Arkade Developers IPO details : गणेशोत्सवाच्या धामधुमीत शेअर मार्केटमध्ये आयपीओ ची रेलचेल पाहायला मिळत आहे. शेअर मार्केटमध्ये 16 सप्टेंबर पासून 19 सप्टेंबर पर्यंत आर्केड डेव्हलपर्स लिमिटेड तसेच नॉर्दन अर्क कॅपिटल लिमिटेड हे दोन आयपीओ खुले करण्यात आले आहेत. या दोन कंपन्या 24 सप्टेंबर रोजी NSE आणि BSE वर लिस्टेड होतील.
Arkade Developers IPO details
Arkade Developers IPO details : मार्केट डेव्हलपर्स लिमिटेड ही एक रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी असून प्रामुख्याने महाराष्ट्रात तसेच देशभरात अत्याधुनिक जीवनशैली ने सुसज्ज असे निवासी घरे यांच्या विकासात गुंतलेली आहे. 31 जुलै 2023 पर्यंत Arkade Developers यांनी 18 लाख चौरस फुटांपेक्षा अधिक घरे बांधले आहेत इतर कंपन्यांच्या सहाय्याने तयार झालेले प्रकल्प देखील यामध्ये समाविष्ट आहेत.
आयपीओ म्हणजे काय?
एखादी कंपनी प्रथमच आपले शेअर्स सर्वसामान्यांसाठी जारी करत असते त्यास इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) असे म्हणतात, व्यवसायासाठी लागणारे भांडवल उभे करण्यासाठी पैशांची गरज असल्याने अशा स्थितीत बँकांकडून कर्ज घेण्याऐवजी कंपनीचे काही शेअर्स लोकांना विकून किंवा नवीन शेअर इश्यू करून त्यापासून भांडवल उभारणी केली जाते. यासाठी एखादी कंपनी आपला आयपीओ बाजारात आणत असते.
Arkade Developers IPO मार्फत 410 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे. Arkade Developers ltd 410 कोटी रुपयांचे 32,031,250 इतके फ्रेश शेअर्स इश्यू करणार आहे. कंपनीचे गुंतवणूकदार ऑफर फॉर सेल द्वारे शेअर विक्री करणार नाहीत. Arkade Developers IPO details गुंतवणूकदार जास्तीत जास्त 1540 शेअर्स साठी बोली लावू शकतात या इश्यू केलेल्या शेअर्सची किंमत 121-128 इतकी निश्चित करण्यात आली आहे. सामान्य गुंतवणूकदार किमान एक लॉट म्हणजेच 110 शेअर्स साठी बोली लावू शकतात. एका लॉट साठी अर्ज केल्यास तुम्हाला 14080 रुपयाची गुंतवणूक करावी लागेल.
तसेच जास्तीत जास्त शेअर म्हणजे 14 लॉट – 1540 शेअर साठी अर्ज करू शकता यासाठी प्राईज नुसार 197120/-रुपये इतकी गुंतवणूक करावी लागेल.
या कंपनीच्या आयपीओ मधील किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के हिस्सा राखीव ठेवून 75 टक्के हा संस्थात्मक खरेदीदारांसाठी आरक्षित केला आहे.