i phone 15 नुकताच १२ सप्टेंबर ला लाँच करण्यात आला. फ्लॅगशिप लाईनअप मधील महत्वाचा बदल म्हणजे यामध्ये आधुनिक चीप सेट सह युएसबी टाईप सी (USB Type – C) पोर्टचा समावेश करण्यात आला आहे. आयफोन १५, ६० Hz रिफ्रेश रेट आणि ६.१० इंच टचस्क्रीन डिस्प्ले सह येतो. यामध्ये ४६० पिक्सेल प्रती इंच (Pixel Per Inches) च्या घनतेसह ११७९*२५५६ पिक्सेल रिझोल्यूशन आहे. सोबत मल्टी फंक्शनल डायनामिक आयलँड देण्यात आला आहे. डायनामिक आयलँड नोटिफिकेशनच्या गरजेनुसार, तुम्ही त्याचा शेप बदलू शकता, म्यूझिक ट्रॅक एक्सेस करू शकता. आय फोन १५, ८ जीबी रॅम सह, हेक्सा कोर Apple A16 Bionic प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच आय फोन १५ वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो. कॅमेरा-मागील बाजूस ४८ मेगापिक्सेल (f/1.6) प्रायमरी कॅमेरा आणि १२ मेगापिक्सेल (f/2.4) असा ड्युअल कॅमेरा सेट अप देण्यात आला आहे. सेल्फीसाठी सिंगल कॅमेरा १२ (f/1.9) अपर्चर सह १२ मेगापिक्सेल सेन्सर देण्यात आला आहे. या माध्यमातून तुम्ही चांगल्या फोटोग्राफीची अनुभूती घेऊ शकता. आयफोन १५ प्रो मध्ये युजर्संना ३ डी व्हिडीओ रेकॉर्डिंगचा पर्याय मिळणार आहे
एप्पल आय फोन १५ हा iOS 17 ऑपरेटिंग सिस्टीम वर आधारित असून यामध्ये ३ व्हेरिएन्ट येतात – १२८ जीबी, २५६ जीबी आणि ५१२ जीबी इनबिल्ट स्टोरेज ऑफर करतात. एप्पल आय फोन १५ हा ड्युअल सिम (जी.एस.एम.) नॅनो सिम आणि एक ई सिम सह येतो. आयफोन १५ चे वजन १७१ ग्राम आहे जो चांगला इनहँड फील देतो. काळा, निळा, हिरवा, गुलाबी आणि पिवळा या रंगांमध्ये लाँच करण्यात आला आहे. तसेच पाण्यापासून सरंक्षण होण्यासाठी आयपी ६८ रेटिंग देण्यात आली आहे.
कनेक्टीव्हिटी पर्यायांमध्ये वाय-फाय, जी.पी.एस., ब्लूटूथ v 5.3, एनएफसी, युएसबी टाईप सी, ३ जी, ४ जी, (काही ५ जी बँड ४०) समावेश आहे. दोन्ही सिम साठी ४जी, ५जी चा पर्याय आहे. सेन्सर्समध्ये एक्सिलोमीटर, एम्बीएंट लाईट सेन्सर, बॅरोमीटर, जायरोस्कोप, प्रॉक्सोमिटी सेन्सर,कंपास याचा समावेश आहे. याची किंमत हि ७९,९००/- रुपये इतकी आहे. वेगवेगळ्या ई कॉमर्स साईट वर हि किंमत वेगवेगळी आहे.
नवीन आयफोनच्या सगळ्या मॉडल मध्ये डायनामिक आयलँड मिळणार आहे. डायनामिक आयलँड नोटिफिकेशनच्या गरजेनुसार, तुम्ही त्याचा शेप बदलू शकता. जर तुमच्या फोनमध्ये म्यूझिक प्ले होत असेल तर त्याची माहिती नॉच मध्ये दिसते. तसेच डायनामिक नॉच वरून म्यूझिक ट्रॅक एक्सेस करू शकता.
Apple i Phone 15 Price in India -Product Name Price in India
एप्पल आय फोन १५ (128GB) – Green | 79,900 |
एप्पल आय फोन १५ (128GB) – Black | 79,900 |
एप्पल आय फोन १५ (128GB) – Pink | 79,900 |
एप्पल आय फोन १५ (256GB) – Pink | 89,900 |
एप्पल आय फोन १५ (256GB) – Green | 89,900 |
एप्पल आय फोन १५ (256GB) – Blue | 89,900 |
एप्पल आय फोन १५ (512GB) – Black | 109,900 |
एप्पल आय फोन १५ (512GB) – Blue | 109,900 |
एप्पल आय फोन १५ (512GB) – Pink | 109,900 |
एप्पल आय फोन १५ (256GB) – Yellow | 89,900 |
Apple i Phone 15 Full Specifications
ब्रँड | एप्पल |
मॉडेल | i Phone 15 |
किंमत | ७९,९०० रुपये |
लाँच | १२ सप्टेंबर २०२३ |
डायमेन्शन | १४७.६० x ७१.६० x ७.८० एम.एम. |
वजन | १७१ ग्राम |
आय पी रेटिंग | आय पी ६८ |
वायरलेस चार्जिंग | Yes |
कलर | काळा, निळा, हिरवा, गुलाबी आणि पिवळा |
डिस्प्ले रिफ्रेश रेट | ६० Hz |
स्क्रीन साईज | ६.१० इंच |
टच स्क्रीन | Yes |
रिझोल्यूशन | ११७९*२५५६ |
पिक्सेल प्रती इंच | ४६० पी.पी.आय. |
प्रोसेसर | हेक्सा कोर Apple A16 Bionic |
रॅम | ८ जीबी |
स्टोरेज | १२८ जीबी, २५६ जीबी आणि ५१२ जीबी |
स्टोरेज (Expandable) | No |
कॅमेरा | |
प्रायमरी कॅमेरा | ४८ मेगापिक्सेल (f/१.६) प्रायमरी कॅमेरा + १२ मेगापिक्सेल (f/२.४) असा ड्युअल कॅमेरा |
रिअर कॅमेरा फ्रंट कॅमेरा | २ १ |
सेल्फी कॅमेरा | १२ मेगापिक्सेल (f/१.९) |
ऑपरेटिंग सिस्टीम | iOS १७ |
कनेक्टीव्हिटी | |
वायफाय | Yes |
वायफाय सपोर्ट | 802.11 b/g/n/ac/ax |
जीपीएस | Yes |
ब्लूटूथ | Yes, v ५.३० |
एन.एफ.सी. | Yes |
इन्फ्रारेड | No |
युएसबी टाईप सी पोर्ट | Yes |
हेडफोन | टाईप सी |
सिम | २ – 4g/5g Nano |
सिम टाईप | जी.एस.एम./ सी.डी.एम.ए. |
३ जी | Yes |
४ जी / LTE | Yes |
५ जी | Yes (Band 40) |
3D face recognition | Yes |
कंपास / Magnetometer | Yes |
प्रॉक्सोमिटी सेन्सर | Yes |
एम्बीएंट लाईट सेन्सर | Yes |
जायरोस्कोप | Yes |
बॅरोमीटर | Yes |
Join our Whats app Group Click Here
Pingback: Foldable iPhone ॲपल देखील लॉन्च करणार जाणून घ्या अपडेट...