प्रधानमंत्री मुद्रा योजना | PM Mudra Yojana in Marathi

PM Mudra Yojana in Marathi : प्रधानमंत्री मुद्रा योजना २०२४ ही भारत सरकार द्वारा बिगर कॉर्पोरेट, बिगर शेती लघुउद्योग, सूक्ष्म उद्योगांना कर्ज देण्यासाठी बनवण्यात आलेली ही योजना आहे. सदर लेखांमध्ये आपण या योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

PM Mudra Yojana in Marathi
PM Mudra Yojana in Marathi

PM Mudra Yojana in Marathi | प्रधानमंत्री मुद्रा योजना

PM Mudra Yojana in Marathi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये भारतात महत्वकांक्षी योजना प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेचे उद्घाटन केले. या योजनेअंतर्गत छोटे व्यवसाय स्थापन करण्यासाठी कर्ज घेणाऱ्या व्यक्तींसाठी दहा लाख रुपये पर्यंत कर्ज देण्यात येईल. प्रधानमंत्री मुद्रा योजनेत कोणतेही कर्ज प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही. मुद्रा कर्जासाठी सरकार द्वारे मुद्रा कार्ड जारी केले जाते.

प्रधानमंत्री मुद्रा योजने द्वारे आतापर्यंत सरकारने ३३ दशलक्ष रुपये वितरित केले आहे. एकूण लाभार्थी वितरणापैकी ६८% महिला आहेत. महिला सक्षमीकरणासाठी सरकारने हे ठोस पाऊल उचलले आहे. या योजनेद्वारे सरकार लघु उद्योजकांसाठी दहा लाखांचा कर्ज पुरवठा करते. विशेष म्हणजे या कर्जासाठी काहीही तारण म्हणून ठेवावे लागत नाही. देशभरात अशा अनेक व्यक्ती आहेत ज्यांना काही ना काही स्टार्टअप करायचे आहे पण आर्थिक सहाय्याच्या कमतरतेमुळे ते मागे पडतात. प्रधानमंत्री मुद्रा योजना कार्यक्रमाचे प्राथमिक उद्दिष्ट त्या स्टार्टअप सुरू करणारे व्यक्तींना त्यांचे लक्ष साध्य करण्यास मदत करणे. त्यामुळे सदर व्यक्ती शासनामार्फत कर्ज घेऊन त्यांचे छोटे व्यवसाय स्थापन करतील.

PM Mudra Yojana in Marathi कर्ज प्रकार

प्रधानमंत्री मुद्रा योजनेत कर्जे मिळतात.

१) शिशु कर्ज -प्रधानमंत्री मुद्रा योजना शिशु कर्ज अंतर्गत ५०,०००/- पर्यंत व्यवसायासाठी कर्ज मिळू शकते.

२) किशोर कर्ज – किशोर कर्ज योजनेत लाभार्थींना ५०,०००/- ते ५,००,०००/- पर्यंत कर्ज मिळू शकते.

३) तरुण कर्ज – तरुण मुद्रा योजनेत लाभार्थ्यांना व्यवसायासाठी ५,००,०००/- ते १०,००,०००/- कर्ज मिळू शकते.

PM Mudra Yojana in Marathi
How to Earn Money From Fiverr

PM Mudra Yojana in Marathi उद्देश

प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा प्राथमिक उद्देश हा स्टार्टअप/ स्वयंरोजगारासाठी सुलभ कर्ज उपलब्ध करून देणे तसेच छोट्या उद्योगधंद्यांमार्फत रोजगार निर्माण करून बेरोजगारी कमी करण्यास मदत करणे. व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवली समस्या सोडवणे.

या योजने अगोदर उद्योगांसाठी बँकेतून कर्ज घेताना बऱ्याच प्रक्रिया पूर्ण कराव्या लागत होत्या तसेच बँकांकडून कर्ज देण्यास टाळाटाळ होत असे. यासाठी या योजने अंतर्गत सुलभ कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

PM Mudra Yojana in Marathi फायदे

प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत कोणत्याही हमी शिवाय सरकारकडून छोट्या उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. तसेच घेतलेला कर्जासाठी परतफेड कालावधी हा पाच वर्षांनी वाढवता येतो. अर्ज केल्यानंतर कर्ज प्रक्रिया करून कर्ज उपलब्ध होईपर्यंत लाभार्थ्याकडून कोणतेही प्रक्रिया शुल्क घेतले जात नाही.

महा-ई-सेवा केंद्र रजिस्ट्रेशन २०२४

PM Mudra Yojana in Marathi बँका

मुद्रा कर्ज २७ सरकारी बँका, १७ खाजगी बँका, ३१ क्षेत्रीय ग्रामीण बँका, ४ सहकारी बँका, ३६ लहान वित्तीय संस्था, २५ घर बँकिंग वित्तीय कंपन्यां द्वारे दिले जाते.

मुद्रा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे आधार कार्ड पॅन कार्ड मतदान ओळखपत्र पासपोर्ट बँक पासबुक यापैकी एक असावे. त्याची सत्यप्रत. दोन पासपोर्ट साईज फोटो आणि तीन महिन्यांची बँक स्टेटमेंट, व्यवसाय प्रमाणपत्र, व्यवसाय परवाना, नोंदणी प्रमाणपत्र यांची सत्यप्रत.

पात्रता निकष

या योजनेचा लाभ घेणारा व्यक्ती भारतीय नागरिकच असावा.

व्यक्ती, मालकीची चिंता, भागीदारी, खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी, फर्म इ.

या कर्जाचा लाभ हा कृषी व्यवसाय सोडून इतर व्यवसायासाठीच करावा लागेल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याकडे व्यवसायाची ब्लू प्रिंट असणे आवश्यक आहे.

लाभार्थी हा बँक किंवा वित्तीय संस्थांचा डिफॉल्टर नसावा तसेच त्याचे क्रेडिट रेकॉर्ड समाधानकारक असणे गरजेचे आहे.

शिशु मुद्रा

१) ओळख पत्र – आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट इ.

२) रहिवासी पुरावा – लाईट बिल, मालमत्ता कर पावती, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र इ.

३) अर्जदाराचा पासपोर्ट साईज कलर फोटो (२ प्रती)

४) मशनरी आणि इतर खरेदी करायच्या वस्तूंचे कोटेशन

५) पुरवठादाराचे नाव, मशनरींचा तपशील आणि किंमत

६) व्यवसाय ठिकाणाचा पत्ता– व्यवसाय संबंधित परवाना, नोंदणी प्रमाणपत्र, मालकी हक्कांसंबंधी इतर कागदपत्रे.

किशोर आणि तरुण मुद्रा

१) ओळख पत्र – आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट इ.

२) रहिवासी पुरावा – लाईट बिल, मालमत्ता कर पावती, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र मालक, भागीदार, संचालक यांचे पासपोर्ट इ.

३) अर्जदाराचा पासपोर्ट साईज कलर फोटो (२ प्रती)

४) व्यवसाय ठिकाणाचा पत्ता– व्यवसाय संबंधित परवाना, नोंदणी प्रमाणपत्र, मालकी हक्कांसंबंधी इतर कागदपत्रे.

५) सदर अर्जदार बँक किंवा वित्तीय संस्थेत डिफॉल्टर नसावा.

६) मागील सहा महिन्यांची बँक स्टेटमेंट

७) आयकर विक्रीकर विवरणपत्र आणि मागील दोन वर्षाचा ताळेबंद.

८) अर्ज के‌लेल्या तारखे पर्यंत चालू वर्षात केलेली विक्री.

९) प्रकल्प अहवाल

१०) कंपनीचे मेमोरॅंडम आर्टिकल्स ऑफ असोसिएशन/ पार्टनरशिप डीड इत्यादी

अर्ज प्रक्रिया

  • ऑनलाइन नोंदणीसाठी पुढील पुरावे असणे आवश्यक आहे- ओळखपत्र, पत्ता पुरावा, पासपोर्ट साईज फोटो, अर्जदाराची स्वाक्षरी, ओळखीचा पुरावा किंवा व्यवसाय उपक्रमाचा पत्ता.
  • पीएम मुद्रा च्या संकेतस्थळावर जाऊन तिथे दिलेला उदय मित्र पोर्टल निवडा.
  • पीएम मुद्रा कर्ज “अर्ज करा” वर क्लिक करा.
  • पुढे तीन पर्याय येतील नवीन उद्योजक, विद्यमान उद्योजक,
  • पुढे अर्जदाराचे नाव, ई मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक टाकून ओटीपी जनरेट करा.
  • ओटीपी टाकून झाल्यानंतर तुमची नोंदणी पूर्ण होईल.
  • नोंदणी यशस्वी झाल्यानंतर पुढे वैयक्तिक माहिती आणि व्यवसायासंबंधी तपशील भरून घ्या.
  • तुमच्या प्रस्तावित प्रकल्पाविषयी प्रस्ताव बनविण्यासाठी मदत लागल्यास हँड होल्डिंग एजन्सी किंवा कर्ज अर्ज केंद्र निवडा आणि अर्ज भरा.
  • कर्जाची श्रेणी निवडा १) शिशु मुद्रा २) किशोर मुद्रा ३) तरुण मुद्रा
  • यानंतर अर्जदाराने त्याच्या व्यवसायाची संपूर्ण माहिती सविस्तर भरणे आवश्यक आहे.
  • फॉर्म वर विचारलेली इतर माहिती भरून बँकिंग, क्रेडिट सुविधा भविष्यातील अंदाज इ.
  • संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर सबमिट करा. अर्जुन सबमिट केल्यानंतर एक अर्ज क्रमांक तयार होईल जो भविष्यातील संदर्भंसाठी तुम्हास उपयोगी पडेल, तो जतन करून ठेवा.

अर्ज केल्यानंतर बँक अधिकारी अर्ज आणि त्यासोबत जोडलेल्य कागदपत्रांची छाननी करून कर्जाची रक्कम योजनेच्या निकषानुसार एका महिन्याच्या आत तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

प्रधानमंत्री मुद्रा योजना ऑफिशिअल वेबसाईट क्लिक करा.

वरील PM Mudra Yojana in Marathi लेखांमध्ये पंतप्रधान मुद्रा योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे, असेच योजनांचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी कोकण कल्चर ला नक्की फॉलो करा तसेच सदर लेख कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा.

हे देखील वाचा

सुकन्या समृद्धी योजना

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना २०२३

आयुष्मान भारत योजना

कुक्कुट पालन कर्ज योजना

प्रधानमंत्री सूर्योदय योजना

अटल पेन्शन योजना

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Lavasa city बद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? Saurabh Netravalkar पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणारा भारतीय वंशाचा क्रिकेटर. Tejashree Pradhan हिचा सिनेसृष्टीतील प्रवास World Environment Day: A Call to Action Who is Kavya Maran?