10 Biggest Insurance Company in the World

10 Biggest Insurance Company in The World : आजच्या धावपळीच्या युगात विमा हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. आणि यासाठी अनेक कंपन्या काम देखील करत आहेत. यामध्ये अपघात विमा, आरोग्य विमा, मालमत्ता, व्यावसायिक दायित्व, गैरव्यवहार यांसह इतर क्षेत्रांशी संबंधित असणाऱ्या नुकसानी साठी या कंपन्या कव्हरेज पॉलिसी ऑफर करून देतात. या लेखामध्ये आपण विमा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जगभरातील 10 मोठ्या कंपन्यांबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

विमा कंपनी व्यक्ती, व्यवसाय आणि व्यवसाय संस्था या ग्राहकांना जोखमीचे व्यवस्थापन प्रदान करते. या कंपन्या विमा धारकाला व्यक्ती, व्यवसाय किंवा व्यवसाय संस्थेचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाईची ठरलेल्या मूल्यानुसार हमी देते.

10 Biggest Insurance Company in the World
10 Biggest Insurance Company in the World

10 Biggest Insurance Company in the World

१. भारतीय आयुर्विमा महामंडळ (Life Insurance Corporation of India)

भारतीय आयुर्विमा महामंडळ हे भारतातील अग्रगण्य विमा कंपनी असून या कंपनीच्या अनेक उप कंपन्या आहेत. एलआयसी प्रामुख्याने भारतामध्ये अपघात विमा, वैयक्तिक विमा, जीवन विमा, वाहन विमा तसेच इतर आर्थिक सेवा प्रदान करणारी भारतातील प्रमुख विमा कंपनी आहे. तिचा उद्देश जीवन विमा अधिक व्यापकपणे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे तसेच विमाधारकांना वाजवी दरात पुरेसे आर्थिक संरक्षण प्रदान करणे हे आहे. एलआयसी चे मार्केट कॅपिटल हे ६९.५७ अब्ज डॉलर इतकी आहे.

२. अमेरिकन इंटरनॅशनल ग्रुप (AIG)

अमेरिकन इंटरनॅशनल ग्रुप (AIG) ही एक जागतिक विमा संस्था आहे जी ग्राहकांना मालमत्ता विमा अपघात विमा जीवन विमा सेवानिवृत्तीनंतरच्या योजना व इतर आर्थिक सेवा देते. अमेरिकन इंटरनॅशनल ग्रुप ही कंपनी जगभरातील सुमारे 70 पेक्षा जास्त देशातील ग्राहकांना विमा सुविधा प्रदान करते. अमेरिकन इंटरनॅशनल ग्रुप चे एकूण महसूल हे ५९ अब्ज डॉलर इतकी असून निव्वळ उत्पन्न हे १३.८ अब्ज डॉलर इतके आहे. तसेच या कंपनीचे मार्केट कॅपिटल हे ४६.७ अब्ज डॉलर इतके आहे.

३. प्रोग्रेसिव्ह कॉर्पोरेशन

प्रोग्रेसिव्ह कार्पोरेशन वाहने आणि घरांचे विमा उद्योगात आघाडीवर असून इतर आर्थिक सेवा देखील पुरवते, ती व्यावसायिक आणि वैयक्तिक विमा उत्पादने देखील प्रदान करते. या कंपनीची स्थापना १९३७ मध्ये झाली. या कंपनीचा महसूल हा ४७.७ आमच्या डॉलर असून निव्वळ उत्पन्न ८५२ दशलक्ष डॉलर इतके आहे. प्रोग्रेसिव कार्पोरेशन या कंपनीचे मार्केट कॅपिटल ७४.४ अब्ज इतके आहे.

४. चब लिमिटेड

चब लिमिटेड ही सार्वजनिक व्यापारी मालमत्ता तसेच अपघाती विमा कंपनी आहे. जी आपली सेवा ५४ देशांमध्ये देते. ही कंपनी यु. एस. मधील प्रमुख व्यावसायिक विमा कंपनी आहे. चब कंपनी अपघात विमा, आरोग्य विमा, पुनर्विमा, जीवन विमा इत्यादी सेवा प्रामुख्याने प्रदान करते. चब लिमिटेड कंपनीचे महसूल हे ४२.१ अब्ज डॉलर उत्पन्न हे ६.१ अब्ज डॉलर आणि मार्केट कॅपिटल ८९.१ अब्ज डॉलर इतके आहे.

10 Biggest Insurance Company in the World
10 Biggest Insurance Company in the World

५. प्रुडेन्शियल पी एल सी

प्रुडेन्शियल पी एल सी ही एक विमा आणि गुंतवणूक सेवा देणारी कंपनी आहे जी लंडन स्थित असून जीवन विमा, आरोग्य विमा, अपघात विमा, मालमत्ता आणि इतर पॉलिसी पेन्शन योजना, इक्विटी योजना इत्यादी आर्थिक सेवा प्रदान करते. प्रुडेन्शियल पी एल सी जागतिक बाजारपेठेत देखील ग्राहकांना आपल्या सेवा प्रदान करते. प्रुडेन्शियल पी एल सी चे महसूल हे ६३ अब्ज डॉलर व निव्वळ उत्पन्न ३२८ दशलक्ष डॉलर असून या कंपनीचे मार्केट कॅपिटल ३६.२ अब्ज डॉलर इतके आहे.

६. AXA

AXA ही विमा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असून १९९० मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली यासाठी अनेक विमा कंपन्यांचे विलीनीकरण या कंपनीमध्ये करण्यात आले व AXA तयार करण्यात आली. AXA ही कंपनी मालमत्ता विमा, अपघात विमा, बचत आणि गुंतवणूक व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रांमध्ये जगातील आघाडीच्या मुख्य विमा गटांपैकी एक आहे, जे आपल्या आर्थिक सेवा जगभरातील ग्राहकांना प्रदान करते. या कंपनीच्या मार्केट कॅपिटल हे ६४.६ अब्ज डॉलर इतके असून सरासरी निव्वळ उत्पन्न हे ८.२ अब्ज डॉलर इतके आहे.

७. Allianz

Allianz ही एक जागतिक वित्तीय सेवा देणारी अग्रगण्य कंपनी असून विम्यापासून, मालमत्ता व्यवस्थापनाच्या आर्थिक सेवा प्रदान करते, अपघात विमा, आरोग्य विमा, जीवन विमा या सेवा पुरविते. Allianz चे उत्पन्न हे ७.८ अब्ज डॉलर असून मार्केट कॅपिटल ८५.३ अब्ज इतके आहे.

८. पिंग अँन इन्शुरन्स कंपनी ऑफ चायना

पिंग अँन इन्शुरन्स ही कंपनी विमा, आर्थिक सेवा, बँकिंग सुविधा प्रदान करणारी चिनी कंपनी आहे. पिंग अँन इन्शुरन्स च्या अनेक उप कंपन्या आहेत. पिंग अँन इन्शुरन्स महसूल हे १५६.२ अब्ज डॉलर इतके असून कंपनीचे निव्वळ उत्पन्न १४.७ अब्ज डॉलर आहे. या चिनी कंपनीचे मार्केट कॅपिटल हे ११४.८ अब्ज डॉलर इतके आहे.

९. बर्कशायर हाथवे

बर्कशायर हाथवे ही विमा, मालमत्ता विमा इत्यादी आर्थिक सेवा प्रदान करते तसेच या कंपनीचे रेल्वे, उर्जा, विक्री यांसारख्या क्षेत्रांमध्ये होल्डिंग सह एक प्रमुख विमा कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीचा वार्षिक महसूल हा २५३.९ आमच्या डॉलर इतका असून कंपनीचे निव्वळ उत्पन्न हे १.३ आमच्या डॉलर इतके आहे. तसेच या कंपनीच्या मार्केट कॅपिटल हे ६६३.६ अब्ज डॉलर इतके आहे.

१०. ऑल स्टेट कार्पोरेशन

ऑल स्टेट कार्पोरेशन ही वैयक्तिक मालमत्ता आणि अपघाती विम्यामध्ये अग्रगण्य कंपनी आहे. वाहन, घर, जीवन विमा इत्यादी, बाबत ही कंपनी विमा सेवा प्रदान करते. ऑल स्टेट कार्पोरेशनचा महसूल हा ५२.६ अब्ज डॉलर इतका असून निव्वळ उत्पन्न हे २१० दश लक्ष डॉलर इतके होते. ऑल स्टेट कार्पोरेशनचे मार्केट कॅपिटल ३५.५ अब्ज डॉलर इतके आहे.

वरील लेखात जगभरातील प्रमुख विमा कंपन्यांची माहिती दिली आहे. असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी kokanculture.com नक्की फॉलो करा. तसेच 10 Biggest Insurance Company in the World हा लेख कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा.

हे देखील वाचा

How to Earn Money From Fiverr

3 Easy Way to Earn Money Online

1 thought on “10 Biggest Insurance Company in the World”

  1. Pingback: Star Health Insurance info in Marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Vinesh Phogat ने जाहीर केली निवृत्ती Golden boy ने रौप्य पदक जिंकत रचला इतिहास Neeraj Chopra Won Silver Medal मराठमोळ्या Avinash Sable ने रचला इतिहास पण मेडल हुकले. Mumbai’s most famous street food Famous places for Monsoon Trip in India