Beautiful Devkund Waterfall Trek महाराष्ट्रातील सुंदर धबधबा

देवकुंड Devkund Waterfall

Devkund Waterfall Trek महाराष्ट्रातील सर्वात सुंदर धबधब्यांपैकी एक असा देवकुंड धबधबा. नावाप्रमाणेच गुढ आणि बाहेरच्या जगाला अनभिज्ञ असलेला हा अप्रतिम धबधबा पुणे – मुंबई पासून अगदी काही तासांच्या अंतरावर आहे. महाराष्ट्रात बारमाही धबधबे खूप कमी आहेत, त्यातील हा एक देवकुंड धबधबा याच्या सभोवताल सुंदर हिरवेगार घनदाट जंगल, असंख्य प्रजातीचे प्राणी पक्षी आणि येथील जैवविविधता पाहून मन बेधुंद होऊन जातं. तुम्ही येथील निसर्गाचा अद्भुत अविष्कार पाहून आनंदाने भारावून जाल. पावसाळ्यामध्ये येथे येण्याची मजा वेगळीच.

महाराष्ट्राला अद्भूत निसर्ग लाभला आहे. येथील अनेक नयनरम्य ठिकाणे अक्षरशः वेड लावतात.

Beautiful Devkund Waterfall Trek
devkund waterfall

Devkund Waterfall रायगड जिल्ह्यातील हा धबधबा तरुणाईला खुणावत असतो. हा ट्रेक मुंबई पासून सुमारे १३० किमी अंतरावर असून या प्रवासासाठी ४ तास तसेच पुण्यापासून १०० किमी अंतरावर आहे. पुण्याहून यायचे झाल्यास या प्रवासासाठी किमान ३ तास लागतात. रायगड जिल्यातील पाटणूस ग्रामपंचायतीच्या हद्दीत देवकुंड धबधबा आहे. भिरा गावातुन आपला प्रवास चालू होतो. येथे अत्यंत अल्प दरात पार्किंगची व्यवस्था ग्रामस्थांकडून करण्यात आलेली आहे. दुचाकी साठी ३० रु. आणि धबधब्याला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्ती कडून ५० रु. प्रवेश शुल्क घेतले जाते. येथे आपल्याला स्थानिक गाईड मिळतात. पर्यटकांच्या गर्दीमुळे येथील स्थानिक तरुण गाईडचे काम करतात, वाट हि जंगलातून असल्याने गाईड मुळे आपणास मदत होते, आपणास वेळोवेळी काय करावे काय करू नये याबाबत गाईड वारांवार सूचना देत असतात. या गावातून दोन तास ट्रेक केल्यानंतर धबधब्यावर पोहोचता येते. त्यासाठी साधारण ६ किमी चालावे लागते. येथे टाटा पॉवर कंपनी लिमिटेड मालकीचा भिरा धरणावर जलविद्युत प्रकल्प आहे. याला मुळशी म्हणूनही ओळखले जाते, देवकुंड धबधबा ट्रेकच्या प्रवासात वाहणारे अनेक प्रवाह पार करत जंगलातून आपण धबधब्याजवळ पोहोचतो. येथील मार्ग हा मध्यम कठीण स्वरूपाचा आहे. तसेच ट्रेक करत असताना ताम्हिणी घाटातील असंख्य धबधबे नजरेस पडतात. हे विहंगम दृश्य बघताना स्वर्गाची अनुभूती येते.
धबधब्याजवळ पोहोचल्यानंतर पाण्यात मौजमस्ती करत असताना आवश्यक ती काळजी घेऊन करावी, येथील गाईड आपणास किती फुट पाण्यात जायचे, कसे जायचे याची माहिती देतात. काही लोक या जागेला देवांचे स्नान करण्याचे ठिकाण मानतात. कुंडलिका नदी पासून उगम पावणाऱ्या तीन धबधब्यापैकी एक देवकुंड धबधबा याची उंची साधारणत: २५० फूट असून सह्याद्रीच्या पर्वत रांगांनी वेढलेला आहे. धकधकीच्या आयुष्यातून स्वत:साठी वेळ काढून आपण जेव्हा येथे येतो. तेव्हा येथील निसर्गिक सुंदरता बघून मन तृप्त होते. त्यामुळे निसर्गप्रेमींसाठी उत्तम पिकनिक पॉईंट म्हणून ओळखला जातो. मित्र- परिवार यांच्यासोबत सुखद वेळ घालवण्यासाठी लोकप्रिय ठिकाण आहे. येथील हवामान उष्ण दमट असून या भागामध्ये खूप पाऊस पडतो. येथे फार अशी हॉटेल्स उपलब्ध नाहीत त्यामुळे येताना स्वतःचे अन्न स्वतः सोबत आणावे लागते. काही हॉटेल्स या परिसरात आहेत तिथे अगोदर ऑर्डर्स दिल्यावर जेवणाची व्यवस्था केली जाते.

Beautiful Devkund Waterfall Trek
Devkund Waterfall

Devkund Waterfall सर्वसाधारण माहिती

Beautiful Devkund Waterfall Trek
  • उंची: २५० फूट
  • ट्रेकची श्रेणी : मध्यम कठीण
  • मार्ग: अनेक नदी क्रॉसिंगसह जंगल मार्ग
  • देवकुंड धबधबा ट्रेकची लांबी: ६ किमी अंदाजे एकेरी
  • धबधबा चढण्यासाठी लागणारा वेळ: दोन तास
  • पाटणूस, माणगाव, रायगड, महाराष्ट्र
  • धबधबा ट्रेकसाठी सर्वोत्तम वेळ: ऑगस्ट ते डिसेंबर
  • पुण्यापासून अंतर: १०० किमीसाठी ३ तास
  • मुंबईपासून अंतर: १३० किमीसाठी ४ तास
  • बेस व्हिलेज : भिरा, रायगड

धबधब्याला कधी भेट द्याल.

पावसाळ्यात येथे येण्यासाठी जुलै ते सप्टेंबर च्या दरम्यान योग्य वेळ आहे. तसेच कॅम्पिंग आणि ट्रेकसाठी सप्टेंबर ते फेब्रुवारी हा सर्वोत्तम काळ आहे, या दिवसत वातावरण थंड असल्याने ट्रेक साठी उपयुक्त असा हा काळ आहे.

सूचना

  • धबधबा पाहण्यासाठी पावसाळ्यात लहान मुलांना घेऊन जाऊ नये.
  • किमान चार तास चालण्याची तय्यारी असावी, सोबत आणलेल्या प्लास्टिक बॉटल व इतर प्लास्टिक कचरा या परिसरात टाकू नये.
  • भिरा गाव ते देवकुंड धबधबा अंतर दोन तास आहे, दोन तास चालून आपण पोहोचल्यावर भूक लागते, त्यासाठी सोबत खाण्याचे पदार्थ ठेवा.
  • ट्रेक हा मध्यम कठीण प्रकारच असला तरी पावसामुळे वाट निसरडी होते त्यामुळे शक्यतो चांगली ग्रीप असलेले शूज घालावे.
  • आवश्यक पाणीसाठा सोबत ठेवा.
  • ट्रेक करताना योग्य त्या गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे, पूर्व नियोजन गरजेचे आहे.
  • सिगारेट / ज्वलनशील वस्तू या परिसरात कुठेही फेकू नका, निसर्गाची हानी टाळा.
  • ट्रेक करताना कोणत्याही प्रकारचा कचरा नदीपत्रात फेकू नका.

आजूबाजूच्या परिसरातील पाहण्यासारखी ठिकाणे

भिरा धरण

भिरा धरण हे एक येथील प्रसिद्ध ठिकाण आहे याला टाटा पॉवर धरण म्हणून देखील ओळखले जाते, हे ठिकाण देवकुंड पासून एक तासाच्या अंतरावर आहे. देवकुंड ट्रेक करून बरेच जन येथे नाईट कॅम्पिंग करण्यासाठी थांबतात. येथील निसर्ग पाहण्यासारखा आहे.

ताम्हिणी घाट

ताम्हिणी घाट हा मुळशी आणि ताम्हिणी दरम्यानचा घाट मार्ग आहे. हा पश्चिम घाट पर्वतरांगांच्या शिखरावर असलेल्या नयनरम्य धबधबे, तलाव जंगले यासाठी प्रसिद्ध आहे. ताम्हिणी घाट सह्याद्रीमधून जातो जो पुण्याहून कोकणात जाणारा मार्ग बनवतो, हा मार्ग १५ किमीचा आहे, पावसाळ्यात भेट देण्याचे सुंदर ठिकाण आहे.

कोरीगड किल्ला

या किल्ल्यास कोरीगड/ कोराई गड म्हणतात,हा पुणे जिल्ह्यातील लोणावळा पासून सुमारे २० किमीवर आहे हा एक डोंगरी किल्ला असून याची बांधणी ही १५०० पूर्वीची असावी. समुद्रसपाटी पासून याची उंची ही ९२३ मीटर आहे. कोरीगडावर जाण्यासाठी ४५ मिनिटे लागतात. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज यांनी १६५७ मध्ये बांधला.

घनगड किल्ला

घनगड किल्ला हा देवकुंड पासून साधारणतः १०किमी अंतरावर आहे. लोणावळा पासून ३० आणि पुण्यापासून १०० किमीवर आहे. येथे देखील बरेच पर्यटक ट्रेकिंग साठी येत असतात. येथील वाटा जंगलाने वेढलेल्या आहेत, चढाईची श्रेणी ही सोपी सुरक्षित आहे. साधारणतः हा किल्ला ३०० वर्ष जुना आहे, किल्ल्यास दोन प्रवेशद्वार आहेत. या परिसरातील डोंगरामाथ्यावरील जागा ट्रेकिंगसाठी उत्तम आहेत.

मुळशी धरण

मुळशी हे मुळा नदीवरील प्रमुख धरण आहे. मुळशीचे पाणी वीज निर्मितीसाठी वापरले जाते. मुळशीचे सौंदर्य पहायचे असल्यास ६ किमी अंतरावर असलेल्या वळणेवाडी येहून पाहता येते.

कुंडलिका नदी

कुंडलिका नदी ही रायगड जिल्ह्यातील रोहा या गावातून वाहणारी पश्चीम म वाहिनी नदी आहे. या नदीच उगम पश्चीम घाटातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये होतो. कुंडलिका नदीच्या संगमातून अनेक धबधब्यांचा उगम होतो, त्यापैकी एक म्हणजे (Devkund Waterfall) देवकुंड धबधबा.

Best Beaches in Kokan

Best Rice Flour Ghavan Recipes in Marathi

कुक्कुट पालन कर्ज योजना २०२३

Maharashtra Tourism

Join our Whats app Group Click Here

FAQ

देवकुंड धबधबा कुठे आहे ?

रायगड जिल्ह्यात भिरा गावाजवळ देवकुंड धबधबा आहे. मुंबई पासून सुमारे १३० किमी अंतरावर असून या प्रवासासाठी ४ तास तसेच पुण्यापासून १०० किमी अंतरावर आहे. पुण्याहून यायचे झाल्यास या प्रवासासाठी किमान ३ तास लागतात.

देवकुंड ची उंची किती आहे ?

धबधबा २५० फूट उंच आहे.

देवकुंड ची खोली किती आहे ?

धबधब्याची खोली साधारणतः ८० फुट आहे.

2 thoughts on “Beautiful Devkund Waterfall Trek महाराष्ट्रातील सुंदर धबधबा”

  1. Pingback: 50+ Best Birthday Wishes for Sister in Marathi | बहिणी साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

  2. Pingback: प्रशांत महासागरात आढळली भीमकाय पर्वत श्रृंखला Pacific Ocean underwater mountain

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Vinesh Phogat ने जाहीर केली निवृत्ती Golden boy ने रौप्य पदक जिंकत रचला इतिहास Neeraj Chopra Won Silver Medal मराठमोळ्या Avinash Sable ने रचला इतिहास पण मेडल हुकले. Mumbai’s most famous street food Famous places for Monsoon Trip in India