Starlink satelite Internet in India : एलॉन मस्क यांची अमेरिकन कंपनी टेस्ला जशी जगप्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे स्पेस एक्स देखील अंतराळ प्रवास घडवणारी कंपनी आणि आता स्टारलिंक सॅटॅलाइट इंटरनेट द्वारे तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये आधुनिक क्रांती घडवत आहेत.
Elon Musk यांची स्टारलिंक कंपनी आता जगाच्या पाठीवर कुठेही टॉवर विना इंटरनेट सेवा पुरवण्यात सक्षम आहे. आणि याद्वारे आता जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात हाई स्पीड इंटरनेट वापरता येणार आहे.
Starlink satelite Internet in India
स्टारलिंक मिनी लॉन्च नंतर आपल्याला मोबाईल नेटवर्क वर अवलंबून राहण्याची गरज नाही हया मिनी सॅटॅलाइट इंटरनेट मुळे आपल्याला अगदी कुठल्याही कानाकोपऱ्यात फुल स्पीड इंटरनेटचा वापर करता येणार आहे अगदी समुद्रात आणि विमानात प्रवासादरम्यान देखील इंटरनेट ब्राउझिंग, लाईव्ह स्ट्रीमिंगचा लाभ घेऊ शकता.
हा Starlink किटची किंमत भारतीय रुपयांमध्ये ५०,०००/- रुपये इतकी आहे. यामध्ये आकाराने लहान सॅटॅलाइट डिश, राऊटर आणि इतर ॲक्सेसरीज मिळतील. या उपकरणाद्वारे १०० एमबीपीएस इंटरनेट स्पीड मिळतो.
भारतात देखील स्टारलिंक द्वारे इंटरनेट सुविधा लवकरच उपलब्ध होईल, Space X कंपनीला भारताच्या टेलिकॉम मिनिस्ट्रीने स्टारलिंक द्वारे इंटरनेट सुविधा पुरविण्यास परवानगी दिली असून लवकरच संपूर्ण भारतभर ही सुविधा भारतीयांच्या सेवेत दाखल होईल.
या सेवेमुळे अगदी खेड्यापाड्यात देखील जिथे आज साधं मोबाईल नेटवर्क मिळत नाही, अशा ठिकाणी देखील फुल स्पीडने इंटरनेट सेवा दिली जाईल. यामुळे संपूर्ण भारतातील गावे देखील शहरांसोबत तसेच जगासोबत अगदी चांगल्या प्रकारे जोडली जातील.
असेच नवनवीन टेक्नॉलॉजी चे अपडेट मिळवण्यासाठी कोकण कल्चर ला नक्की फॉलो करा तसेच सदर Starlink satelite Internet in India लेख कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा.
Pingback: WhatsApp Meta Ai द्वारे मिळवा तुमच्या प्रश्नांची उत्तरे