Willow Quantum Computing chip : तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये गुगलने केलेली प्रगती आपण पाहतच आहोत. गुगल मॅपअजून एक विक्रम केला आहे नवीन विलो कॉन्टम कॉम्प्युटिंग चीप सुपर कम्प्युटरला देखील मागे टाकले आहे. Willow ही गुगलची नवीन अत्याधुनिक कम्प्युटिंग चीप आहे. गुगलने दावा केला आहे की एका सर्वात वेगवान सुपर कम्प्युटरला जी गणना करण्यासाठी १० सेप्टिलियन वर्ष लागतात तेच काम या नवीन चीप द्वारे अवघ्या पाच मिनिटात करता येते.
Willow Quantum Computing chip
ही चीप क्वांटम हार्डवेअरसाठी वरदान ठरणार आहे. व्यावसायिक दृष्ट्या कॉन्टम संगणक विकसित करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. सध्या गुगलचे कॉन्टम संगणक विलोसह सुपर कंडक्टींग ट्रान्समाॅन क्युबिट द्वारे चालतात.
विलो चीप मध्ये काय आहे खास
विलो चिप मध्ये अत्याधुनिक क्युबिक कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम करण्यात आली आहे. ज्या द्वारे अधिक गुंतागुंतीची जटिल कॉंटम गणना सुपर कम्प्युटर पेक्षा अधिक सक्षमपणे करते, व त्यातील त्रुटी कमी करण्यास मदत करते.
सुपर कम्प्युटरलाही टाकले मागे
सुपर कम्प्युटर पेक्षा अधिक सक्षमपणे काम करण्यास ही चीप पात्र ठरली आहे. गुगलने केलेल्या बेंचमार्क टास्क “रँडम, सर्किट सॅम्पलिंग” वापरून विलो ची सुपर कम्प्युटर देखील करू शकत नाही अशी चाचणी घेण्यात आली, गुगलच्या म्हणण्यानुसार ही गुंतागुंतीची चाचणी विलो ने उद्या पाच मिनिटांमध्ये केली. हीच चाचणी करण्यासाठी सुपर कम्प्युटरला १० सेप्टिलियन वर्ष इतका कालावधी लागतो.
हे देखील वाचा – स्टारलिंक सॅटॅलाइट इंटरनेट
विलो द्वारे अनेक गोष्टी साध्य करता येऊ शकतात
Willow Quantum Computing chip info in Marathi
विलो चिप हा विकसित केलेले कॉन्टम संगणक हे विविध क्षेत्रात क्रांती घडवू शकतात. जसे आर्टिफिशियल इंटेलिजंट लर्निंग अल्गोरिदम, औषधे आणि उपचारातील आधुनिक तंत्रज्ञान यातील प्रगती साधण्यासाठी, मटेरियल सायन्स, फायनान्शिअल मॉडेलिंग इत्यादी अनेक क्षेत्रांमध्ये लक्षणीय प्रगती साधता येऊ शकते.
हे देखील वाचा – व्हाट्सअप Meta AI फीचर्स चे फायदे.