Ghavan Recipe नमस्कार kokanculture मध्ये तुमचे स्वागत आहे. कोकणातील निसर्गा इतकीच येथील खाद्य संस्कृती देखील प्रसिध्द आहे. कोकणात सहज पिकणारा तांदूळ मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो, तर आज आपण असाच तांदळाच्या पिठापासुन झटपट तयार होणारा पदार्थ घावन / घावणे कसे बनवले जातात ते पाहणार आहोत. तुम्ही कोकणातले असाल तर तुम्हाला माहित असेलच घावणे कोकणात अतिशय लोकप्रिय आहेत. घावणे हा पौष्टिक पदार्थ आहे, मऊ लुसलुशीत, जाळीदार घावणे हे सकाळी नास्ता तसेच जेवणावेळी देखील आवडीने खाल्ले जातात.
घावणे कसे बनवले जातात याची संपूर्ण रेसिपी दिली आहे, आशा आहे तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. घावणे दोन प्रकारे केले जातात रात्री तांदूळ भिजवून (किमान ४-६ तास भिजवून) सकाळी त्याचे मिक्सर ला वाटण करून किंवा तांदळाच्या पिठा पासून बनवले जातात.
Ghavan Recipe सामुग्री
- १ कप तांदळाचे पीठ (मध्यम बारीक असावे) किंवा भिजवून वाटलेले तांदूळ
- पाणी
- मीठ
- तेल
अश्या पद्धतीने बनवा घावणे-
(lnstant Ghavan recipes in 5min.)
सर्वप्रथम गॅसवर भिडाचा तवा नॉन लो फ्लेम वर गरम करायला ठेवून, एका बाउल मध्ये एक वाटी तांदळाचे पीठ घ्या. त्यात १ वाटी पाणी घालून चांगले एकजीव करुन घ्या मिश्रण तयार करताना घट्ट मिश्रण तयार झाल्यास त्यात आवश्यकतेनुसार पाणी घाला.
मिश्रण तयार झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ घालून चांगले मिक्स करुन घ्या. गॅस ची फ्लेम हाय करून भिडाच्या तव्यावर ब्रश ने किंवा कांद्याने तेल लावून, छोट्या वाटीने पिठाचे मिश्रण तव्यावर टाकून पूर्ण तवाभर पसरून घ्या. त्यावर झाकण ठेवून १०-१५ सेकंद वाफ द्या. नंतर झाकण काढून घावण पलटी करून चांगले भाजून घ्या, अश्या प्रकारे मस्त जाळीदार, लुसलुशीत घावणे खाण्यासाठी तय्यार.
हे घावणे नारळाच्या चटणी सोबत किंवा चहा सोबत अतिशय चविष्ठ लागतात.
घावण्यासोबत नारळाची चटणी कशी बनवावी ?
सामुग्री
- नारळ
- हिरव्या मिरच्या
- मीठ
- कडीपत्ता
- राई/ मोहरी
- तेल
नारळ खोवणीने खोवुन घ्यावा (किती जंणासाठी) चटणी बनवायची या अंदाजाने घ्यावा, तसेच मिरची स्वच्छ धुवून तिचे तुकडे करून घ्यावे. खोवलेला नारळ आणि मिरच्या या मिक्सर ला वाटून त्यात चवीनुसार मीठ टाकून मिश्रण छान एकजीव करून घ्यावे. हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्या एका भांड्यामध्ये मध्यम फ्लेम वर तेल गर करायला ठेवा. थोड गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी, जिरे आणि कडीपत्ता टाकून त्यात नारळ आणि मिरच्याचे वाटलेले वाटण त्या तेलात टाकून फोडणी द्यावी, झाली चवदार चटणी आता ही चटणी घावण्या सोबत सर्व्ह करा.
भिजलेल्या तांदळाचे घावणे
तांदूळ (कोणतेही तांदूळ) दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे त्यामध्ये पाणी घालून हे तांदूळ रात्रभर किंवा ७-८ भिजत ठेवायचे. नंतर हे तांदूळ आवश्यकतेनुसार पाणी टाकून मिक्सर ला लावून त्याचे मिश्रण एका बाउल मध्ये काढून घ्या त्यात चवीपुरता मीठ टाकून छान एकजीव करून घ्या.तवा गरम होण्यास ठेवून भिडाच्या तव्यावर ब्रश ने किंवा कांद्याने तेल लावून, छोट्या वाटीने पिठाचे मिश्रण तव्यावर टाकून पूर्ण तवाभर पसरून घ्या. त्यानंतर त्यावर झाकण ठेवून १ मिनिट छान भाजून घ्या, घावन पलटून घ्या व दुसऱ्या बाजूने देखील भाजून घ्या.
डाळ तांदळाचे घावणे
आहारात असणारे डाळींचे महत्व तुम्हाला माहित असेलच, डाळी आणि तांदळापासून पौष्टिक घावण कसे बनवतात ते पाहू तुम्ही यामध्ये पालक, बीट तुमच्या आवडीनुसार टाकून वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही करू शकता, तीळ देखील तुम्ही टाकू शकता. डाळींमध्ये प्रथिन असतात.
सामुग्री
सर्व प्रथम दोन वाटी तांदूळ आणि उडीद डाळ, मुग डाळ, चना डाळ या एकत्र करून तांदूळ आणि डाळी वेगवेगळ्या वाटी मध्ये भीजत ठेवा. किमान ५-६ तास झाल्यानंतर तांदूळ आणि (डाळी + मिरची + कोथिंबीर)वेगवेगळ्या मिक्सर ला लावून घ्या. तांदळामध्ये चवीनुसार मीठ व आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण छान एकजीव करून घ्या. तांदळाच्या मिश्रणामध्ये डाळींचे मिश्रण चांगले मिक्स करून घ्या, नंतर भिडाचा तवा गरम झाल्यानंतर त्यावर तेल लावून तयार केलेलं मिश्रण वाटीने तवाभर पसरून त्यावर झाकण ठेवून १ मिनिट शेकून घ्या व चांगले शेकून झाल्यावर ते पलटून दुसऱ्या बाजूनी शेकून घ्या, गरमागरम, घावण तय्यार. अगदी काही वेळात झटपट होणारा पौष्टिक पदार्थ आहे हा तुम्ही दही, नारळाची चटणी, टॉमेटो चटणी, खजूर चटणी सोबत खाऊ शकता.
टिप :
घावणे करताना शक्यतो तांदूळ धुवून वाळत घालावे आणि दळून आणावे घावणे छान आणि पांढरे शुभ्र होतात.
भिडाचा तवा वापरावा त्यावर उत्तम घावणे होतात.
हे वाचा
Thanks for sharing your thoughts on calculated.
Regards
I simply could not leave your website before suggesting that I
actually enjoyed the usual info an individual supply for your guests?
Is gonna be back steadily to check out new
posts
always i used to read smaller content which also clear their motive, and that is also happening with
this article which I am reading here.
Great article, just what I was looking for.
Pingback: Sakharoli Recipe महाराष्ट्राची फेवरेट झटपट तयार होणारी साखरोळी