Awesome Lakshadweep Island मालदीव सारखी सुंदरता आता भारतातच अनुभवा

Lakshadweep Island ला जाताय? किती दिवस मुक्काम करायचा, कुठे मुक्काम करायचा आणि या सगळ्या सुंदर निसर्गाचा आनंद कसा घ्यायचा. विमानतळावरून कसं यायचं, प्रत्येक छोटी-मोठी माहिती या लेखामध्ये मिळणार आहे. मालदीव सारखी सुंदरता आता भारतातच अनुभवा.

Lakshadweep Island

Lakshadweep Island

Lakshadweep Island हा भारताचा भाग नव्हता, मग तो भारतात केव्हा आणि कसा सामील झाला आणि संस्कृती आणि इतिहास काय आहे, मोठ्या संख्येने पर्यटकांना येथे का यायला आवडते ? इथे आपण कोणकोणत्या ठिकाणांना भेट देऊ शकतो ? या लेखामध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत, कवरट्टी ही लक्षद्वीप ची राजधानी आहे आणि येथील प्रमुख ठिकाणांपैकी एक ठिकाण आहे लक्षद्वीप हे एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. इथे बसून तुम्ही समुद्राच्या पाण्याच्या शांत वातावरणात निसर्गाच्या सुंदर दृश्यांचा आनंद घेऊ शकता. आजूबाजूला सुंदर नारळाची झाडे, येथील लाटा तुम्हाला एका वेगळ्याच जगात असल्यासारखे भासवतील. लक्षद्वीप हा संस्कृत, मल्याळम भाषेतून घेतलेला शब्द आहे लक्षद्वीप म्हणजे एक लाख बेटे, म्हणजे हे बेट अनेक बेटांनी बनलेले आहे, पण यापैकी फक्त १० बेटांवर लोक राहतात आणि बाकीची बेटं पूर्णपणे पडून आहेत. लक्षद्वीपची लोकसंख्या ६५००० च्या आसपास आहे. या केंद्रशासित प्रदेशातील बहुतांश लोकसंख्या इस्लाम धर्माचे पालन करते. एक बेट असूनही लक्षद्वीपचा साक्षरता दर चांगला आहे. सुमारे ९२ % लोक साक्षर आहेत. पूर्वी हा मालदीवचा भाग होता पण नंतर तो तसाच राहिला. प्रदीर्घ काळ एक स्वतंत्र राज्य होते. १९५६ मध्ये लक्षद्वीपचा भारताच्या सीमेखाली समावेश करण्यात आला यामध्ये भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे मोलाचे योगदान होते. Lakshadweep Island प्रथम MINICOY, LACCADIVE & AMINIDIVI आयलंड म्हणून ओळखले जात होते, नंतर १ नोव्हेंबर १९७३ रोजी त्याचे नाव बदलून लक्षद्वीप करण्यात आले आणि तेव्हापासून आजपर्यंत हे फक्त लक्षद्वीप या नावानेच ओळखले जाते. लक्षद्वीपचा इतिहास खूप जुना आहे, असे म्हटले जाते की येथे सुमारे २२०० वर्षांपासून लोक राहत आहेत, तर ११ व्या शतकात या ठिकाणी चोल साम्राज्याचे राज्य होते. मुस्लिम लोकसंख्या जास्त असल्याने पाकिस्तानने लक्षद्वीपवर नियंत्रण ठेवण्याचा खूप प्रयत्न केला पण. भारतापुढे त्यांचे काही चालले नाही. जर तुम्हाला भारता समोर निसर्गाच्या सानिध्यात काही शांत वेळ घालवायचा असेल, तर तुमच्या यादीत लक्षद्वीपचा अवश्य समावेश करा. आयलंड तुम्हाला मालदीवची पूर्ण अनुभूती देईल, म्हणजेच तुम्हाला जर कमी बजेटमध्ये मालदीवचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही तुमचे ध्येय देखील साध्य करू शकता. तुम्ही तुमच्या कुटुंबासह, मित्रांसोबत किंवा तुमच्या जोडीदारासोबत येथे येऊ शकता, तुम्हाला भरपूर मनोरंजन मिळेल. तुम्हाला खरी शांतता अनुभवायला मिळेल. तुम्ही इथे कुठेही जाल, तुम्ही कामाच्या ताण-तणावातून मुक्त व्हाल. काही काळ लक्षद्वीपमध्ये तुम्हाला नक्कीच स्वातंत्र्य मिळेल. भव्य सागरी घटकांव्यतिरिक्त, तुम्हाला हिरवीगार जंगले, आलिशान रिसॉर्ट्स आणि नारळाची झाडे देखील पाहायला मिळतील. तुम्ही ADVENTURES चा आनंद घेऊ शकता. जर तुम्हाला स्कुबा डायव्हिंग आवडत असेल तर तुमच्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. तुम्हाला स्फटिकासारख्या स्वच्छ पाण्यात बाहेरून मासे पोहताना दिसतील. मित्रांनो, तुम्हाला त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुंदर मासे आणि समुद्री जीव पाहता येतील. याशिवाय पतंग उडवणे, बोटिंग, काया किंग, पॅरा ग्लायडिंग, मासेमारी यासारख्या अनेक साहसी खेळ खेळता येतील. तुम्हालाही साहस आवडत असेल तर Lakshadweep Island साठी आत्ताच बॅकपॅकिंग सुरू करा. येथील मूळ रहिवासी बहुतांशी आदिवासी समाजाचे आहेत. याभागात केरळच्या संस्कृतीचा आणि सणांचा प्रभाव दिसून येतो. केरळमध्ये जे सण साजरे केले जातात ते लक्षद्वीपमध्येही साजरे केले जातात. मित्रांनो, सर्वात जास्त लक्षद्वीपमध्ये बोलली जाणारी भाषा मल्याळम आहे.Lakshadweep Island बेटावर स्वतःचे विधानसभेचे न्यायालय किंवा मुख्यमंत्री नाही. लक्षद्वीपचे अधिकारक्षेत्र केरळ न्यायालयाच्या अंतर्गत येते आणि या संपूर्ण भागात फक्त एकच संसद सदस्य आहे, जो प्रत्येक पाच वर्षांनी निवडला जातो. येथील बहुतांश कामे ग्रामपंचायतीमार्फत केली जातात. येथे एकूण १० ग्रामपंचायती आहेत.त्यात नऊ पोलीस स्टेशन व दोन पोलीस चौक्या आहेत ज्यामध्ये जवळपास ३५० पोलीस कार्यरत आहेत. जे पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेतात. येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या आणि येथील लोकसंख्या कमी असल्यामुळे गुन्हेगारीच्या घटना येथे क्वचितच घडतात. मित्रांनो, लक्षद्वीपची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. इथे नारळा व्यतिरिक्त चिंच बदाम, इत्यादीचे उत्पन्न घेतले जाते. नारळावर प्रक्रिया करून नारळाचे तेल आणि नारळाचे लाडू देखील तयार केले जातात. तुम्ही नारळापासून बनवलेले ताजे पदार्थ जरूर खरेदी करा. येथे मासळीचा व्यवसायही मोठ्या प्रमाणात केला जातो आणि लक्षद्वीपमधून अनेक राज्यांना मासळीचा पुरवठा केला जातो. भारत वर्षभरात जवळपास १ लाख़ टन टुना माशांचा व्यवहार लक्षद्वीप मार्फत करतो . या सगळ्याशिवाय पर्यटन उद्योग हा देखील येथील लोकांच्या उत्पन्नाचा एक भाग आहे. लक्षद्वीपमध्ये अगोदर शुक्रवार सुट्टी म्हणून साजरा केला जात होता. नंतर देश आणि जगातील इतर राष्ट्रांप्रमाणे रविवारी सुट्टीचा दिवस जाहीर केला गेला. शहरांपासून दूर काही क्षण ताज्या, स्वच्छ हवेत श्वास घेणे किती चांगले आहे हे तुम्हाला येथे आल्यावर समजेल. लक्षद्वीपची लोकं तुमचे मन देखील जिंकतील. इथले लोक आदरा तिथ्य करायला खूप चांगले आहेत. बऱ्याचदा गर्दीच्या मोसमात विविध ठिकाणावरून आलेल्या पर्यटकांच्या स्वागतासाठी भव्य कार्यक्रम आयोजित केले जातात. येथे भारतीय परंपरेनुसार पर्यटकांचे स्वागत केले जाते.

भारतात लग्नानंतर मुलगी मुलाच्या घरी जाते ही परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. लग्नानंतर मुलीचे आई-वडील आपल्या मुलीला निरोप देतात आणि मग तिला नवऱ्यासोबत राहावं लागतं. पण लक्षद्वीपमध्ये हा रिवाज मुलगा सासरी जातो आणि जावई म्हणून राहतो, त्याला दत्तक घ्यावं लागतं, आणि मग तो आयुष्यभर नवरीच्या घरी राहतो तसेच पत्नीचे आडनाव लावावे लागते. जर तुम्ही लक्षद्वीपला जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही समुद्र किंवा हवाई मार्गाने येथे पोहोचू शकता. भारतातील सगळ्या प्रमुख शहरातून अगट्टी येथे येण्यासाठी विमान प्रवास उपलब्ध आहे. याशिवाय जर तुम्हाला सागरी मार्गाने प्रवास करायचा असेल कोची शहरापासून बोटीची व्यवस्था आहे. कोची ते लक्षद्वीप हे अंतर साधारणत ४०० किलोमीटर आहे. संपूर्ण प्रवासादरम्यान तुम्ही समुद्राच्या सुंदर दृश्यांचा आनंद घेऊ शकता. येथे येताना तुम्ही सर्वप्रथम अगट्टी आयलँड वरती पोहोचता, हे बेट ८ किलोमीटरच्या परिसरात पसरलेले आहे. येथे भेट दिल्यानंतर इथले स्थानिक खाद्यपदार्थ नक्कीच ट्राय करा. आणि शाकाहारी लोकांसाठीही इथे मेजवानी असते.MINICOY हे Lakshadweep Island आणखी एक प्रमुख आकर्षण आहे येथील प्रमुख आकर्षण येथील लाईट हाऊस आहे, जे १८८५ मध्ये बांधले आहे. येथून तुम्हाला सुंदर नजारे पाहायला मिळतात. लाईट हाऊस वरून लक्षद्वीप ची सुंदर दृश्य तुम्ही पाहू शकता ते शब्दात व्यक्त करणे शक्य नाही. सूर्योदयाची सुंदर दृश्ये पाहता येतात. येथील सगळ्याच आयलँड वरून तुम्हाला सुंदर सूर्योदय आणि सूर्यास्त पाहायला मिळेल पण बंगाराम आयलंड ची गोष्टच वेगळी. जर तुम्हाला सागरी प्राणी आणि सागरी जगाविषयी अधिक जाणून घ्यायचे असेल, तरLakshadweep Island च्या राजधानी कवरट्टी मध्ये असलेल्या मरीन म्युझियम मध्ये तुम्ही सागरी जीवांविषयी अधिक माहिती घेऊ शकता येथे मोठमोठी संग्रहालये आहेत ज्यात शेकडो प्रजातींच्या समुद्री जीव पाहायला मिळतात. तुम्हाला आढळेल की भारतीयांसाठी संग्रहालयाचे तिकीट फक्त ₹ १५ ठेवण्यात आले आहे. फक्त लक्षद्वीपच्या लोकांना येथे जमीन खरेदी करण्याची परवानगी आहे आणि त्याला भारत सरकारचीही मान्यता आहे. येथे बंगाराम बेटा व्यतिरिक्त इतर बेटावर दारू पिणे पूर्णपणे प्रतिबंधित आहे, जो कोणी या नियमाचे उल्लंघन करेल त्याला शिक्षा होईल त्यांच्यावर चौकशी करून दंड आकारला जातो. दोषीवर कारवाईही केली जाते आणि दंडही आकारला जातो. मित्रांनो इथे कपड्यांशिवाय पर्यटक फिरू शकत नाही. जर तुम्ही भारतीय असाल तर तुम्ही लक्षद्वीपच्या कोणत्याही बेटाला भेट देऊ शकता, परंतु परदेशी पर्यटकांना येथे फक्त तीन बेटांनाच भेट देण्याची परवानगी आहे. Lakshadweep Island ला येण्यासाठी सर्वसाधारण खर्च प्रति व्यक्ती सुमारे ५०,०००/- रुपये असेल, ज्यात फेरीच्या प्रवासाच्या भाड्याचा समावेश नाही. लक्षद्वीपला विमान आणि जहाज अशा दोन्ही मार्गांनी पोहोचता येते, परंतु आपल्याकडे वेळ असल्यास, जहाजाने जरूर प्रवास करा.कोची ते लक्षद्वीप प्रवासा साठी १४-१८ तास लागतात.

Lakshadweep Island

Lakshadweep Island सर्वसाधारण माहिती

नावLakshadweep Island
राजधानीKavaratti कवरत्ती
क्षेत्रफळ३२ चौ.किमी.
संकेतस्थळ https://lakshadweep.gov.in/
भाषा मल्याळम
लोकसंख्या ६५०००

Devkund Waterfall

Angkor Wat प्राचीन हिंदू मंदिर

Lakshadweep Island Best Hotel

Bangaram Island Resort
White Pearl Beach Hotel
Kadmat Bech Resort
Island Holiday Home
Coral Beach Resort
Minicoy Island Beach Resort

Lakshadweep Island Famous Place

  1. अगाट्टी बेट
  2. कवरत्ती बेट
  3. बंगाराम बेट
  4. थिंन्नकरा बेट
  5. कदमत बेट
  6. कल्पेनी बेट
  7. मिनीकॉय बेट
  8. अँड्रॉट बेट
  9. पिट्टी पक्षी अभ्यारण्य
  10. बित्रा बेट
  11. चेरियम बेट

मालदीवच्या अधिकाऱ्यांनी वादग्रस्त विधाने केल्याने मालदीव लक्षद्वीप हा वाद वाढत गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीप ला भेट देऊन तेथील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याने, मालदीवला पर्याय म्हणून भारतीय सागरी पर्यटन विकसित करण्याच्या दृष्टीने लक्षद्वीप बेटांना भेट दिल्यानंतर लक्षद्वीप google वर ट्रेंडिंग ला आले. तसेच सोशल मीडियावर देखील बॉयकॉट मालदीव असा ट्रेंड चालवण्यात आला यामुळे बऱ्याच भारतीय पर्यटकांनी Maldives चे बुकिंग रद्द करून Lakshadweep साठी मोठ्या संख्येने बुकिंग चालू केले. मालदीवच्या पर्यटना मध्ये भारतीय पर्यटकांचा वाटा हा मोठा होता. मालदीव मध्ये दरवर्षी भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये इतर देशांपेक्षा भारतीयांची संख्या ही अधिक होती. मालदीवच्या अधिकाऱ्यांनी वादग्रस्त विधाने केल्यामुळे याचा थेट परिणाम हा मालदीवच्या अर्थव्यवस्थेवर पडणार आहे. मालदीवची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर आधारित आहे.

लक्षद्वीपचे सौंदर्य जगासमोर आल्याने मालदीवसारखे सौंदर्य भारतातल्या भारतात अनुभवण्यासाठी तसेच येथील सागरी पर्यटन विकसित करण्यासाठी भारत सरकारने आता कंबर कसली आहे. मालदीव लक्षद्वीप वादामध्ये भारतीय जनतेने देखील आता मालदीवकडे पाठ फिरवली आहे.

सदर लेख कसा वाटला हे कमेंट करून कळवा तसेच इतर नवनवीन लेख वाचण्यासाठी कोकण कल्चर या संकेतस्थळाला नक्की भेट द्या.

दशग्रीवा

2 thoughts on “Awesome Lakshadweep Island मालदीव सारखी सुंदरता आता भारतातच अनुभवा”

  1. Very informative and helpfull.
    It will surely help those who are preparing for competitive exams.
    Hope and expect more topics on current affairs.
    Thanks YogeshSir

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Vinesh Phogat ने जाहीर केली निवृत्ती Golden boy ने रौप्य पदक जिंकत रचला इतिहास Neeraj Chopra Won Silver Medal मराठमोळ्या Avinash Sable ने रचला इतिहास पण मेडल हुकले. Mumbai’s most famous street food Famous places for Monsoon Trip in India