Palak Paneer Recipe : पनीर पासून खूप साऱ्या डिश बनविल्या जातात, त्यापैकीच पालक पनीर ही उत्तर भारतातील एक लोकप्रिय डिश आहे. पालक मध्ये बरीच जीवन सत्वे, लोह, कॅल्शिअम तसेच पनीर मध्ये प्रोटीन असल्याने याचा समावेश पौष्टिक भाजीमध्ये केला जातो. ही डिश तुम्ही रोटी, पराठा, नान सोबत सर्व्ह करू शकता. आज आपण अशीच टेस्टी पालक पनीर रेसिपी पाहणार आहोत.
घरीच बनवा पनीर
हल्ली आपण पाहतो कि बाजारात मिळणाऱ्या बऱ्याच गोष्टी या भेसळ युक्त असतात. तसेच बऱ्याच व्हिडीयो देखील आपल्या पाहण्यात आल्या असतील कि आपण काही पदार्थ जे रोजच्या दैनंदिन जीवनात वापरतो त्या कशा बनवल्या जातात. त्या भेसळ युक्त पदार्थांमध्ये पनीर देखील येतो. यापासून बचाव करण्यासाठी आपण घरच्या घरी पनीर कसे बनवाचे हे पाहूया.
अर्धा लिटर फुल क्रीम दुध/ म्हशीचे दुध. सर्वप्रथम या दुधाला उकळी काढून घ्या, उकळी आल्यावर गॅस मंद आचेवर ठेवून त्या उकळलेल्या दुधात चार चमचे लिंबाचा रस टाकून घ्या,जेणेकरून ते दुध फाटेल आणि त्यातून पनीर वेगळे व्हायला लागेल. त्यातील पाणी आणि पनीर वेगळे करण्यासाठी साठी ते गाळणी/ स्वच्छ कापडाच्या मदतीने गाळून घ्या. आपण लिंबाचा रस वापरल्याने पनीर ला आंबटपणा येऊ शकतो म्हणून थोड पाणी टाकून पनीर गाळून घ्या.आणू कापडामध्ये बांधून त्यावर थोड वजन ठेवून अर्धा तास ठेवा यामुळे पनीर मधील पाणी चांगल्याप्रकारे निघेल. हे पनीर तुम्ही डेझर्ट बनविण्यासाठी देखील वापरू शकता. घरी बनवलेले पनीर असल्याने भाजी बनविताना ते पनीर विरघळू शकते यासाठी भाजीमध्ये टाकण्यासाठी पनीर हवा असेल तर पनीरमधील पाणी चांगले निघण्यासाठी किमान अर्धा तास चांगले वजन ठेवा आणि मग त्याचे तुकडे करा. आणि भाजी मध्ये वापरा.
Palak Paneer Recipe साहित्य:
- २ जुडी पालक
- १ वाटी किसलेला कांदा
- १ टेबल स्पून फ्रेश क्रीम (नसल्यास दुधाची साय वापरू शकता)
- १ वाटी टोमॅटो पेस्ट
- १/२ टेबल स्पून जिरे
- १/२ टेबल स्पून हळद
- १ टेबल स्पून लाल मिरची पावडर
- १ टेबल स्पून पालक पनीर मसाला
- १ टेबल स्पून तूप / तेल
- १ टेबल स्पून आल – लसून पेस्ट
- आवश्यकतेनुसार मीठ
- आवश्यकतेनुसार हिरव्या मिरच्या
- २५० ग्रॅम पनीर
- आवश्यकतेनुसार पाणी
Palak Paneer Recipe कृती
पालकच्या जुडी निवडून स्वच्छ धुवून नंतर ५-७ मिनिट शिजवून घ्या. आणि लगेच थंड करून घ्या म्हणजे त्याचा रंग हिरवा गार राहील, उकळलेले पाणी फेकु नका सदर पाण्यात पोष्टिक घटक असतात. २ हिरव्या मिरच्या व पालक मिक्सर मध्ये पेस्ट करून घ्या.
पनीर चे तुकडे करून घ्या.
एका भांड्यात थोड तूप/तेल, अर्धा चमचा जिरे, बारीक चिरलेला कांदा लसून घालून लालसर होईपर्यंत परतून घ्या.
त्या मिश्रणात टोमॅटो पेस्ट घालून सर्व मिश्रण मंद आचेवर ४-५ मिनिटे परतून घ्या. त्यानंतर मीठ, मिरची पावडर, आल – लसून पेस्ट घालून ३-४ मिनिटे शिजवून घ्या.
त्यामध्ये पालकची पेस्ट घालून सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून त्यात थोड पाणी घालून ३-४ मिनिटे शिजवून घ्या.
आता त्यात पनीरचे तुकडे घालून दोन मिनिटे शिजवून घ्या, हॉटेल सारखी पालक पनीर भाजी तयार आहे, भाजी सर्व्ह करण्याआधी त्यामध्ये फ्रेश क्रीम घाला. ही भाजी तुम्ही नान, भाकरी, चपाती, जीरा राईस सोबत सर्व्ह करू शकता.
Best Rice Flour Ghavan Recipes
Join our Whats app Group Click Here