Holi wishes in Marathi : होळी….म्हटले की आपणास आठवते ती रंगांची उधळण, गोडधोड पदार्थांची रेलचेल, आणि आनंदी, उत्साही वातावरण. वसंत ऋतूतील रंग आणि प्रेम यांचा हा सण. हिंदू संस्कृतीत होळी या सणाला खूप महत्त्व आहे. हा दिवस म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय होय. प्राचीन हिंदू कालगणने प्रमाणे फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या संध्याकाळी हा सण साजरा होतो. भारतात वेगवेगळ्या प्रदेशात या सणाला वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. होळी, होलिका, होळी पौर्णिमा, होलीकोत्सव अशा वेगवेगळ्या नावाने संबोधतात. कोकणात होळीचा सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. फाल्गुन महिन्यात येणारा शिमगोत्सव हा कोकणात १५ ते २० दिवस चालतो. व प्रथे प्रमाणे होळीच्या दिवशी काही ठिकाणी होम पेटवला जातो, तर काही ठिकाणी सुरमाड, पोफळी, आंबा, अशा वेगवेगळ्या झाडांच्या त्या प्रदेशातील उपलब्धते नुसार होळी तयार केली जाते. त्यानंतर ग्रामदेवतेची पालखी ही घरोघरी नेली जाते. किनारपट्टी शेजारी असणारे कोळी बांधव व कुटुंब आपापल्या होड्यांची पूजा करतात. तळ कोकणामध्ये हा उत्सव मोठ्या धामधुमीत सजरा केला जातो.
होळी संपूर्ण भारत भरात साजरी केली जाते, उत्तर भारतात या सणाची मजा काही औरच असते लोक वृंदावन गोकुळ अशा ठिकाणी या सणाचे मोठे आयोजन करतात. होळीच्या दिवशी घरी अनेक गोडधोड पदार्थ तयार केले जातात.
Holi Wishes in Marathi
रंग प्रेमाचा, रंग नात्यांचा…
रंग बंधांचा, रंग हर्षाचा…
साजरा करून होळी संगे…रंग नव्या उत्सवाचा…
होळीच्या खूप खूप शुभेच्छा…
🟠
मांगल्य राखू होळी सणाचे,
नैवेद्य दाखवू पुरणाच्या पोळीचे,
उधळून रंग बंधुत्वाचे,
सण साजरे करू एकोप्याचे
होळीच्या रंगमय शुभेच्छा…
🟠
खमंग पुरण पोळीच्या आस्वादा आधी,
रंगांमध्ये रंगण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगविण्याआधी,
तुम्हास व तुमच्या परिवारास
होळीच्या खूप खूप शुभेच्छा…
🟠
स्वच्छंद भिजू दे अंग,
उमलुदे मनी तरंग,
सुखी जीवनी होऊन दंग,
उधळूया अंतरीचे रंग,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा…
🟠
समाजातील विषमतेची करू होळी,
एकतेचा मळवट लावू कपाळी,
उधळू रंग बंधूत्वाचे आभाळी,
रंगांनी वाढवू सणाची झळाळी,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा…
🟠
फाल्गुन मासी येते होळी
खाण्यास मिळत असे पुरणाची पोळी
लोक देत जोरात आरोळी
लावून राख आपल्या कपाळी
होळीच्या खूप खूप शुभेच्छा…
🟠
न जाणता जात आणि भाषा उधळूया रंग
प्रेमाची नशा अन मैत्रीचा रंग
रंगांसवे होऊन दंग
होळीच्या खूप खूप शुभेच्छा…
🟠
इंद्रधनुच्या सात रंगा प्रमाणे,
होळीच्या या रंगांमध्ये,
जीवन तुमचे रंगून जावो
होळीच्या खूप खूप शुभेच्छा…
Birthday Wishes In Marathi 2024
🟠
होळीच्या या पवित्र
ज्वाळे मध्ये नैराश्य, दारिद्र्य, आळस
यांचे दहन होवो,
सगळ्यांच्या आयुष्यात आनंद सुख समाधान नांदो…
होळीच्या खूप खूप शुभेच्छा…
🟠
होळी पेटू दे,
मत्सर जळू दे,
रंग उधळू दे,
अवघ्या जीवनात नवीन रंग भरू दे,
होळीच्या व रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा…
🟠
ईडा पिडा जाळी रे,
वर्षान आली होळी रे,
तुम्हास व तुमच्या संपूर्ण कुटुंबाला
होळीच्या आणि धुळवडीच्या खूप खूप शुभेच्छा…
🟠
होळीच्या रंगात रंगून जाऊ,
रंगसंगतीत चिंब न्हाऊ,
जीवनात राहू दे रंग सुखाचे,
जीवनात नांदो दिन सौख्याचे
होळी व धुलीवंदनाच्या रंगमय शुभेच्छा…
🟠
नवरंगांनी जीवन तुमचे उजळून जावो,
होळीच्या आणि रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा…
🟠
मतभेद हे विसरून सारे, दृष्टांचा अंत करा रे,
जगण्यात नवे रंग भरा रे, जीवनाचे गीत गात रहा रे…
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला…
होळीच्या आणि धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा…
🟠
पिचकारी तील पाणी, रंगांची रंगीत गाणी,
होळीच्या सणाची, ही अनोखी कहाणी,
रंगमय रंगांचा हा सोहळा,
थोरा – मोठ्यांचा उत्साह आगळावेगळा
होळीच्या आणि रंगपंचमीच्या रंगमय खूप खूप शुभेच्छा…
🟠
🟠
रंगात रंगून गेले हे जीवन,
हर्षाने फुलले हे प्रेमळ मन,
रंगपंचमीच्या रंगांची रंगत रंगली,
रंगीत सड्यांची झाली शिंपण
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
होळीच्या आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा…
🟠
सुरक्षेचे राखून भान,
शुद्ध रंग लावू छान,
रसायन घाण नको मळी रे,
आज वर्षाने आली होळी रे,
मत्सर, द्वेष, राग विसरू,
प्रेम, शांती, समाधान सारीकडे पसरू
ईडा पिडा जाळी रे,
आज वर्षाने आली होळी रे,
होळीच्या खूप खूप शुभेच्छा…
🟠
इंद्रधनुच्या सात रंगात,
जीवन तुमचे रंगून जावो,
होळीच्या आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा…
🟠
होळी खेळताना घ्यावयाची काळजी
- होळीमध्ये आपणास रंगांची रेलचेल पहावयास मिळते. बाजारात मिळणारे रंग हे केमिकल युक्त असल्याने या रंगांमुळे अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागते.
- नैसर्गिक रंगांचा वापर करा.
- प्रथा परंपरेच्या नावाखाली भांग वगैरे सारखे नशा युक्त पदार्थांपासून सावध असणे गरजेचे आहे.
- केमिकल युक्त रंग डोळ्यांमध्ये गेल्यास डोळ्यांना त्रास होऊ शकतो, त्यामुळे केमिकल मिश्रित रंगांचा वापर टाळावा.
मित्रांनो असेच नवनवीन लेख वाचण्यासाठी आमचे पेज कोकण कल्चर ला नक्की फॉलो करा तसेच सदर लेख कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा.
हे देखील वाचा