Suran Bhaji Benefits सर्वेशा कन्दशाकाना सुरण: श्रेष्ठ: उच्चते...
Suran Bhaji Benefits सुरण या भाजीमध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मामुळे वरील वाक्यात असे म्हटले आहे की, सर्व कंदवर्गीय भाज्यांमध्ये सुरणाची भाजी ही सर्वश्रेष्ठ आहे. कोकणात सहज आढळणाऱ्या सुरण या वनस्पतीच्या सर्व भागांचा उपयोग भाजी म्हणून केला जातो. भाजी करताना थोडी काळजी घ्यावी लागते, या भाजीच्या मुळाशी असणाऱ्या कंदामध्ये कॅल्शियम ऑक्सीलेट असल्यामुळे भाजीचा डायरेक्ट उपयोग केल्यास घशाजवळ खाज सुटते. याच्यावर पर्याय म्हणून कोकणातील बांधव चिंच किंवा कोकम, आमसूल इत्यादींच्या पाण्यामध्ये भिजत ठेवतात किंवा भाजी करण्या अगोदर कंद उकडून घेताना त्या पाण्यामध्ये कोकम किंवा चिंच टाकतात. सुरणाची भाजी अत्यंत गुणकारी आणि पौष्टिक असते सुरणा मध्ये a, b आणि c जीवनसत्त्व आढळतात. सुरणाची चव सामान्यत: तुरट, तिखट असते. या भाजीचे फायदे देखील खूप आहेत. सुरणाचा कंद हा जमिनीमध्ये वाढतो तसेच तो ओबडधोबड म्हणजे असा कोणताही त्याला फिक्स आकार नसतो, अर्धगोलासारखा चपटा गर्द तपकिरी, मातेरी रंगाचा असतो, तिला पावसाळ्यामध्ये कोंब येतात वरती एक खोड वाढते, व इतर आठ महिने कंद जमिनीमध्ये सुप्त अवस्थेत असतो. तसेच याला एका कंदाला अनेक छोटे छोटे कंद शाखा स्वरूपात तयार होतात व पावसाळ्यात त्या छोट्या छोट्या कंदांना कोंब येतात. थोडक्यात केळीच्या झाडाचे उदाहरण आपण घेऊ केळीच्या एका झाडापासून अनेक झाडे तयार होत जातात त्याच पद्धतीने सुरणाच्या शाखा जमिनीत विस्तारात जातात.
सुरणामध्ये असणारे घटक
पौष्टिक घटक (१०० ग्रॅम सुरण) | मापक |
पाणी | ६९.६ ग्रॅम |
प्रोटीन | १.५३ कॅलरी |
फॅट | ०.१७ एम.जी. |
कार्बोहायड्रेट | २७.९ एम.जी. |
साखर | ०.५ एम.जी. |
कॅल्शियम | १७ एम.जी. |
लोह | ०.५४ एम.जी. |
मॅग्नेशियम | २१ एम.जी. |
फॉस्फरस | ५५ एम.जी. |
पोटॅशियम | ८१६ एम.जी. |
Suran Bhaji Benefits सुरणाच्या भाजीचे फायदे
कंद भाजी प्रकारातील सगळ्यात गुणकारी तसेच पौष्टिक भाजी म्हणून सुरण कडे पाहिले जाते. संपूर्ण वर्षभर कोणत्याही ऋतूत सुरण सहज उपलब्ध असतो. सुरणाची भाजी खाण्याचे अनेक फायदे आहेत, अनेक आजार, शारीरिक तक्रारी यांच्यावर सुरण फार उपयुक्त ठरतो. सुरणाची भाजी खाल्ल्याने कोणते फायदे होतात ते पाहूया.
सुरणाच्या भाजी मुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते, आहारात फायबर युक्त भाज्यांमुळे शरीराची पचनक्रिया सुरळीत राहते, सुरणाची भाजी ही आरोग्यवर्धक असून या भाजीचा समावेश आहारात केल्याने आपणास वारंवार भूक लागत नाही, तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. रक्तदाब नयंत्रित ठेवता येतो, कोलेस्ट्रॉल नियंत्रित करता येतो, तसेच श्वासनलिका दाह, पोटदुखी, रक्त विकार इत्यादी आजार बरे होण्यास मदत होते.
बद्धकोष्ठता कमी करण्यास या भाजीचा फायदा होतो.
रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत.
दमा, खोकला, जंत, तसेच यकृताचे विकार यावर देखील सुरण गुणकारी आहे.
सुरणाच्या कंदाची भाजी ही मुळव्याधीवर गुणकारी आहे.
असेच नव नवीन लेख वाचण्यासाठी आमच्या कोकण कल्चर पेजला नक्की फॉलो करा, तसेच वरील लेख कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा.