Angkor Wat | Angkor what temple | ancient Hindu temple| Angkor |
Angkor Wat अंगकोर वाट कंबोडिया स्थित असलेले प्राचीन हिंदू मंदिर आहे. ४०० एकर परिसरात पसरलेले हे मंदिर बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात हिंदू मंदिर म्हणून बांधले गेले होते. अंगकोर वाट हे जगातील सगळ्यात मोठे धार्मिक स्मारक आहे. येथील प्रदेशाच्या ख्मेर भाषेत “मंदिरांचे शहर” असे या परिसराला संबोधले आहे. सदर मंदिर हे राजा सूर्यवर्मन दुसरा यांनी बांधले, राजा सूर्यवर्मन दुसरा यांनी १११३ ते ११५० पर्यंत या प्रदेशावर राज्य केले. त्याच्या साम्राज्याचे राजकीय केंद्र तसेच राज्य मंदिर म्हणून हा प्रदेश प्रसिद्ध होता. या मंदिराची जेव्हा बांधणी केली गेली तेव्हा ते मंदिर भगवान विष्णूंना समर्पित होते, पण बाराव्या शतकाच्या अखेरीस हा मंदिर परिसर बौद्ध धर्मीयांच्या प्रभावाखाली गेल्याने हिंदू उपासना केंद्र बौद्ध धर्मात बदलले गेले नंतर ते बौद्ध धर्माचे प्रमुख मंदिर बनले, हे स्थळ बौद्ध धर्मीयांसाठी देखील तितकेच महत्त्वाचे आहे. सद्यस्थितीत कंबोडिया मधील सगळ्यात प्रसिद्ध असे हे स्थळ आहे. या मंदिराला युनेस्कोने १९९२ मध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. अंगकोर वाट हा स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे.
Angkor Wat हे जगातील इतर आश्चर्यांपैकी एक आहे.ख्मेर भाषेत अंगकोर म्हणजे राजधानी, ख्मेर राजांच्या काळात ९ ते १३ व्या शतकात ख्मेर घराण्याने दक्षिण पूर्व आशियातील सर्वात समृद्ध आणि अत्याधुनिक राज्य बनवले होते. त्यांनी अनेक विलोभनीय बांधकामे देखील हाती घेतली त्यापैकी उल्लेखनीय म्हणजे अंगकोर वाट. अंगकोर वाट मंदिराचे बांधकाम सुमारे तीस वर्षे चालल्याचे मानले जाते. संपूर्ण मूळ आर्किटेक्चर हे हिंदू धर्मातून प्राप्त झाले आहे. सदर मंदिर हे शिव, ब्रह्मा, विष्णू देवतांना समर्पित होते. अंगकोर वाटचे पाच बुरुज हे मेरू पर्वताच्या शिखराचे प्रतीक आहे तसेच मंदिराच्या सभोवताली असलेला खंदक हा महासागरांना सुचित करतो. या मंदिराच्या भिंती अतिशय उच्च शिल्पांनी झाकलेल्या आहेत, ज्यामध्ये हिंदू देवता, प्राचीन ख्मेर दृश्य, रामायण महाभारतातील प्रसंग अतिशय उत्तम रित्या कोरलेले आहेत. ११७७ मध्ये व्हिएतनामच्या लोकांनी अंगकोरला जिंकल्यानंतर राजा जयवर्मन सातवा ( ११८१ ते १२२०) याची अशी धारणा झाली की हिंदू देवतांनी त्याला पराजित केले. म्हणून त्याने तेथेच जवळ अंगकोर थॉम ही नवीन राजधानी उभारली व बौद्ध धर्माला समर्पित केली. तदनंतर अंगकोर वाट हे बौद्ध मंदिर बनले आणि त्यातील कोरीव कामाची जागा बौद्ध कलेने घेतली. पंधराव्या शतकाच्या आसपास अंगकोर सोडण्यात आले. थेरवडा बौद्धध भिक्षूंनी अंगकोर वाट राखून ठेवली जी पुढे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून राहिली. १८६३ नंतर फ्रेंच राज्यकर्त्यांना अंगकोरचा पुन्हा शोध लागला. पुढे विसाव्या शतकाच्या आसपास अनेक पुनर्बांधणी कामे राबविण्यात आली. १९७० च्या आसपास कंबोडिया मध्ये असलेल्या अशांततेमुळे सगळ्या कामांना स्थगिती देण्यात आली. या परिसरात अनेक मंदिरे आहेत.
Angkor Wat रचना, शिल्पे
अंगकोर वाट हे शहरापेक्षा तुलनेने उंचीवर आहे. सुमारे ४०० एकर परिसरात पसरलेले हे एक सर्वात मोठे मंदिर आहे. या मंदिरावर कमळाच्या आकाराचे पाच मनोरे आहेत. मंदिराच्या भिंती हजारो की शिल्पानी सजलेल्या आहेत, त्यामध्ये हिंदू आणि बौद्ध धर्मातील महत्त्वाच्या देवता, आकृत्या यांचा समावेश आहे.या मंदिरावर रामायण महाभारतातील प्रसंग, कौरव पांडवांचे कुरुक्षेत्रावरील युद्ध, ख्मेर लोकांची जीवनशैली, सम्राट शहरात प्रवेश करत असतानाचे शिल्प इत्यादी. नानाविध शिल्प येथे पाहायला मिळतात.
अंगकोर वाट ला कसे पोहोचाल ?
कंबोडियातील महत्त्वाचे शहर Siem Reap आहे. Siem Reap च्या उत्तरेस पाच मैलावर Angkor Wat स्थित आहे. Siem Reap ला विमानतळ आहे, येथे जाण्यासाठी सिंगापूर आणि बँकॉक येथून सिएम रिप साठी विमाने आहेत. Siem Reap वरून दहा ते बारा मिनिटात आपण अंगकोर वाटला पोहोचतो. सीएम रिप वरून बस, ई रिक्षा उपलब्ध आहेत. टुकटुक देखील भाड्याने मिळतात ते आपणास संपूर्ण अंगकोर वाटचे दर्शन घडवतात.
telegram https://t.me/kokanculture