Vihir Anudan Yojana 2024

Vihir Anudan Yojana 2024 : विहीर अनुदान योजना २०२४ महाराष्ट्र शासन राज्यातील जनतेसाठी शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वकांक्षी योजना तसेच सामाजिक उपक्रम राबवत असते, राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच आर्थिकदृष्ट्या गरीब लोकांसाठी अनेक योजना शासनाने जाहीर केलेल्या आहेत. कष्टकरी मध्यमवर्गीय शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने अशीच एक महत्त्वकांक्षी योजना सुरू केली आहे या योजनेची संपूर्ण माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत या योजनेचे नाव विहीर अनुदान योजना आहे.

Vihir Anudan Yojana 2024
Vihir Anudan Yojana 2024

Vihir Anudan Yojana 2024 या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी विहीर बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून ४ लाखांचे अनुदान देण्यात येते. विहिरींमुळे शेतकऱ्यांना पिण्यासाठी तसेच शेतीच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊन त्यांची आर्थिक उन्नती साध्य होईल. राज्यातील बहुतांश भागांमध्ये पाण्याविना शेतकरी शेतीकडे पाठ फिरवताना दिसत आहे. विहीरी साठी येणारा खर्च देखील बराच असल्याने मध्यमवर्गीय शेतकरी आर्थिक स्थितीमुळे हा खर्च पेलण्यास असमर्थ असतात, यासाठी शासन स्तरावर याची दखल घेऊन मागेल त्याला विहीर अशी ही विहीर अनुदान योजना सुरू केली आहे.

मित्रांनो या लेखामध्ये विहीर अनुदान योजनेची संपूर्ण माहिती दिली आहे हा लेख शेवटपर्यंत वाचा तसेच तुमच्या परिसरात आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकरी असतील त्यांना या योजनांची माहिती जरूर द्या. सदर लेख त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा ज्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकेल.

Vihir Anudan Yojana 2024 विहीर अनुदान योजना २०२४ मध्ये करण्यात आलेले मुख्य बदल.

  • लाभार्थ्याकडे किमान ०.४० हेक्टर सलग जमीन क्षेत्र असणे आवश्यक आहे.
  • या अगोदरच्या योजनेमध्ये असणारी अट – दोन विहिरींमधील अंतर दीडशे मीटर असणे हे रद्द केली आहे.
  • लाभ घेणार आहे ७/१२ मध्ये विहिरीची नोंद असू नये.
  • एकच गावात कितीही विहिरी घेता येणार.
  • तीन लाखां ऐवजी चार लाख रुपये अनुदान मिळणार.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे सरकार लघु उद्योजकांसाठी दहा लाखांचा कर्ज पुरवठा करते.

Vihir Anudan Yojana 2024 विहीर अनुदान योजना वैशिष्ट्ये व उद्दिष्टे

महाराष्ट्र शासनान राज्यातील गरीब शेतकरी / जनतेसाठी पंचायत समिती कृषी विभाग योजनेअंतर्गत मागेल त्याला विहीर अनुदान योजना राबवित आहे.

  • महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच त्यांचा सामाजिक आर्थिक विकास साधण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
  • दुष्काळामुळे शेती क्षेत्राविषयी असलेली उदासीनता घालवून शेतीकडे प्रोत्साहित करण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना एक महत्त्वाचे पाऊल आहे.
  • साधी सरळ अर्ज प्रक्रिया असल्याने इतर बाबींची अडचण येत नाही.
  • ऑनलाइन अर्ज प्रक्रिया असल्याने अर्जदार शेतकरी घरबसल्या मोबाईल द्वारे अर्ज करू शकतात यासाठी शासकीय कार्यालयात जाण्याची गरज भासत नाही.
  • राज्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ घेता यावा यासाठी गावात असणाऱ्या विहिरींच्या संख्येची अट रद्द केली आहे.
  • तसेच शासन आणि राज्यातील जनता यांच्यामध्ये योजना राबवताना पारदर्शकता राहावी यासाठी योजनेद्वारे मिळणारी अनुदान राशी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दिली जाते. यामुळे कोणताही गैरव्यवहार होत नाही.
  • आत्महत्या रोखण्यासाठी या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवणे.
  • या योजनेचा मुख्य उद्देश हा शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे हा आहे.
  • राज्यातील शेतकऱ्यांसाठी सिंचनासाठी पाण्याचा स्त्रोत उपलब्ध करून देणे व त्यांना शेती करण्यास प्रोत्साहित करणे.
  • दुष्काळ आणि पाण्याच्या कमतरतेमुळे होणारे शेतकऱ्याचे नुकसान थांबवणे.

Vihir Anudan Yojana 2024 लाभार्थी निवड

या योजने अंतर्गत लाभार्थी निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार केला जातो, कुणाला लाभार्थी होता येते ते जाणून घेऊ. आर्थिक दृष्ट्या मागास तसेच असमर्थ असलेल्या गरीब शेतकऱ्यांना विहीर अनुदान योजनेचा लाभ घेता येतो. यामध्ये पुढील व्यक्ती लाभ होऊ शकतात.

  • घरात कर्ती स्त्री असलेले कुटुंब
  • अनुसूचित जाती जमाती / भटक्या जमाती
  • दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती
  • अपंग व्यक्ती
  • अल्प भू धारक
  • जॉब कार्ड धारक

इत्यादी व्यक्ती सदर विहीर अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Vihir Anudan Yojana 2024 निकष

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाच विहीर अनुदान योजना २०२४ चा लाभ मिळेल.

लाभार्थी व्यक्ती हा शेतकरी असणे गरजेचे आहे तसेच लाभार्थ्याकडे शेतात दुसरी विहीर नसावी.

लाभार्थी आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणे गरजेचे आहे.

लाभार्थी शेतकऱ्याकडे स्वतःचे बँक पासबुक असावे.

या अगोदर लाभार्थ्याने शेततळे योजना किंवा विहीर योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

लाभार्थी शेतकऱ्यांसोबत जमिनीमध्ये सह हिस्सेदार असल्यास त्यांचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे.

विहीर अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

१) आधार कार्ड

२) रहिवासी दाखला

३) रेशन कार्ड

४) मोबाईल क्रमांक

५) ई-मेल आयडी

६) उत्पन्न प्रमाणपत्र / दाखला

७) बँक खाते

८) जमिनीचे कागदपत्र ७/१२, ८ अ

९) पासपोर्ट साईज फोटो

१०) शासनाने दिलेले रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड

११) योजनेचा लाभ घेताना सामुदायिक विहीर असल्यास लाभार्थ्यांनी सामोपचाराने पाणी वापराबाबत करार पत्र.

Indira Gandhi National old Age Pension Scheme

विहीर अनुदान योजनेसाठी अर्ज प्रक्रिया

ग्रामपंचायत मध्ये जाऊन ग्रामसेवकाकडून विहीर अनुदान योजनेचा अर्ज घेणे.

अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरून इतर कागदपत्रे जोडावी.

अर्ज जमा करताना सोबत आवश्यक कागदपत्रे यासोबतच नमुना संमती पत्राचा अर्ज जोडावा.

अर्ज जमा करावा अशाप्रकारे योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

विहीर अनुदान योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

ऑनलाइन अर्ज दाखल करण्याअगोदर खाली दिलेल्या शासनाचा जीआर जरूर वाचा.

अर्जदारास विहीर अनुदान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन.

होम पेजवर मागेल त्याला विहीर योजना यावर क्लिक करावे

पुढील पेजवर योजनेचा अर्ज येईल त्यामध्ये आवश्यक संपूर्ण माहिती भरून विचारलेली कागदपत्रे अपलोड करावी.

वो सबमिट बटनावर क्लिक करावे.

अशाप्रकारे विहीर अनुदान योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

विहीर अनुदान योजना ऑफिशियल वेबसाईट क्लिक करा.

मागेल त्याला विहीर योजना शासकीय परिपत्रक GR क्लिक करा.

मागेल त्याला विहीर योजना अर्ज डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा.

असेच नवनवीन योजनांचे अपडेट मिळवण्यासाठी कोकण कल्चर ला नक्की फॉलो करा, तसेच Vihir Anudan Yojana 2024 लेख कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा.

हे देखील वाचा.

PM Suryoday Yojana अर्ज कसा करावा?

जीवन विद्या मिशन

कुक्कुट पालन कर्ज योजना २०२३ – अर्ज, सबसिडी, कागदपत्रे संपूर्ण माहिती.

सुकन्या समृद्धी योजना

मुख्यंमत्री सौर कृषी पंप योजना २०२३ 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Lavasa city बद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? Saurabh Netravalkar पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणारा भारतीय वंशाचा क्रिकेटर. Tejashree Pradhan हिचा सिनेसृष्टीतील प्रवास World Environment Day: A Call to Action Who is Kavya Maran?