Yamaha Aerox Alpha : यामाहा ने अलीकडेच त्यांची प्रसिद्ध अशी सिरीज Aerox चे नवीन व्हर्जन Alpha हे इंडोनेशियामध्ये लॉन्च केले या नवीन स्टायलिश डिझाईन आणि आधुनिक फीचर्स सह लॉन्च झालेल्या या स्कूटरमध्ये दमदार परफॉर्मन्स सह आधुनिक टेक्नॉलॉजी ची जोड मिळणार आहे चला तर जाणून घेऊया स्कूटर बाबत संपूर्ण माहिती.
Yamaha Aerox Alpha नवीन स्पोर्टी डिझाईन
यामाहा ने या नवीन Aerox अल्फा मध्ये कॉस्मेटिक बदल करत पहिल्यापेक्षा अधिक शार्प आणि आकर्षक लूक ऑफर केला आहे. समोरील बाजूला प्रोजेक्टर हेडलाइट्स चांगल्या प्रकाशासह एक स्पोर्टी लूक प्रदान करतात. यामध्ये एलईडी डी. आर. एल., इंटिग्रेटेड टर्न सिग्नल जे या स्कूटरला उत्तम बनवतात. ही मॅक्सी स्कूटर ब्लॅक, रेड, ब्ल्यू आणि सिल्वर येलो या रंगांमध्ये उपलब्ध आहे.
अत्याधुनिक फीचर्स
Yamaha Aerox Alpha मध्ये अनेक आधुनिक फीचर्स ऑफर करण्यात आले आहेत यामध्ये कलर टीएफटी स्क्रीन ऑफर करण्यात आली आहे जी रायडींग च्या दरम्यान अनेक माहिती दर्शवते, यासह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देण्यात आले आहे ज्या मार्फत तुम्ही स्मार्टफोन कनेक्ट करून टर्न बाय टर्न नेव्हिगेशन वापरू शकता. याशिवाय कॉलिंग एसएमएस याचे देखील नोटिफिकेशन देते. याव्यतिरिक्त या स्कूटरमध्ये मल्टिपल रायडिंग मोड, ट्रॅक्शन कंट्रोल, इमर्जन्सी स्टार्ट स्टॉप सिग्नल इत्यादी आधुनिक फीचर्स ऑफर करण्यात आले आहेत.
Yamaha Aerox Alpha चे स्टॅंडर्ड, सायबर सिटी, टर्बो, टर्बो अल्टिमेट असं चार व्हेरिएंट लॉन्च करण्यात आले आहेत.
इंजिन
ही स्कूटर परफॉर्मन्स च्या बाबतीत देखील चांगले प्रदर्शन करते, यामध्ये येणारे १५५ सीसी चे सिंगल सिलेंडर लिक्विड कुल्ड इंजिन १५ बी एच पी पॉवर आणि १४ एन एम टॉर्क जनरेट करते. यामध्ये खास गोष्ट ही आहे की यामध्ये नवीन असे इलेक्ट्रिक CVT ट्रान्समिशन जोडलेले आहे. ज्यामुळे इंजिन अधिक स्मूथ आणि रिस्पॉन्सिव्ह आहे.
सुरक्षितता
परफॉर्मन्स सोबतच यामाहा ने सुरक्षिततेला महत्व देऊन त्यामध्ये ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम ऑफर केली आहे जी खराब रस्त्यांवर देखील चांगला परफॉर्मन्स देते यामुळे रायडिंग करताना चांगली ग्रीप आणि उत्तम कंट्रोल मिळतो.
हे देखील वाचा – Suzuki Access 125
इंजिन | १५५ सी सी सिंगल सिलेंडर लिक्विड कुल्ड | |
पॉवर | १५ बीएचपी @ ८००० आर पी एम | |
टॉर्क | १४ एन एम @ ८००० आर पी एम | |
सुरक्षा | डिस्क ब्रेक, एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल इ. | |
फीचर्स | ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कलर टीएफटी डिस्प्ले, मल्टिपल रायटिंग मोड्स, एल इ डी आर एल, | |
व्हेरियंट | स्टॅंडर्ड, सायबर सिटी, टर्बो, टर्बो अल्टिमेट |
Yamaha Aerox Alpha लॉन्च
सद्यस्थितीत यामाहा ने ही दमदार स्कूटर इंडोनेशिया मध्ये लॉन्च केली आहे, आशा आहे की ही स्कूटर पुढील वर्षभरात भारतीय बाजारात यामाहा लॉन्च करू शकते. भारतीय बाजारात ही प्रीमियम स्कूटर लॉन्च केल्यास याची किंमत १.५०-२.०० लाखांपर्यंत असण्याची शक्यता. भारतीय बाजारात ही स्कूटर लॉन्च झाल्यास यामध्ये दिलेले फीचर्स यामुळे ती भारतीयांच्या नक्कीच पसंतीस उतरेल.
हे देखील वाचा – मारुती सुझुकी ई-व्हिटारा | Ather Rizta Marathi info