Suzuki Access 125 info in Marathi : भारतीय दुचाकी बाजारपेठेमध्ये अनेक कंपन्या आपल्या एका पेक्षा एक दर्जेदार स्कूटर ची विक्री करतात. त्यामध्ये प्रामुख्याने बजाज, हिरो, सुझुकी, होंडा, टीव्हीएस, रॉयल एनफिल्ड, जावा इत्यादी. यामध्ये सर्वाधिक विक्री होणारी आणि मायलेज देणारी स्कूटर सुझुकी एक्सेस १२५ हे नाव प्रामुख्याने घेतले जाते, भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या १२५ सीसी स्कूटरमधील हे एक आहे. दमदार मायलेज, आधुनिक टेक्नॉलॉजी आणि आरामदायी राइड यासाठी प्रसिद्ध असलेली Suzuki Access 125 या स्कूटर बद्दल संपूर्ण माहिती सदर लेखांमध्ये जाणून घेऊ.
Suzuki Access 125 info in Marathi
डिझाइन आणि बिल्ड क्वालिटी
सुजुकी एक्सेस १२५ याची डिझाईन ही क्लासिक आणि मॉडर्न या दोघांचाही संगम या स्कूटरमध्ये पाहायला मिळतो. समोरील भागात एलईडी हेड लॅम्प हॅलो इंडिकेटर क्रोम फिनिशिंग सह येतात. डिजिटल तसेच अनलॉक स्पीडोमीटर ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी इत्यादी फीचर्स यामध्ये ऑफर करण्यात आले आहेत. बिल्ड क्वालिटी उत्तम असून फिट अँड फिनिश तसेच फायबरची कॉलिटी देखील उत्तम आहे.
इंजिन स्पेसिफिकेशन
Suzuki Access 125 मध्ये १२४ सी सी चे ४ स्ट्रोक सिंगल सिलेंडर एअर कुल्ड इंजिन असून ८.७ पॉवर, १० एन एम टॉर्क जनरेट करते, हे शक्तिशाली इंजिन ४५ के एम पी एल मायलेज देण्यास सक्षम आहे. सदर इंजिन हे बी एस ६ नॉर्मस नुसार विकसित करण्यात आले आहे.
परफॉर्मन्स
सुझुकी एक्सेस १२५ ही परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते, शहरातील ट्राफिक तसेच लॉन्ग रूट वर चांगला अनुभव प्रदान करते, तसेच CVT ट्रान्समिशन मुळे चांगला रायडिंग एक्सपिरीयन्स मिळतो.
वैशिष्ट्ये
सस्पेंशन – पुढे टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागे स्विंग आर्म सस्पेंशन दिले आहे, ज्यामुळे खराब रस्त्यावरसुद्धा आरामदायी प्रवास होतो.
प्रशस्त सीट आणि कुशन मुळे लांब प्रवास सोयीचा होतो. तसेच २१.८ लिटरचा अंडरसीट स्टोरेज दिला आहे, जो हेल्मेट / इतर वस्तू ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतो.
यूएसबी चार्जिंग पोर्ट – प्रवासादरम्यान मोबाइल चार्जिंगसाठी यामध्ये यूएसबी पोर्ट दिला आहे.
कॉम्बी ब्रेक सिस्टीम (CBS) पुढील आणि मागील ब्रेक्सला एकत्र जोडते, ज्यामुळे ब्रेक लावतानाचा धोका कमी होतो.
ड्रम/डिस्क ब्रेक्स यामध्ये ड्रम ब्रेक्सची बेसिक व्हेरियंट आणि डिस्क ब्रेक्सची प्रीमियम व्हेरियंट उपलब्ध आहेत.
ट्यूबलेस टायर्स – टायर पंक्चर झाल्यास वाहन अधिक वेळ नियंत्रित करता येते.
एलईडी हेड लाइट्स – रात्रीच्या वेळी अधिक चांगली दृश्यता मिळते.
ही स्कूटर पर्ल डीप ब्लू, मेटॅलिक मॅट प्लॅटिनम सिल्व्हर, पर्ल मिराज व्हाईट, ग्लास स्पार्कल ब्लॅक आणि मेटॅलिक मॅट फायब्रॉन ग्रे सारख्या पाच कलर पर्याय उपलब्ध आहेत.
किंमत
बेस मॉडेलची किंमत सुमारे ₹80,000 (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. प्रीमियम मॉडेलची किंमत ₹90,000 (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.
सुझुकी एक्सेस १२५ ची स्पर्धा मुख्यतः होंडा ॲक्टिवा १२५, टीव्हीएस जुपिटर १२५, आणि यामाहा फॅसिनो १२५ यांसारख्या स्कूटरसोबत आहे.
हे देखील वाचा – Ather Rizta info in Marathi