UPI Launch in France : भारतात यू.पी.आय. पेमेंट सिस्टीम खूप प्रसिद्ध झाली. २०१६ मध्ये National Payments Corporation of India (NPCI) द्वारा संपूर्ण भारतभर UPI सेवा उपलब्ध करून देण्यात आली. आणि कमी वेळातच ही अगदी तळागाळात पोहोचली, भारतातील बऱ्याचशा लोकांना यामुळे बँकिंग सेक्टर सोबत जोडता आले. तसेच या डिजिटल युगात पेमेंट करणे अधिक सुलभ बनले. यूपीआय मुळे अगोदरची वेळखाऊ बँकिंग प्रोसेस कायमची बंद झाली. यू.पी.आय.चा फायदा असा झाला की आपण काही सेकंदातच कोणतेही ऑनलाइन पेमेंट करू शकतो. UPI मुळे वित्तीय देवाण घेवाण जलद होऊ लागली.
UPI पेमेंट ही सुविधा सध्या फक्त भारतातच सुरू होती. परंतु आता जगातील काही राष्ट्रांनी देखील ही प्रणाली स्वीकारली आहे. यासाठी भारत देश इतर देशांना मदत करत आहे. आता भारताप्रमाणे फ्रान्समध्ये देखील तुम्ही यू.पी.आय. पेमेंट करू शकता. यू.पी.आय.च्या मदतीने फ्रान्समधील तुमच्या खात्यात रकमेची देवाण-घेवाण करू शकता, पण याबाबत फार कमी लोकांना फ्रान्समध्ये लॉन्च झालेल्या यूपीआय बद्दलचे अपडेट माहिती आहेत. आज या लेखात फ्रान्स मध्ये लॉन्च केलेल्या यूपीआयच्या अपडेट बाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
UPI Launch in France जगप्रसिद्ध आयफेल टॉवर पासून सुरुवात…
फ्रान्सची वित्तीय कंपनी Lyra सोबत (NPCI) ने फ्रान्समध्ये UPI लॉन्च केले, आणि याची सुरुवात ही जगप्रसिद्ध असा आयफेल टॉवर येथून केली आहे, येथे येणाऱ्या सर्व पर्यटकांना याचे तिकीट खरेदी करावे लागते, तिकीट खरेदी करतानाच्या पेमेंट पर्यायांमध्ये आता भारतीयांसाठी यूपीआयचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे, ज्याद्वारे भारतीय पर्यटक यूपीआयच्या मदतीने पेमेंट करू शकतात. NPCI आणि Lyra हे दोन वर्ष यू.पी.आय. वर काम करत होते. त्यामुळे आता यूपीआय पेमेंट फ्रान्समध्ये शक्य झाले आहे. आयफेल टॉवर टिकीट साठी तुम्हाला तुमच्या यूपीआय अँप मधून दिलेला स्कॅनर स्कॅन करून तुमचे पेमेंट झाल्यावर तिकीट घेऊ शकता.
UPI Launch in France जगभरातील या देशांनीही स्वीकारले UPI
येणाऱ्या आगामी काळात भारतीय नागरिक UPI च्या मदतीने विदेशात कुठेही ऑनलाइन पेमेंट करू शकतील. संपूर्ण जग भारताने तयार केलेली यूपीआय प्रणाली स्वीकारत आहे, संपूर्ण जगभरा तील अनेक देश यावर काम करत आहेत. फ्रान्स व्यतिरिक्त इतरही असे अनेक देश आहेत ज्यांनी यूपीआय प्रणाली स्वीकारली आहे.
- फ्रान्स
- भूतान
- सिंगापूर
- ओमान
- हॉंगकॉंग
- ऑस्ट्रेलिया
- युके
- युनायटेड अरब अमिरात
वरील सर्व देशांमध्ये तुम्ही तुमच्या खात्यातून यूपीआय द्वारे सहज पेमेंट करू शकता. NPCI इतर देशांसोबत देखील करार करत आहे, ज्याद्वारे इतर सर्व देशांमध्ये यूपीआय द्वारे पेमेंट करता येईल.
आशा आहे की या लेखातून तुम्हाला फ्रान्समध्ये लॉन्च झालेल्या यूपीआय बद्दल माहिती मिळाली असेल, अशीच देश विदेशातील नव-नवीन माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज कोकण कल्चर ला नक्की फॉलो करा. तसेच हा लेख कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा आणि आपल्या मित्र मंडळींना माहिती शेअर करा.
Pingback: Electoral Bonds वर का बंदी घातली गेली? जाणून घ्या संपूर्ण माहिती.