Xiaomi SU 7 ev info in Marathi : मित्रांनो Xiaomi म्हटलं की आपणास डोळ्यासमोर येतात ते रफ टफ असे भरपूर फीचर्स असणारे स्मार्टफोन. तेही सर्वसामान्यांना परवडतील अशा किमतीमध्ये, यामुळे शाओमीने भारतीय बाजारपेठेत आपले स्थान बळकट केले व इतर कंपन्यांना तगडे आव्हान दिले आणि जगभरातील इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत आपले स्थान निर्माण केले.
आता शाओमी कंपनीने वाहन निर्मितीत उतरून ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये एन्ट्री केली आहे. त्यांचे पहिले प्रॉडक्ट शाओमी एस यु ७ या इलेक्ट्रिक कारची घोषणा करून त्यांनी आपले दोन मॉडेल चीनमध्ये लॉन्च केले आहेत. इंट्री लेव्हल आणि प्रो असे दोन व्हेरियंटची सध्या घोषणा केली आहे. या लेखामध्ये आपण Xiaomi SU 7 या इलेक्ट्रिक कार बद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.
शाओमी या कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक सेडान एस यु ७ लॉन्च केली आहे. या कारची घोषणा तशी 2023 मध्येच करण्यात आली होती. २८ मार्च २०२४ रोजी झालेले का कार्यक्रमात कंपनीने कारची स्पर्धात्मक किंमत जाहीर केली. कंपनीने सध्या दोन व्हेरिएंट मार्केटमध्ये लॉन्च केले आहेत. एसयू ७ आणि एस यु ७ मॅक्स. विशेष म्हणजे ही कार एका सिंगल चार्जवर सरासरी ८१० किलोमीटरची रेंज देण्यास सक्षम आहे.
डिझाईन Xiaomi SU 7 ev info in Marathi
शाओमी एस यु ७ या कारचे डिझाईन हे टेस्ला आणि पॉर्श या कंपनीच्या कार प्रमाणे दिसून येते. शाओमी ची ही इलेक्ट्रिक सेडान असून या कारची लांबी ४९९७ मिमी असून रुंदी १९६३ मिमी इतकी आहे, तसेच या कारची उंची १४५५ इतकी असून व्हीलबेस ३००० मिमी चा आहे. शिवाय कंपनी १९ इंचाचे अलॉय व्हील ऑफर करते. या कारचे डिझाईन एरोडायनॅमिक असून स्पोर्टी लूक आहे जो चांगला रोड प्रेझेंस प्रदान करतो.
बॅटरी पॅक
शाओमी ने लॉन्च केलेल्या या पहिल्या इलेक्ट्रिक कारचे दोन व्हेरिएंट लॉन्च केले आहेत. यामध्ये बेस् मॉडेलमध्ये ७३.६ किलोवॅट बॅटरी पॅक दिला आहे जो ६६८ किलोमीटर रेंज देतो, तसेच टॉप मॉडेल मध्ये १०१ किलोवॅट ची दमदार बॅटरी दिली आहे जी एका सिंगल चार्ज मध्ये ८०० किलोमीटर रेंज ऑफर करते.
फीचर्स
शाओमी एस यु ७ ही हायपर ओएस ऑपरेटिंग सिस्टीम वर बेस असून ती शाओमी कंपनीच्या स्मार्टफोन सोबत सिस्टीम शेअर करू शकेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. कंपनीने या कारमध्ये स्मार्टफोन प्रमाणे स्मार्ट फीचर दिले आहेत. शाओमी कंपनीचे सीईओ लेई जून आणि सांगितले की या कार मध्ये स्मार्ट टेक्नॉलॉजी ला अधिक महत्त्व देण्यात आले आहे त्यामुळे ही कार इतरांपेक्षा वेगळी बनते. आणि ही कार ०-१०० वेग धारण करण्यासाठी ही कार केवळ २.७८ सेकंदाचा वेळ घेते. शाओमी ने या कारमध्ये इन्वर्टेड सेल टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे केबिनमध्ये देखील अनेक स्मार्ट फीचर्स देण्यात आले आहे त्यामध्ये १६.१ इंचाचा ३ के रिझोल्युशन वाला सेंट्रल पॅनल देण्यात आला आहे. तसेच ७.१ इंचाचा फिरणारा डॅशबोर्ड दिला आहे. कार मध्ये स्नॅपड्रॅगन ८२९५ इन कार चिप सह AI तंत्रज्ञान देखील देण्यात आले आहे.
इलेक्ट्रिक मोटार
शाओमीने त्यांच्या कॉन्फरन्स मध्ये त्यांनी विकसित केलेल्या इलेक्ट्रिक मोटर हायपर इंजिन व्ही ६ / व्ही ६ एस / इंजिन व्ही ८ प्रदर्शित केल्या.
७३.६ किलोवॅट इलेक्ट्रिक मोटर ही २९५ पी.एस. पॉवर आणि ४०० एन एम टॉर्क जनरेट करते.
शाओमी एस यू ७ ची १०१ किलोवॅट इलेक्ट्रिक मोटर ही ६३७ पी.एस. पॉवर आणि ८३८ एन एम टॉर्क जनरेट करते. टॉप स्पीड हा ताशी २६५ किलोमीटर इतका आहे.
Xiaomi SU 7 या कारच्या बेस व्हेरियंट ची किंमत २१५,९०० युआन (भारतीय रुपयांमध्ये २४.९२ लाख) इतकी आहे.
व्हेरीएंट आणि किंमत
Xiaomi SU 7 Standard Edition | 24.92 lakh |
Xiaomi SU 7 pro | 28.36 lakh |
Xiaomi SU 7 Max | 35.23 lakh |
बुकिंग
शाओमीच्या या पहिल्या कारला लोकांचा देखील भरभरून प्रतिसाद मिळत आहे. दोन व्हेरियंट साठी चीन मध्ये २४ तासात तब्बल ९०,००० कारच्या ऑर्डर मिळाल्या.
स्पर्धा
Xiaomi SU 7 या कारची एक्स शोरूम किंमत २५ लाखाच्या आसपास असून, ही कार भारतात लॉन्च झाल्यास या कारची स्पर्धा ही थेट टेस्ला मॉडेल ३ आणि अलीकडे भारतात लॉन्च झालेल्या BYD कंपनी सोबत असेल. टाटा मोटर्स ने भारतात आपल्या वाहनांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने चांगले बदल करून दमदार वाहने लॉन्च केली आहेत. आणि ई व्ही सेक्टरमध्ये देखील आपले स्थान बळकट केले आहे, त्यामुळे या कारच्या लॉन्चने टाटा मोटर्सला फार मोठा असा फरक पडणार नाही.
मित्रांनो असेच नवनवीन ऑटो अपडेट मिळवण्यासाठी कोकण कल्चर ला नक्की फॉलो करा तसेच सदर Xiaomi SU 7 ev info in Marathi लेख कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा.
हे देखील वाचा
Pingback: 50+ Best Birthday Wishes for Sister in Marathi | बहिणी साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
Pingback: Mahindra XUV 3XO झाली लॉन्च, मिळणार तगडे फीचर्स