50+ Birthday Wishes for Mother | आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday wishes for mother : आई…आत्मा+ईश्वर, आई शब्दात किती जादू आहे बघा ना, जिच्यामुळे आपण नवे जग पाहतो, जी आपल्या सुख दुःखात नेहमीच आपल्या पाठीशी असते.

कधी मायाळू तर कधी रौद्ररूप दाखवणारी, संस्कार देणारी, कुटुंबासाठी दिवस रात्र काबाडकष्ट करणारी…आई प्रत्येकाला प्रिय असते.

कुटुंबाची धुरा सांभाळणारी, कठीण काळात सर्वांना धीर देणारी अशी मायाळू आई तिचे स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात मूल्यवान असते‌. “स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी” आईची जागा इतर कोणीही घेऊ शकत नाही.

आपल्या आयुष्यात असणारे आईचे महत्व हे शब्दात मांडणे कठीणच…

अशा प्रेमळ आईचा वाढदिवस म्हणजे सुखाचा अनमोल क्षण ज्या माऊलीमुळे आपण या जगात आलो. तिचा जन्मदिवस खास करण्यासाठी, लाडक्या आईच्या वाढदिवसाची अगदी जय्यत तयारी केली असेल, पण या भावना शब्दातून मांडण्यासाठी…

आईचा वाढदिवस खास बनवण्यासाठी तिच्या जन्मदिनी तिला शुभेच्छा देण्यासाठी काही निवडक वाढदिवसाचे संदेश आम्ही पोस्ट केले आहेत, जे आईचा वाढदिवस / जन्मदिवस खास बनवू शकतात.

कोकण कल्चर

Birthday Wishes for Mother
Birthday Wishes for Mother

एक विलोभनीय पर्यटन स्थळ जेथे निसर्ग आणि अध्यात्माचे एकत्र दर्शन होते.

Birthday Wishes for Mother

🟠

स्वतःच्या इच्छा, आकांक्षा विसरून, घरातील इतरांसाठी सर्व काही करणाऱ्या माझ्या प्रेमळ आई ला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा…

🟠

दिला जन्म ज्या माऊलीने मजला, गायली जिने मजसाठी अंगाई, तिच्या जन्मदिनी नमन करतो तुजला आई, वाढदिवसाच्या अगणित आरोग्यदायी शुभेच्छा…आई

50+ Best Birthday Wishes for Sister in Marathi | बहिणी साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

🟠

व्हावीस तू शतायुषी, व्हावीस तू दीर्घायुषी, ही एकच आमची इच्छा, आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

🟠

जगासाठी तू एक व्यक्ती आहेस, आम्हासाठी तू आमचं संपूर्ण जग आहेस, आई वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा…

🟠

काळ कितीही लोटला तरीही, ओसरत नाही माया तुझी, येत नाही आठवण तुझी असा दिवस जात नाही, जन्मदिनी आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

🟠

तुझ्याबद्दल लिहिण्यासाठी शब्द अपुरे पडतील आई,

जग आहेस तू माझं,

माझ्या जगातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीला

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा…

Happy Birthday…Aai

🟠

Birthday Wishes for Mother
Birthday Wishes for Mother

🟠

माझ्या सगळ्या चुका माफ करणारी,

रागात देखील मनापासून प्रेम करणारी,

आशीर्वाद देण्यास सदा तत्पर असणारी,

आयुष्यातील एकमेव व्यक्ती म्हणजे आई,

आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

🟠

लाड करते प्रसंगी मारते,

कधी प्रेमाने जवळ घेते,

अशा माझ्या प्रेमळ आईस

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा…

🟠

आयुष्यात जिने माझ्यासाठी

यशाच्या पायऱ्या बांधल्या,

अशा माझ्या कष्टाळू आईस

वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा

🟠

काहीच न बोलता सर्वांसाठी झटते,

कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी जगाशी लढते,

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई

🟠

आयुष्याच्या नव्या वळणावर,

आई तुझ्या स्वप्नांना बहर येऊ दे,

तुझ्या इच्छा, आकांक्षा उंच गगन भरारी घेऊ दे,

मनात आमच्या एकच इच्छा,

उदंड आयुष्य लाभो…

जन्मदिनी हीच सदिच्छा…

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई

🟠

वय झाले कितीही,

तरी प्रेम तुझे कमी होणार नाही,

सुरकुतलेल्या हातांची माया तुझ्या,

कधीच कोणाला येणार नाही…

आई तुला वाढदिवसाच्या आरोग्यदायी शुभेच्छा

🟠

खूप व्यक्ती आयुष्यात येतात – जातात,

पण हजारो चुका माफ करणारी

आई पुन्हा कधीच मिळत नाही…

जन्मदिनाच्या मंगलमय शुभेच्छा आई

🟠

जगात देव आहे की नाही ते माहित नाही

पण माझ्या या छोट्याशा जगात आई

तूच माझा देव आहेस…

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा आई

Birthday Wishes In Marathi 2024

तुझा मार खाल्ल्याशिवाय आजही मला चैन पडत नाही,

साठी ओलांडली तू तरीही तुझी माया कमी होत नाही…

आई तुला वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा…

🟠

आई माझ्या जीवनाचा आकार,

आई माझ्या जगण्याचा आधार,

आईच्या कुशीत होती स्वप्न साकार,

आई विना जीवनात नसे आधार…

आई तुला वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा

🟠

जीने मला बोट धरून चालायला शिकवले,

संस्कार देऊन चांगले घडवले,

प्रत्येक क्षणी दिला आधार मला

अशा माझ्या प्रेमळ आईस

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

🟠

परिस्थितीनुसार सगळी माणसे बदलतात,

एक व्यक्ती कधीच बदलत नाही,

जशी आहे तशीच राहते,

ती म्हणजे आपली आई असते…

आई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

🟠

Birthday Wishes for Mother
Birthday Wishes for Mother

Birthday Wishes for Mother

तुझ्या जन्मदिनी प्रार्थना माझी ईश्वराला,

आयुष्यात खूप सुख, समृद्धी, समाधान, आनंद, लाभो तुला,

आई तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा…नेहमी हसतच रहा.

🟠

ईश्वराकडे सात जन्मांचे काही मागणे असेल,

तर हीच आई मला जन्मोजन्मी मिळू दे,

हिच्याच उदरी मला जन्म लाभू दे,

आई तुला वाढदिवसाच्या अगणित भगव्या शुभेच्छा…

🟠

जगातील सर्वात चांगली आई आहेस तू

सोबतच माझी चांगली मैत्रीण देखील आहेस तू

हॅपी बर्थडे आई…

🟠

तुझ्याशी बोलल्याशिवाय माझा एकही दिवस जात नाही,

तुझ्या प्रेमाची माया काही केल्या कमी होतं नाही,

माझ्या प्रेमळ आईला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

🟠

शोधूनही सापडत नाही पुण्य,

तुझ्या सेवेने व्हावे धन्य,

आई वाढदिवसाच्या खूप खूप आरोग्यदायी शुभेच्छा

🟠

पैसा, संसार, माया आणि बरच काही,

आपल्यासाठी नेहमी खास फक्त आपली आई

Happy Birthday Aai…

🟠

जिचे बोट धरून चालायला शिकलो,

तिच्याकडे बघून संकटांशी लढायला शिकलो,

प्रेमळ आईस

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा…

🟠

या लाखोंच्या गर्दीमध्ये आपल्यावर जीव ओवाळून टाकणारे मोजकेच लोक असतात,

त्यापैकीच एक म्हणजे आपल्या आई वडील,

अशा प्रेमळ आई-वडिलांना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

🟠

निराश असताना आत्मविश्वास दिल्याबद्दल

आई तुझे खूप आभार

संकटात माझ्या सोबत उभी राहिलीस

अनेक वेळा दिलीस साथ…

माझ्या प्रेमळ आईस

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

🟠

माझे सगळे हट्ट पुरवणारी,

नेहमी आनंदित ठेवणारी,

माझी लाडकी आई,

तुला वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा…

🟠

मी यशस्वी आहे, कारण माझ्यामागे माझी संस्कारक्षम आहे… आई तुला वाढदिवसाच्या अगणित आरोग्यदायी शुभेच्छा…

🟠

वर्षाचे 365 दिवस, महिन्याचे 30 दिवस, आठवड्याचे 7 दिवस आणि माझा प्रिय दिवस म्हणजे आई तुझा वाढदिवस, वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा…आई

हे देखील वाचा

दशग्रिव्हा

Birthday Wishes In Marathi 2024

Testy Recipes

3 thoughts on “50+ Birthday Wishes for Mother | आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा”

  1. Pingback: AICTE Internship info in Marathi इंटर्नशिप: महत्वाची माहिती आणि लाभ

  2. Pingback: लग्न समारंभ पूजेसाठी पारंपरिक मराठी उखाणे Marathi Ukhane

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Vinesh Phogat ने जाहीर केली निवृत्ती Golden boy ने रौप्य पदक जिंकत रचला इतिहास Neeraj Chopra Won Silver Medal मराठमोळ्या Avinash Sable ने रचला इतिहास पण मेडल हुकले. Mumbai’s most famous street food Famous places for Monsoon Trip in India