड देणारा कोकणातील पदार्थ फणसाचे तळलेले गरे याची पाककृती या लेखात पाहणार आहोत. तळलेले फणसाचे गरे हे याला ग्लोबल प्लॅटफॉर्म मिळाला नसल्याकारणाने अजून ते इतके फेमस नाहीत. फणस हे हंगामी फळ असून पण कोकणी बांधव तळलेल्या फणसाच्या गऱ्यांचा वर्षभर यथेच्छ आस्वाद घेतो. कोकणात फूड प्रोसेसिंग उद्योग, आणि साठवणूक यंत्रणा पुरेशी उपलब्ध झाल्यास कोकणातील पदार्थ देखील जगाच्या पाठीवर प्रसिद्ध होऊ शकतात.

फणसाचे सांदण बनवा सोप्या पद्धतीने

Jackfruit Fries Recipe | तळलेले फणसाचे गरे

साहित्य

वेळदीड ते दोन तास | 🙎 चार ते पाच जण

  • कच्च्या फणसाचे गरे
  • खोबरेल तेल
  • १ कप पाणी आणि मिठाचे द्रावण

कृती

  • कच्च्या फणसाचे गरे त्यातील बिया काढून गरे वेगळे करून घ्या.
  • आता हे गरे लांब पातळ चिरून घ्या.
  • सर्व गरे चिरून झाल्यानंतर ते एका कापडावरती दहा ते पंधरा मिनिटे सुकण्यासाठी पसरवून ठेवा. (यामुळे गरे तळताना जास्त वेळ लागणार नाही.)
  • गॅसवर मध्यम आचेवर कढईमध्ये खोबरेल तेल गरम होण्यास ठेवा.
  • तेल तापल्यानंतर त्यामध्ये गऱ्याची एक पाकळी टाकून पहा तेल योग्य तापले असेल तर त्याचा तुम्हाला अंदाज येईल.
  • आता कढईमध्ये गरे तळण्यास टाका, गरे तळताना त्यामध्ये बनवलेले मिठाचे पाणी दोन-दोन चमचे टाका.
  • गरे छान लालसर होईपर्यंत तळून घ्या.
  • तळलेले फणसाचे गरे तयार.
  • हे गरे तुम्ही पेपर किंवा टिशू पेपर वरती ठेवू शकता ज्यामुळे त्याच्यावरचे एक्स्ट्रा चे तेल निघून जाईल. आणि थंड झाल्यावर हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्या.

टीप

फणसाचे गरे जास्त उपलब्ध असल्यास तुम्ही वर्षभर पुरतील इतके बनवून, तुम्ही हे गरे हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता जे वर्षभर आरामात टिकतात.

तर मित्रांनो अशाच कोकणातील नवनवीन पाककृती चे अपडेट मिळवण्यासाठी कोकण कल्चर ला नक्की फॉलो करा. तसेच ही पाककृती तुम्ही देखील ट्राय करा. आणि ही पाककृती कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा.

हे देखील वाचा.

शेवग्याच्या झटपट तयार होणाऱ्या पौष्टिक रेसिपी

कोकणातील इतर पाककृती

Dashgrivha

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Vinesh Phogat ने जाहीर केली निवृत्ती Golden boy ने रौप्य पदक जिंकत रचला इतिहास Neeraj Chopra Won Silver Medal मराठमोळ्या Avinash Sable ने रचला इतिहास पण मेडल हुकले. Mumbai’s most famous street food Famous places for Monsoon Trip in India