Ladki Bahin Yojana 2024 info in Marathi : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना 2024 भारताच्या सर्वांगीण विकासात विकासात मुलींचा / महिलांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. शासन देखील महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि मुलींच्या उज्वल भविष्यासाठी अनेक महत्त्वकांक्षी योजना राबवीत असते, यामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार विविध योजना महिलांसाठी राबवतात त्यापैकी राज्याचे उपमुख्यमंत्री/ अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी महाराष्ट्रा मध्ये घोषणा केलेली एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे “मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना २०२४ “होय. राज्य शासनाने ७ मार्च रोजी महाराष्ट्र राज्यासाठी ४ थे महिला धोरणही जाहीर केले, यानुसार महिलांना आणि मुलींना सामाजिक प्रशासकीय राजकीय क्षेत्रामध्ये समान दर्जा आणि हक्क प्राप्त करून देण्यासाठी – पोषण आहार, स्वास्थ्य, शिक्षण, उद्योजकता आणि कौशल्य विकास रोजगार यासाठी विविध योजना महिलांसाठी सुरू आहेत, आणि यामध्ये आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना २०२४ या योजनेची भर पडली आहे.
Ladki Bahin Yojana 2024 info in Marathi – योजनेचा उद्देश
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना २०२४ या योजनेअंतर्गत वय वर्ष २१ ते ६५ या वयोगटातील महिलांना दरमहा १५०० रुपये सरकारमार्फत देण्यात येणार आहोत, साधारणतः १ ते ३ कोटी महिलांना याचा लाभ होणार आहे या योजनेची अंमलबजावणी ही जुलै पासून केली जाणार आहे ऑगस्ट महिन्यापर्यंत फॉर्म स्वीकारले जाणार आहेत, यासाठी सरकारवर ४५ हजार कोटी चा भार पडणार आहे, मुलींचे सशक्तीकरण करणे हा मुख्य उद्देश आहे.
Ladki Bahin Yojana 2024 info in Marathi – लाभार्थी
ही योजना महिला / मुलींना विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील महिला / मुलींना लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील महिला / मुलींना या योजनेचा सर्वाधिक फायदा होईल. वय वर्ष २१ ते ६५ या वयोगटातील महिलांना याचा लाभ घेता येणार आहे.
शैक्षणिक लाभ
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत मुलींना शैक्षणिक लाभ मिळवता येतील. योजनेच्या माध्यमातून मुलींच्या शाळेतील शिक्षणाचा खर्च उचलला जाईल. या योजनेमुळे मुलींच्या शिक्षणात सततता राहील आणि शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
आरोग्यविषयक लाभ
Ladki Bahin Yojana 2024 info in Marathi मुलींच्या आरोग्याची काळजी घेणे हेही या योजनेचे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आहे. योजनेअंतर्गत मुलींना मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार मिळेल. त्यांच्या पोषणाची काळजी घेण्यासाठी पोषण आहार दिला जाईल. यामुळे मुलींचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारेल.
सुरक्षिततेची हमी
मुलींच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठीही ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी मुलींच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करण्यात येतील. मुलींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, सुरक्षारक्षक नियुक्त करणे आदी उपाययोजना करण्यात येतील.
आर्थिक सहाय्य
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत मुलींच्या शिक्षणाच्या खर्चाशिवाय आर्थिक सहाय्यही दिले जाईल. गरीब आणि गरजू मुलींना शिष्यवृत्ती आणि अन्य आर्थिक सहाय्य दिले जाईल. यामुळे मुलींच्या आर्थिक अडचणी कमी होतील आणि शिक्षणात प्रगती साधता येईल.
प्रधानमंत्री मुद्रा योजना २०२४
अर्ज प्रक्रिया
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नारीशक्ती या ॲपवर मोबाईल द्वारे मुलींना ऑनलाइन अर्ज करावा लागेल. या ॲपवर योजनेची संपूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया उपलब्ध असेल. अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील. अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला एका रजिस्ट्रेशन नंबर मिळेल. ऑनलाइन अर्ज प्रमाणे ऑफलाईन देखील अर्जाची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे दुर्गम भागातील महिलांना आता ऑफलाइन देखील अर्ज भरता येणार आहे आणि याची मुदत देखील ३१ ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली आहे.
अर्ज भरण्याची सुविधा : अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, ग्रामपंचायत व महापालिकेचे वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्र व महा- इ- सेवा केंद्रे येथे पात्र महिलांना योजनेचा अर्ज भरता येणार आहे. पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाइन मोबाईल द्वारे नारीशक्ती दूत या अँड्रॉइड ॲप वर अर्ज करता येईल. ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज सादर करता येत नसेल, त्याच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात/बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, ग्रामपंचायत/ वॉर्ड/ सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील. भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात / बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, सेतू सुविधा केंद्रांमध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाइन प्रविष्ट केला जाईल. अर्ज भरण्याची प्रक्रिया विनामूल्य राहील, असे आदेशात शासन निर्णयात नमूद आहे.
लाडकी बहीण योजना २०२४ – आवश्यक कागदपत्रे
- लाभार्थ्यांचे आधार कार्ड.
- महाराष्ट्र – अधिवास प्रमाणपत्र / जन्म दाखला.
- कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाखापर्यंत).
- बैंक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
- पासपोर्ट आकाराचा फोटो.
- रेशनकार्ड.
- अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
नारीशक्ती दूत ॲप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Ladki Bahin Yojana 2024 info in Marathi फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट केल्याचा मेसेज येईल.
पुढील काही दिवसांमध्ये तुमचा अर्ज मंजूर झाल्याचा मेसेज येईल, किवा काही त्रुटी असल्यास ते तुम्ही नारीशक्ती दूत ॲप मार्फत बदल करून पुन्हा अपडेट करू शकता.
असेच नवनवीन योजनांचे अपडेट मिळवण्यासाठी कोकण कल्चर ला नक्की फॉलो करा तसेच सदर Ladki Bahin Yojana 2024 info in Marathi लेख कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा.
हे देखील वाचा
महा-ई-सेवा केंद्र रजिस्ट्रेशन २०२४
प्रधानमंत्री सूर्योदय योजना २०२४
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना
कुक्कुट पालन कर्ज योजना २०२३ – अर्ज, सबसिडी, कागदपत्रे संपूर्ण माहिती.