Maruti Suzuki e Vitara info in Marathi : भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा ट्रेंड वाढत असताना मारुती सुझुकीने देखील या क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. “मारुती सुझुकी ई-व्हिटारा” या त्यांच्या नवीन इलेक्ट्रिक SUV बद्दल चर्चा सुरू आहे. आधुनिक तंत्रज्ञानासह सज्ज असलेली आणि पर्यावरणास अनुकूल अशी ही गाडी या लेखात आपण या गाडीच्या सर्व वैशिष्ट्यांची, तंत्रज्ञानाची आणि लॉन्चिंग ची सविस्तर माहिती घेऊया.
मारुती सुझुकी e Vitara एक स्टायलिश आणि आकर्षक SUV आहे. तिचे डिझाईन आधुनिक आणि स्मार्ट आहे जी ग्राहकांना आकर्षित करेल. पुढील भागात LED हेडलाइट्स, DRLs, आणि अग्रेसिव्ह फ्रंट ग्रिल आहे. बाजूच्या आणि मागील भागात मस्क्युलर डिझाईन असून, आकर्षक टेललाइट्स आणि शार्प कट्स दिसतात.
Maruti Suzuki e Vitara info in Marathi बॅटरी आणि चार्जिंग
मारुती सुझुकी ई-व्हिटारा ही पूर्णतः इलेक्ट्रिक SUV आहे. यात एक दमदार इलेक्ट्रिक मोटर सुझुकी ऑफर करू शकते, बॅटरीची क्षमता सुमारे ५० किलोवॅट- ज्यामुळे गाडी सिंगल चार्जवर ३०० ते ४०० किमी अंतर पार करू शकते.
यात फास्ट चार्जिंग फीचर मुळे तुम्ही सुमारे १ तासात ८०% बॅटरी चार्ज करू शकता. सामान्य चार्जरने चार्ज करण्यास साधारणतः ६ ते ८ तास लागतात.
ई-व्हिटारा बॅटरीच्या बाबतीत अधिक कार्यक्षम आहे. यात उच्च दर्जाची लिथियम-आयन बॅटरी असून ती दीर्घकालीन आहे. तसेच ही बॅटरी वेगाने चार्ज होण्यासोबतच दीर्घकाळ टिकते. मारुती सुझुकीने फास्ट चार्जिंगचा पर्याय दिला असून तुम्ही फक्त ३०-४० मिनिटांत बॅटरी ८०% चार्ज करू शकता. व्हिटारामध्ये विविध ड्रायव्हिंग मोड्स सुझुकी ऑफर करू शकते, जसे की इको मोड, नॉर्मल मोड, आणि स्पोर्ट मोड. या मोड्समुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार गाडीचा परफॉर्मन्स वाढवू किंवा बचत करू शकता.
हे देखील वाचा- आकर्षक लुक आणि ५ स्टार सेफ्टी सह लॉन्च झाली सुझुकी डिझायर
किंमत आणि लॉन्च डेट
मारुती Suzuki e VItara भारतीय बाजारात २०२४ च्या अखेरीस लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. सध्या याची किंमत घोषित केलेली नाही.
Maruti Suzuki e Vitara info in Marathi मारुती सुझुकी ई-व्हिटारा ही एक स्मार्ट, आरामदायी, आणि सुरक्षित SUV आहे. त्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, कनेक्टिव्हिटी, आणि आकर्षक डिझाईन यामुळे ती ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय बनू शकते, या एसयूव्हीची स्पर्धा ही थेट टाटा कर्व्ह ईव्ही, टाटा नेक्सॉन ईव्ही, महिंद्रा एक्स यु व्ही ४००, एमजी झेड एस ईव्ही यांच्याशी असेल.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.