WhatsApp Meta Ai : माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जग फार वेगाने प्रगती करत आहे. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द बऱ्याचदा आपल्या कानावर पडतो. तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये आता AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ते ने प्रवेश केला आहे.
या तंत्रज्ञानाने सर्व माहितीच्या सीमा ओलांडल्या आहेत, याच्या काही मर्यादा देखील आहेत, हे सुरुवातीच्या टप्प्यात असल्याने यामध्ये वेळेनुसार अजून प्रगती होऊ शकते. जसे Chat GPT आपल्या प्रश्नांची / गणितांची उत्तरे चुटकीसरशी देतात त्याचप्रमाणे एखादी कमांड दिल्यास आपणास हवी असणारी माहिती काही सेकंदात आपणास उपलब्ध करून देते.
WhatsApp Meta Ai नवीन फिचर
नवीन तंत्रज्ञानाचा वापर आपण केला नाही तर जगाच्या शर्यतीत आपण मागे राहू यासाठी अनेक कंपन्या AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आपल्या दैनंदिन कामांमध्ये तसेच ती कामे जलद गतीने करण्यासाठी करत आहेत.
आता व्हाट्सअप मध्ये देखील तुम्हाला Meta Ai हे नवीन फिचर पाहायला मिळाले असेल सदर लेखामध्ये आपण या टूल बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊ.
फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम या जगप्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची मालकी असलेल्या मेटा कंपनीने आपल्या या सोशल मीडिया ॲप मध्ये Meta Ai हे नवीन फीचर दिले आहे. ह्या फीचर्स चा वापर करून तुम्ही तुम्हाला हवी असणारी माहिती एका सेकंदामध्ये मिळू शकता.
हि कंपनी आता जगाच्या पाठीवर कुठेही टॉवर विना इंटरनेट सेवा पुरवणार.
ज्या लोकांनी व्हाट्सअप प्ले स्टोर वरून अपडेट केले आहे त्यांना हे फीचर्स उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे नवीन फिचर चॅट जीपीटीप्रमाणेच कार्यकर्ते याच्या मदतीने तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकता.
WhatsApp Meta Ai
भारतात Meta Ai येण्याआधी जगभरातील अनेक देशांमध्ये अनेक देशांमध्ये हे हे फीचर उपलब्ध करून देण्यात आले होते यामध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, नायजेरिया, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, युगांडा, पाकिस्तान, झांबिया इत्यादी. भारतात देखील हे फीचर्स आता प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आले आहे. Meta Ai चा उपयोग अनेक गोष्टी शिकण्यासाठी करता येतो.
सध्या व्हाट्सअप उघडल्यानंतर उजव्या कोपऱ्यात निळसर जांभळ्या रंगाचे वर्तुळ दिसत आहे हे वर्तुळ म्हणजेच नव्याने लॉन्च केलेले Meta Ai फीचर आहे. या फिचर वरती केल्यानंतर चाट चा ऑप्शन उघडतो, ज्याप्रमाणे आपण एखाद्या व्यक्तीला मेसेज करतो त्याचप्रमाणे तुम्ही Meta Ai तुला प्रश्न विचारू शकता. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना रिस्पॉन्स करत Meta Ai तुमच्या प्रश्नांची उत्तरे देते. खेळ, मनोरंजन, वर्तमान घडामोडी याविषयी काही विचारल्यास Meta Ai आपणास ती माहिती काही सेकंदात प्रदान करते.
या वेबसाईटवर खरेदी करा इतर ई-कॉमर्स कंपन्यांपेक्षा कमी किमतीत.
WhatsApp Meta Ai च्या मदतीने फोटो बनवा.
तुम्हाला जसा फोटो हवा असेल त्या पद्धतीने Meta Ai ला Prompt दिल्यास तुम्हाला हवा असलेला फोटो तुम्ही दिलेल्या कमांडनुसार Meta Ai तुमच्यासमोर काही सेकंदात बनवून देते.
असेच नवनवीन टेक्नॉलॉजी चे अपडेट जाणून घेण्यासाठी कोकण कल्चर ला नक्की फॉलो करा तसेच सदर WhatsApp Meta Ai लेख कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा.