Bajaj Pulsar NS 400z info in marathi : भारतीय टू व्हीलर मार्केटमध्ये बजाज हे नाव चांगलेच स्थिरस्थावर झाले आहे. बजाजच्या टू व्हीलर या मेंटेनन्सच्या दृष्टीने परवडणाऱ्या आणि दमदार मायलेज ऑफर करणाऱ्या असतात. बजाज त्यांच्या स्ट्रीट फायटर Bajaj Pulsar NS 200 या दमदार बाईकची सक्सेसर म्हणून Bajaj Pulsar NS 400 भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. त्यांच्या माहितीनुसार तसे अपडेट देखील समोर आले आहेत. सदर Bajaj Pulsar NS 400 info in marathi लेखामध्ये आपण NS 400 या बजाजच्या अपकमिंग बाईक बद्दल संपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत.
भारतीय बाजारपेठेत सध्या बजाजच्या Pulsar 125, Platina, Pulsar 150, Pulsar 160, Pulsar 200 या दुचाकी विक्रीमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. तसेच इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये बजाज चेतक ही दुचाकी लॉन्च करून इव्ही सेक्टर मध्ये देखील एन्ट्री केली आहे.
बजाज ने लॉन्च केली NS ची सक्सेसर NS 400z जाणून घ्या किंमत आणि सगळे अपडेट
Bajaj Pulsar NS 400 z info in marathi – लॉन्च
Bajaj Pulsar NS 200 ने 200 सी सी सेगमेंट मध्ये आपला ठसा उमटवल्यानंतर NS 200 ची सक्सेसर म्हणून बजाज 400cc सेगमेंट मध्ये एन एस 400 लॉन्च करणार का अशी चर्चा सुरू झाली होती, पण आता ही प्रतीक्षा संपली असून लवकरच बजाज आपली बहुचर्चित NS 400z ची लॉन्चिंग हे ३ मे रोजी करणार आहे. ती बाईक एन एस 400 असू शकते, असा अंदाज बांधला जात आहे.
इंजिन
Bajaj Pulsar NS 400 z ची प्रत्यक्ष Power आणि इतर फीचर्स लॉन्च दरम्यानच पाहायला मिळतील हे 400cc चे इंजिन किती शक्तिशाली आहे हे कळू शकेल. तसेच Dominar 400 चे इंजिन Bajaj Pulsar NS 400 z मध्ये वापरले जाऊ शकते किंवा या बाईकमध्ये नवीन 399 सीसीचे इंजिन आणू शकते जे Duke 390 मध्ये वापरले आहे.
फीचर्स
400cc च्या बाईकचे फीचर्स, सस्पेन्शन, ब्रेकिंग ही नुकत्याच लॉन्च झालेल्या Pulsar N250 NS 200 शी साधर्म्य असणारे फीचर्स यामध्ये पाहायला मिळतील. तसेच या बाईकमध्ये तीन रायडिंग मोड, ड्युअल्स चॅनेल ए बी एस, टू कनेक्टिव्हिटी, एबीएस ऑन ऑफ पर्याय, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर इ. पाहायला मिळू शकतात.
बजाज ने लॉन्च केली NS ची सक्सेसर NS 400z जाणून घ्या किंमत आणि सगळे अपडेट
यामाहा RX100 लवकरच येणार भारतीय बाजारपेठेत
महिंद्रा थार नवीन अपडेटसह भारतात लॉन्च
असेच नवनवीन ऑटो अपडेट जाणून घेण्यासाठी कोकण कल्चर ला नक्की फॉलो करा तसेच सदर लेख कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा.
Pingback: Bajaj Pulsar N250 info in Marathi भरपूर फीचर्स सह दमदार लुक
Pingback: Yamaha MT 15 v2 मिळेल दमदार लुक सह दमदार मायलेज