Redmi 13C 5G : शाओमी ने भारतातच त्यांचे फोन बनवण्याचा निर्णय घेतल्याने आता शाओमी/रेडमी या कंपन्यांचे फोन भारतातच असेंबल होतात. त्यामुळे त्यांच्या किमतीत कमालीची सूट मिळत आहे. याचा परिणाम मार्केट मधील इतर कंपन्यांवर होताना दिसत आहे. मोबाईल विक्री मधील इतर कंपन्यांचा वाटा कमी होत आहे. अँड्रॉइड फोन्स मध्ये अनेक दर्जेदार फीचर्स ऑफर करत किंमत कमी ठेवून इतर कंपन्यांना शाओमी ने आव्हान दिले आहे. रेडमी कंपनीने भारतीय बाजारपेठेत एक नवीन स्मार्टफोन Redmi 13C 5G अलीकडेच लॉन्च केलं आहे, या लेखामध्ये आपण रेडमी च्या Redmi 13C 5G या नवीन स्मार्टफोनचे फीचर्स आणि किमत आणि इतर बाबी जाणून घेऊ.
Redmi 13C 5G – फिचर्स
Redmi 13C 5G : हा स्मार्टफोन भारतात लॉन्च करून रेडमीने आपली सिरीज 13 ही पुढे सुरू ठेवून रेडमी ने 13 सिरीजचा 5G कनेक्टिव्हिटी असलेला हा नवीन स्मार्टफोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. यामध्ये ८ जीबी रॅम सह २५६ जीबी स्टोरेज सह सात 5G Band देण्यात आले आहेत. या सिरीज चे दोन Redmi 13C 4G आणि Redmi 13C 5G स्मार्टफोन रेडमी ने भारतभर लॉन्च केले.
Redmi 13C 5G मध्ये तुम्ही मल्टीमीडिया चा चांगला अनुभव घेऊ शकता व्हिडिओज, लाईव्ह स्ट्रीमिंग, गेमिंग इत्यादी मल्टी टास्किंग तुम्ही यावरती करू शकता. या स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट लॉन्च करण्यात आले आहे.
१. Redmi 13C 5G – ४ जीबी RAM १२८ जीबी स्टोरेज
२. Redmi 13C 5G – ६ जीबी RAM १२८ जीबी स्टोरेज
३. Redmi 13C 5G – ८ जीबी RAM २५६ जीबी स्टोरेज
या स्मार्टफोनच्या खरेदीवर अनेक ऑफर्सचा वर्षाव करण्यात आला आहे. सदर स्मार्टफोन स्टारलाईट सिल्वर, स्टारलाईट ग्रीन, स्टारलाईट ब्लॅक या रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Redmi 13C 5G – स्पेसिफिकेशन
Redmi 13C 5G मध्ये 6.67 इंचाचा HD+ LCD डिस्प्ले ऑफर करण्यात आला आहे त्याला वॉटरड्रॉप नॉच डिझाईन १६०० x ७२० Pixel Resolution, 90 हर्ट्झ रिफ्रेश रेट, १८० टच सॅम्पलिंग रेट, ६०० नेट्स ब्राईटनेस, यासह मॉर्निंग गोरिला ग्लास ३चे प्रोटेक्शन मिळते.
हा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेंसिटी ६१००+ Octa Core प्रोसेसर सह येतो, यामध्ये ग्राफिक्स माली जी ५७ एमसी २ जीपीयू जोडीला ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मिळतो तसेच या फोनमध्ये तुम्ही वर्चुअल रॅम फीचर्स च्या मदतीने तुमचा रॅम दुप्पट करू शकता. तसेच हा स्मार्टफोन १ टीबी मायक्रो एसडी कार्ड ला देखील सपोर्ट करतो.
फोटोग्राफीसाठी ५० मेगापिक्सल रियर कॅमेरा एलईडी फ्लॅश प्राइमरी सेंसर येतो याला ड्युअल रियल कॅमेरा देण्यात आला आहे, तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
या मध्ये ५००० mAh पॉवरची दमदार बॅटरी देण्यात आली आहे जी तुम्हाला दिवसभर मल्टी टास्किंग करता कामी येते, चार्जिंग साठी यामध्ये १८W अडाप्टर देण्यात आला आहे.
Redmi 13C 5G फोनमध्ये ७ ५जी बँड्स ऑफर करण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटी साठी ड्युअल सिम, ब्लूटूथ ५.३, वायफाय ५ सह ३.५mm जॅक मिळतो. साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर तसेच फेस अनलॉक असे अनेक फीचर्स मिळतात.
Redmi 13C 5G – किंमत
१. ४ जीबी RAM १२८ जीबी स्टोरेज – १०,९९९/-
२. ६ जीबी RAM १२८ जीबी स्टोरेज – १२,४९९/-
३. ८ जीबी RAM २५६ जीबी स्टोरेज – १४,४९९/-
Redmi 13C 5G More information
ऑफर्स मध्ये वेगवेगळ्या ई-कॉमर्स साइटवर ही किंमत वेगवेगळी असू शकते.
असेच नवनवीन टेक अपडेट जाणून घेण्यासाठी कोकण कल्चर ला नक्की फॉलो करा तसेच सदर लेख कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा.