Suran Bhaji Recipe
सर्वेशा कन्दशाकाना सुरण: श्रेष्ठ: उच्चते...
Suran Bhaji Recipe सुरण या भाजीमध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मामुळे वरील वाक्यात असे म्हटले आहे की, सर्व कंदवर्गीय भाज्यांमध्ये सुरणाची भाजी ही सर्वश्रेष्ठ आहे. कोकणात सहज आढळणाऱ्या सुरण या वनस्पतीच्या सर्व भागांचा उपयोग भाजी म्हणून केला जातो. भाजी करताना थोडी काळजी घ्यावी लागते, या भाजीच्या मुळाशी असणाऱ्या कंदामध्ये कॅल्शियम ऑक्सीलेट असल्यामुळे भाजीचा डायरेक्ट उपयोग केल्यास घशाजवळ खाज सुटते. याच्यावर पर्याय म्हणून कोकणातील बांधव चिंच किंवा कोकम, आमसूल इत्यादींच्या पाण्यामध्ये भिजत ठेवतात किंवा भाजी करण्या अगोदर कंद उकडून घेताना त्या पाण्यामध्ये कोकम किंवा चिंच टाकतात. सुरणाची भाजी अत्यंत गुणकारी आणि पौष्टिक असते सुरणा मध्ये a, b आणि c जीवनसत्त्व आढळतात. सुरणाची चव सामान्यत: तुरट, तिखट असते. या भाजीचे फायदे देखील खूप आहेत.
Suran Bhaji Recipe सुरणाची भाजी
साहित्य
अर्धा किलो पांढरा सुरण
तेल
फोडणीचे साहित्य- कढीपत्ता, जिरे, मोहरी, हिंग, हळद, लसुन इत्यादी
चिंच/ कोकम /आमसूल
मिरची पावडर
सुक्या लाल मिरच्या १-२
उडीद डाळ
ओले खोबरे
कृती
सुरण पूर्णतः सोलून बारीक फोडी करून घ्याव्यात, पाण्यात कोकम किंवा आमसूल, चिंच, थोडे मीठ टाकून सुरणाच्या फोडी टाकून उकळून घ्याव्यात.
मध्यम आचेवर एका भांड्यामध्ये थोडं तेल टाकून त्यामध्ये कढीपत्ता जिरे मोहरी, हिंग हळद घालून फोडणी करावी, त्यानंतर सुक्या लाल मिरच्या व थोडी उडीदाची डाळ टाकून घ्यावी, त्यानंतर उकडलेल्या सुरणाच्या फोडी घालून एकजीव करून घ्यावे.
त्यामध्ये किसलेले ओले खोबरे, चवीनुसार मीठ घालून भाजी छान परतून घ्यावी, या मिश्रणामध्ये चिंचेचे पाणी घालून पाच ते दहा मिनिटं चांगले शिजू द्यावे. भाजी शिजवून झाल्यानंतर कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.
सोपी आणि आरोग्यासाठी फायदेशीर असलेली ही सुरणाची झटपट तयार होणारी भाजी नक्की ट्राय करा.
सुरणाच्या पाल्याची भाजी
साहित्य
सुरणाचा पाला (कोवळा)
हरभरा डाळ (भिजवलेली) / चने
किसलेले ओले खोबरे
शेंगदाणा कुट
चिंच/ कोकम /आमसूल
लाल मिरची २-३
मिरची पावडर
मीठ
कृती
सुरणाची कोवळी पाने त्यातील मधला जाडसर भाग काढून बारीक चिरून घ्यावेत. कढई मंद आचेवर ठेवून त्यामध्ये फोडणीसाठी दोन सुक्या मिरच्याचे तुकडे टाकून तळून त्यामध्ये भिजलेली चणाडाळ किंवा चणे टाकून छान परतून घ्यावे, मिश्रण मऊसर झाल्यावर त्यावर सुरणाचा चिरलेला पाला टाकावा. सर्व मिश्रण परतून त्यामध्ये मिरची पावडर, चवीनुसार मीठ, शेंगदाण्याचा कूट व किसलेले ओले खोबरे टाकून एकजीव करून घ्या. त्यामध्ये चिंच किंवा कोकमाचे पाणी घालून पाच ते दहा मिनिटं मंद आचेवर शिजवून घ्या. आणि भाकरी सोबत सर्व्ह करा.
सुरणाच्या भाजीचे आरोग्यदायी फायदे
असेच नव नवीन रेसिपी वाचण्यासाठी आमच्या कोकण कल्चर पेजला नक्की फॉलो करा, तसेच वरील रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा.
हे देखील वाचा
कोकणातील प्रसिद्ध झटपट बनणारे घावणे
Pingback: Karande Bhaji Recipe Karande Bhaji RecipeKarande Bhaji Recipe कोकणातील पौष्टिक भाजी, करांदे
Attractive part of content. I just stumbled upon your weblog and in accession capital
to assert that I acquire in fact enjoyed account your weblog posts.
Anyway I’ll be subscribing for your augment and even I success you get admission to persistently
rapidly.