Tata Magic Bi fuel 9 seater van : भारतीय बाजारपेठेमध्ये टाटा मोटर्स आपल्या प्रीमियम कार विक्री करते त्याप्रमाणे हेवी व्हेईकल, कमर्शियल व्हेईकल यांची देखील विक्री करते अलीकडेच एका एक्सपो मध्ये टाटा मॅजिक बायफ्युल ही 9 सीटर वॅन प्रदर्शनास ठेवली होती. या कारमध्ये नऊ व्यक्ती बसतील अशी पुरेशी ऐसपैस जागा असून ही व्हॅन सीएनजी प्लस पेट्रोल इंधनावर चालण्यास सक्षम आहे.

Tata Magic ही अगोदर देखील भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात आली होती आता त्याचे अपडेट वर्जन सीएनजी इंधनासह लॉन्च करण्यात आले आहे. या गाडीला भारतातील खेड्यापाड्यांमध्ये तसेच शहरांमध्ये देखील पब्लिक ट्रान्सपोर्ट साठी वापरली जाते.
Tata Magic Bi fuel 9 seater van

४ लाखांपेक्षा जास्त आनंदी ग्राहकांनंतर आता या नवीन अपडेटेड व्हेरियंटमध्ये सीएनजी प्लस पेट्रोल पर्याय दिल्याने या गाडीची रनिंग कॉस्ट देखील कमी झाली आहे. सदर व्हॅन ही दिसायला पहिल्यासारखीच असून यामध्ये फारसे असे कॉस्मेटिक चेंज करण्यात आलेले नाहीत, परंतु यामध्ये अधिक चांगले फीचर्स ऑफर करण्यात आले आहेत.

9+1 पॅसेंजर कॅपॅसिटी असलेली ही व्हॅन 694 सीसी पॉवर असलेले 5 स्पीड एम पी एफ आय इंजिन मिळते जे पुरेशी पॉवर प्रोडूस करते. सीएनजी प्लस पेट्रोल 60 लिटर सीएनजी टॅंक आणि 5 लिटर पेट्रोल टॅंक मिळून ही व्हॅन 380-400 किलोमीटर ड्रायव्हिंग रेंज देण्यास सक्षम आहे. तसेच यामध्ये टाटा मोटर्स या व्हॅनवर दोन वर्ष किंवा 72 हजार किलोमीटर वॉरंटी प्रदान करते. 13 इंच व्हील कंपनी ऑफर करते त्यामुळे पुरेसा ग्राउंड क्लिअरन्स देखील मिळतो. इतर फीचर्स मध्ये इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, फ्यूल ईको स्विच, गिअर शिफ्ट ॲडव्हायझर, कमी मेंटेनन्स खर्च
टाटा मोटर्सची ही बायफ्यूल व्हॅन स्टुडन्ट ट्रान्सपोर्टेशन, पब्लिक ट्रान्सपोर्टेशन यासह मल्टिपल कामांसाठी शहरी भागात भागात तसेच खेड्यांमध्ये देखील वापरली जाते. अनेक लोक या बायफ्यूल व्हॅन ची प्रतीक्षा करत होते त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. जे मुळात टाटा एस TATA Ace मिनी ट्रकचे पॅसेंजर व्हेरिएंट आहे जे प्रवाशांना ने आण करण्यासाठी डिझाईन करण्यात आलेले आहे. त्याचा मायलेज देखील चांगला असून ही एक दमदार व्हॅन आहे. जे दहा प्रवासी वाहून नेण्यास सक्षम आहे याची मजबूत स्टील केबिन प्रवाशांना चांगली सुरक्षितता प्रदान करते.
सदर व्हॅनची किंमत 7.84 लाख एक्स शोरूम इतकी आहे. Tata Magic Bi fuel 9 seater van च्या अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या टाटा मोटर्स डीलरशिप कडे संपर्क करू शकता.